मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
दोन उपकंपन्यांद्वारे हजारो गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी सहारा समूहाचे सुब्रतो रॉय यांच्यासह तीन जणांच्या स्थावर-जंगम मालमत्ता तसेच बँक व डिमॅट खाती गोठविण्याचे आदेश अखेर सेबीने बुधवारी सायंकाळी उशिरा जारी केले. गुंतवणूकदारांचे वार्षिक १५ टक्क्यांसह २४ हजार कोटी रुपये अदा न केल्याबद्दल समूहाविरोधात कारवाई न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही सेबीवर ताशेरे ओढले होते.
सुब्रतो रॉय यांच्यासह वंदना भार्गवा, रवि शंकर दुबे व अशोक रॉय चौधरी यांची यांची बँक तसेच डिमॅट खाती व स्थावर-जंगम मालमत्ता गोठविण्याचे आदेश सेबीचे पूर्णवेळ सदस्य प्रशांत सरन यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. याबाबत संबंधितांना येत्या २१ दिवसांत संपूर्ण माहिती देण्याचेही बंधनकारक करण्यात आले असून या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सहारा समूहातील 'सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेन्ट कॉर्पोरेशन' व 'सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन' या दोन उपकंपन्यांबाबत जारी करण्यात आलेल्या २०० पानांच्या आदेशात मालमत्तांची स्वतंत्र यादीही देण्यात आली आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















