पाच वर्षांत ४० टक्क्यांच्या सरासरीने विनिमय वाढ

एसबीआय कार्डने ४० लाख ग्राहकसंख्येचा टप्पा गाठून आघाडीच्या कार्ड प्रदात्यांमध्ये आपले स्थान अधिक बळकट केले आहे. उल्लेखनीय म्हणजे २०११—२०१२ आणि २०१५—१६या आर्थिक वर्षांत कंपनीच्या ग्राहकांनी कार्डचा वापर करून केलेल्या खरेदी विनिमयात ४० टक्के वार्षिक सरासरी दराने वाढ पाहायला मिळाली आहे. एकंदरीत या उद्योगक्षेत्रातील वाढीचा आकडा २५ टक्के असा आहे.  यावेळी बोलतानाम्हणाले,

तब्बल ४० लाख ग्राहकांनी दाखविलेला विश्वास हा, पारदर्शकता आणि ग्राहककेंद्री व्यवहार तसेच दर्जाबाबतची वचनबद्धता आणि अभिनवता या सर्व मूल्यांना दिली गेलेली पसंतीच दर्शविते, असे  एसबीआय कार्डचे सीईओ  विजय जसुजा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.  ग्राहकांच्या सतत बदलत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कार्डधारकांना फलदायी अनुभव मिळावा यासाठी आम्ही पेमेण्ट सोल्युशन्समध्ये नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो, असे ते म्हणाले.

यापुढेही वाढीत आम्ही असेच सातत्य राखू आणि सप्टेंबर २०१७ पर्यंत १० लाख अतिरिक्त ग्राहक जोडण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू शकू असा विश्वास जसुजा यांनी व्यक्त केला.

गेल्या दोन वर्षांत एसबीआय कार्डसने सध्याच्या ऑनलाइन पिढीसाठीचं अभिनव ‘एसबीआय सिम्पलीक्लिक कार्ड ’आणि उच्च संपत्तीधारक ग्राहकांना त्यांच्या उच्चभ्रू जीवनशैलीला साजेसे आणि त्यांना फायदे मिळवून देणारं ‘एसबीआय कार्ड एलिट’ अशी दोन कार्डं सादर करून आपले उत्पादनभांडार विस्तारले आहे. नुकतीच कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर भागीदारी केली असून त्यामधून एसबीआयच्या पात्र एसएमई ग्राहकांना एसबीआय कार्ड एलिट दिले जाणार आहे. अशाने कंपनीची ग्राहकांची संख्या आणखी वाढण्यास मदत होईल. कंपनीने ग्राहकांना को—ब्रॅण्डेड कार्डस वितरित करण्यासाठी फेडरल बँक, साऊथ इंडियन बँक आणि लक्ष्मीविलास बँक यासह भागीदारी केली आहे.

ई कॉर्मसचाही मोलाचा वाटा आहे. एसबीआय कार्डच्या मदतीने केल्या जाणाऱ्या एकंदरीत खरेदीचा दर ३० ३५ टक्कय़ांनी वाढत आहे तर ऑनलाइन खरेदीचा दर ५० टक्कय़ांहून अधिक आहे.