कोकणातील सहकार क्षेत्रामध्ये गेली सुमारे तेवीस वर्षे पारदर्शी कारभार करीत स्पृहणीय कामगिरी केलेल्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला राज्य शासनातर्फे ‘सहकार भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यातील २८ हजार पतसंस्था, सहकारी संस्थांमधून विशिष्ट निकषांवर निवडक संस्थांची सखोल तपासणी तज्ज्ञ समितीकडून करण्यात आली. ठेवी गोळा करण्याबरोबरच कर्जदार-ग्राहकांना अद्ययावत सेवा-सुविधा, कर्जवसुली, पारदर्शी कारभार इत्यादी बाबी विचारात घेऊन या संस्थांना गुण देण्यात आले. त्यामध्ये कोकण विभागात आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थांनी अव्वल गुण मिळवले.     

ठाणे
राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने यंदाच्या वर्षांपासून ‘सहकार निष्ठ पुरस्कार’ सुरू करण्यात आला असून हा पहिलाच पुरस्कार पटकाविण्याचा मान ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने मिळविला आहे.
पुणे येथील बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये राज्य शासनाच्या सहकार विभागाच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांचा सांगता समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष अशोक पोहेकर, उपाध्यक्ष नीलेश भोईर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र शिरसाठ यांनी ‘सहकार निष्ठ पुरस्कार’ स्विकारला. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गेली ५४ वर्षांची कामगिरी लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.     

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

‘सहकार भूषण’ने स्वामी स्वरुपानंद पतसंस्था, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सन्मानित
ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण आणि कै. वसंतराव नाईक यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षही घोषित करण्यात आले आहे. त्यानिमित्त शासनातर्फे राज्यभर सहकारविषयक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सहकार वर्षांच्या समारोपानिमित्त या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संस्थांची ‘सहकार महर्षी’, ‘सहकार भूषण’ आणि ‘सहकारनिष्ठ’ या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली.