केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांसाठी भरीव तरतूद केल्याचे दिसून आले.

* पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद
* जन-धन योजनेचा आवाका वाढवण्यासाठी देशभरातील टपाल कार्यालयांचा उपयोग करून घेतला जाणार
* पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, वार्षिक प्रिमिअम ३३० रुपये, मृत्यूनंतर विमाधारकाच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळणार
* प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेत सुधारणा करणार
* प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतंर्गत वार्षिक १२ रूपयांचा हप्ता भरून २ लाखांचा अपघात विमा मिळणार
* २०१४-१५ देशभरात ५०,००,०० स्वच्छतागृहे उभारण्यात आली आणि २०१५-१६ या वर्षात सहा कोटी स्वच्छतागृहे उभारण्याचे उद्दिष्ट्ट
* देशातील प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर २०२२ पर्यंत छप्पर उपलब्ध करून देणार
* देशाच्या शहरी भागात ४ कोटी आणि ग्रामीण भागात २ कोटी घरांची निर्मिती करणार
* ग्रामीण भागातील नाबार्डच्या योजनांसाठी २५,००० कोटी रूपयांची तरतूद
* मनरेगा योजनेचा दर्जा आणि अंमलबजावणीचे स्वरूप सुधारण्यावर भर देणार, मनरेगासाठी ३४ हजार कोटींची तरतूद
* अपेक्षेपेक्षा जास्त कर मिळाल्यास मनरेगासाठी अधिक ५ हजार कोटी देण्यात येणार
* ज्येष्ठ नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना लवकरच सुरु करणार