सहकार क्षेत्रातील २८ वर्षांच्या कार्यकाळात चार राज्यांमध्ये ७८ शाखा/सेवा केंद्रांचे उद्दिष्ट साध्य करणाऱ्या पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेने (पीएमसी) ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा विशेष योजनां आणि सुविधांवर कायम भर दिला आहे. याच अंतर्गत ‘फ्लेक्झीमनी’ ही बँकेची बचत खाते योजना ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे, असे पीएमसी बँकेचे अध्यक्ष चरणजीत चढ्ढा यांनी सांगितले. नव्या पिढीतील खासगी बँकांच्या धर्तीवर, मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट)च्या व्याजदराचा खातेदाराला लभ देत त्याला आपल्या बचत व चालू खात्यातील नियमित व्यवहार करण्याची मुभाही ‘फ्लेक्झीमनी’ योजना देते. शिवाय खातेधारक गरज पडेल तेव्हा हवी तेवढी रक्कम खात्यातून काढून घेऊ शकतो आणि एफडी मोडल्याचा दंडही त्याला भरावा लागत नाही. १२ ते १८ वर्षांच्या कुमारवयीन मुला-मुलींना खास बचत खाते उघडण्याची संधी देणारी ‘किशोर बचत योजना’ही सहकार क्षेत्रात सर्वप्रथम पीएमसी बँकेनेचे सुरू केल्याचे चढ्ढा यांनी सांगितले. मोफत एटीएम कार्ड आणि व्यक्तिगत चेकबुक हे किशोर बचत योजनेचे आगळे वैशिष्टय़ असल्याचे त्यांनी सांगितले.