आपले वित्तीय निर्णय घेताना तुम्ही मालमत्ता वाटपाचा विचार अगदी शेवटी कधी केला होता? मालमत्ता विभाजन (असेट अलॉकेशन) हे फायद्याचे असते हे आपल्या सर्वाना माहिती आहेतच! मात्र फार क्वचित या संकल्पनेचा वापर होताना दिसतो.

भारतीय गुंतवणुकीची पाश्र्वभूमी पाहता गेल्या काही दशकांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी (रिटेल इन्व्हेस्टर्स) निश्चित उत्पन्न पर्याय अवलंबताना काचकूच केलेली दिसते. परंतु, सुदैवाने हे चित्र बदलतानाही दिसते. मोठय़ा प्रमाणावर भारतीय गुंतवणूकदरांनी आपल्या गुंतवणूक पर्यायांचा विस्तार केला आहे. वास्तविक गुंतवणूक पर्यायानंतर प्रामुख्याने म्युच्युअल फंडाला वाढती मागणी निर्माण झाली. हे लक्षण प्रोत्साहन देणारे होते. मात्र, जेव्हा मालमत्ता वाटपाची वेळ येते त्यावेळी आपण अपयशी ठरतो.

मालमत्ता वाटपाचा वित्तीय निर्णय म्हणजे – गुंतवणूकदार किंवा ‘पोर्टफोलियो मॅनेजर’चा एक असा गुंतवणूक प्रयत्न जो प्रत्येक मालमत्ता ‘पोर्टफोलियो’त गुंतवलेल्या टक्केवारीला समायोजित म्हणजे ‘अ‍ॅडजेस्ट’ करेल आणि जोखीम (रिस्क) विरुद्ध फायदा (रिवॉर्ड) चे संतुलन साधेल. हे संतुलन गुंतवणूकदाराच्या जोखीम सहनशीलतेवर तसेच त्याची / तिची उद्दीष्टय़े आणि गुंतवणुकीच्या कालावधीवर आधारित आहे.

जरा सोप्या पद्धतीने समजून घेण्याकरिता ही व्याख्या मोडूया! मालमत्तेत समभाग, रोखे, स्थावर मालमत्ता, सोने किंवा व्यापारी माल विषयक समभाग इत्यादी प्रकारांचा समावेश आहे. हे मालमत्तेचे प्रकार म्हणजे जेवणात वापरले जाणारे मसाले आहेत असे समजा! याचा अर्थ जर तुम्हाला एखादी रुचकर डाळ किंवा कढी बनवायची असेल तर संतुलित प्रमाणात आवश्यक मसाले वापरण्याची गरज असते. याचप्रमाणे जर तुम्हाला एक आदर्श गुंतवणूक धोरण अवलंबायचे असेल तर निश्चित भागात मालमत्तेचे विभाजन करावे लागेल. याचा अर्थ तुमचे प्रमाण हे तुम्हाला अपेक्षित असलेल्या चवीवर अवलंबून आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास तुमची मालमत्ताविषयक ध्येय आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमतेवर विभाजनाचे प्रमाण अवलंबून असेल. कारण प्रत्येक मालमत्तेची अस्थिरता पातळी ही निरनिराळी असते.

पण हे इतके महत्त्वाचे का आहे?

इतिहास साक्ष आहे की, मालमत्ता प्रकारात मिळणारा परतावा हा एकाचवेळी वर—खाली गेलेला नाही. एकापेक्षा अधिक मालमत्तेत गुंतवणूक करून तुम्ही पैसे गमवण्याची जोखीम कमी करू शकता. तसेच तुमचा एकूणच ‘पोर्टफोलियो’ परतावा देखील सुलभ मार्गक्रमण करत राहतो. फक्त मालमत्ता विभाजनाद्वारे तुम्ही वैविध्यपूर्णतेची खरी जादू शोधू शकता!

गुंतवणुकीच्या पद्धती

मालमत्ता विभाजन हा गुंतवणुकीचा शुद्ध मार्ग आहे. आपल्याकरिता काय योग्य आहे आणि काय नाही तसेच काय चांगले असू शकते याचे मूल्यांकन काळजीपूर्वक करून तशी अमलबजावणी केली पाहिजे. आपल्या उद्दीष्टय़ांसाठी मालमत्तेच्या सुयोग्य सरमिसळीची व्याख्या बनवण्याची गरज आहे. त्यात जोखीम क्षमता आणि कालावधी सीमा हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक लक्षात घेतले पाहिजे.

निष्टिद्धr(१५५)त कालावधीसोबत घेतलेली जोखीम ही मालमत्ता विभाजनाच्या गुणोत्तर व्याख्येकरिता मदतीचे ठरते.

