रिलायन्स इंडस्ट्रीजच्या १,५०० रुपयांची ठेव घेऊन नवीन जिओ फोन देण्याच्या घोषणेमुळे कंपनीच्या नफा क्षमतेत फार फरक पडणार नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

रिलायन्सने शुक्रवारी झालेलेया वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओफोनची घोषणा जाहीर केलेला लाभांश व बक्षीस समभागांच्या घोषणेनंतर समभाग उंचावला असला तरी ज्यांच्याकडे जुने समभाग आहेत त्यांनी हे समभाग राखून ठेवावेत; परंतु नवीन समभाग खरेदी टाळावी, असा सल्ला दलालीपेढय़ा देत आहेत.

भारतातील १०० कोटी मोबाईल वापरकर्त्यांपैकी ५० कोटी वापरकर्ते अद्याप मागील पिढीतील फिचर फोन वापरत आहेत. या ग्राहकांना स्मार्टफोन वापरकर्ते करण्यासाठी रिलायन्सनेतर्फे १,५०० रुपयांच्या ठेवींवर जिओफोन उपलब्ध होणार आहे. या योजनेत बोलणे फुकट असून डेटासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

भारतातील ६३ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षेपेक्षा कमी  वयाची आहे. भारतात ८० कोटी सक्रीय मोबाईल वापरकर्ते असून २० कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत; परंतू प्रति ग्राहक वापरला जाणारा डेटा हा जागतिक सरासरीपेक्षा किती तरीकमी आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे भारतात अजूनही फिचरफोनची असलेली मोठी संख्या होय. हे फिचरफोन जोपर्यंत वापरातून बाहेर जाणार नाहीत तोपर्यंत डेटाचा वापर वाढणार नाही, असे सांगितले जाते. कंपनीने जाणून ही १,५०० रुपयांच्या ठेवीच्या बदल्यात १५ ऑगस्टपासून स्मार्ट फोन देण्याचे योजिले आहे.

जर ग्राहकाने मोठय़ा प्रमाणात डेटा वापरला तरच रिलायन्सचा महसूल वाढेल, असे मानले जाते. प्रतिग्राहक मिळणाऱ्या १,५०० रुपयामुळे विक्रीत वाढ होणार नाही. एखाद्या गुंतवणूकदराने आठ महिन्यांपूर्वी रिलायसचा समभाग खरेदी केलाअसता तर मोठी भांडवली वृद्धी मिळण्याची संधी होती.

बोनसमुळे कंपनीच्या भांडवली मूल्यात वाढ होत नसते. हा केवळ भावनिक मुद्दा आहे, असे बाजारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. जोपर्यंत विक्री व नफा वाढलेला दिसत नाही तोपर्यंत बाजार एखाद्या समभागाच्या पाठीवर कौतुकाने थाप मारीत नाही.  हा स्मार्टफोन घेणारा ग्राहक डेटाचा किती प्रमाणात वापर करेल या बद्दल साशंकता वाटते, असे सॅमको सेक्युरिटीजचे जिमीत मोदी यांनी लोकसत्ता’ला सांगितले.

धोरणी गुंतवणूकदरांनी आठ – नऊ महिन्यांपासून रिलायन्सची खरेदी चालविली होती. ज्या अपेक्षेने ही खरेदी संस्थात्मक गुंतवणूकदरांनी केली त्यांना रिलायन्सने निराश केले नाही. बाजाराचा कल पाहता नवीन गुंतवणूक करणे हे निर्धोक आहे असे नक्कीच म्हणता येणार नाही. निधी व्यवस्थापकांना उत्सर्जनात वाढ होण्याची अपेक्षा तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीचे निकाल झाल्यानंतर आहे. दरम्यानच्या काळात बाजारात एखादी घसरण झाल्यास अन्य समभागांच्या बरोबर रिलायन्सच्या समभागात नवीन खरेदीची संधीउपलब्ध होईल, असे फंड व्यवस्थापकांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.