उदाहरणार्थ : जर गुंतवणूक कालावधीची सीमा ही तीन वर्षांपेक्षा कमी असेल तर एखाद्याने समभागांमध्ये गुंतवणूक करण्यापासून स्वत:ला परावृत्त करावे. आणि जर हा कालावधी पाच वर्षांंपेक्षा अधिक असेल असेल तर मग समभागांमध्ये विभाजन करण्याकडे कल असू द्यावा.

वरील नियम हे गुंतवणुकीचे महत्त्वाचे नियम असले तरीही तुम्ही इतर पद्धतीने गुंतवणूक करू शकता.

धोरणात्मक विभाजन (स्ट्रॅटेजीक अलॉकेशन) : यामध्ये विभाजीत मालमत्तेतील रक्कम निश्चित असते आणि मिळणारा परतावा हा मालमत्तेच्या प्रकारावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्याने समभागांमध्ये १५% परतावा या हिशेबाने ६०% गुंतवणूक केली असेल आणि ४०% चे कर्ज व ५% परतावा दराने असेल तर पोर्टफोलियोवर मिळणारा परतावा ११% इतका कमी राहील.

रणनीती आधारित विभाजन (टॅक्टीकल अलॉकेशन) : ही अल्पकालीन बाजार संधी मिळवण्यासाठी निश्चित विभाजन (फिक्स्ड असेट) मधून अल्पकालीन विचलन (शॉर्ट—टर्म डीव्हीएशन) केले जाते.

रणनीति आधारित विभाजन (टॅक्टीकल अलॉकेशन) आणि धोरणात्मक विभाजन (स्ट्रॅटेजीक अलॉकेशन) हे निष्क्रिय गुंतवणूकदारांसाठी असते तर क्रियाशील गुंतवणूकदार गतिशील (डायनॅमिक) पद्धतीचा अवलंब करतात. ते नियमितपणे आपल्या गुंतवणुकीचा हिशेब ठेवतात आणि त्यामुळे त्यांना बाजारातील अल्पकालीन आणि दीर्घकालीन हालचाली पकडता येतात.

गतिशील मालमत्ता विभाजन (डायनॅमिक असेट अलॉकेशन) : आजच्या जगात गुंतवणूकदार हा निष्क्रीय असो किंवा क्रियाशील त्याच्याकरिता मालमत्तेचे विभाजन करणे जरा कठीणच असते. त्यामुळे ‘बॅलन्स्ड फंड्स’ आणि ‘डायनॅमिक असेट अलॉकेशन पर्याय’ हे किरकोळ गुंतवणूकदारांकरिता सुस असतात. गुंतवणूकदाराकरिता अशाप्रकारच्या फंड योजना म्हणजे मालमत्ता विभाजन न मोजता सोयीनुसार मालमत्ता विभाजनाचा वापर करणारा पर्याय असतात आणि त्यानंतर विभाजनावर आधारित बहुविध रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येते.

‘बॅलन्स्ड फंड्स’ या म्युच्युअल फंड स्कीम असतात. ज्यामध्ये समभाग किंवा कर्ज पर्यायात प्रमाणाशील पद्धतीने (सामान्यपणे ६५% समभाग आणि ३५% कर्ज) गुंतवणूक करता येते.  दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास ते समभागाला गतिशीलता आणि कर्जाला काहीशी स्थिरता देऊ  करते.

‘बॅलन्स्ड फंड्स’मध्ये एक अत्यंत हातचे राखून धरलेली श्रेणी असते. त्याला ‘बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्स फंड्स’ म्हणतात. या फंड्सची रचना समभागांमध्ये गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने झाली आहे. त्यांची किमत कमी असते. भांडवली बाजार तेजीत असताना यामध्ये नफा कमवावा लागतो. त्यामुळे जोखीम कमी होते. आणि दीर्घ—कालीन परतावा मिळतो. हे फंड्स पोर्टफोलियोत अधिक पसंतीच्या वर्गवारीत मोडणारे असतात. अर्थात ते मुल्यांकनावर अवलंबून असते.

फार उशीर झालेला नाही

पैसे मिळवण्यासाठी मेहनतीची आवश्यकता असते आणि अत्यंत काळजीपूर्वक कमवलेला पैसा साठवावा लागतो. त्यामुळे तुमची गुंतवणूक योग्य योजनांमध्ये आणि धोरणांत गुंतवण्यासाठी फार उशीर झालेला नाही हे लक्षात असू द्या. उलट गुंतवणूक ही सातत्याने चालणारी प्रRिया आहे. त्यामुळे मालमत्तेचे विभाजन करताना फक्त शिस्त असून चालणार नाही तर बाजार तेजीत असताना खरेदी टाळावी तसेच बाजार मंदावलेला असताना विक्री करू नये.

(लेखक आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)