विदेशी गुंतवणूकदारांवरील कराबाबतची चर्चा सप्ताहअखेरही कायम राहिल्याने शुक्रवारी भांडवली बाजाराबरोबरच भारतीय चलनानेही घसरण नोंदविली. परिणामी दोन्हीही त्याच्या गेल्या तीन महिन्यांच्या तळात विसावले. बाजाराला अनपेक्षित असलेल्या इन्फोसिसच्या घसरत्या तिमाही निकालाने सेन्सेक्स, निफ्टीमधील घसरण आणखी खोलवर गेली. २९७.०८ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,५०० च्याही खाली उतरत २७,४३७.९४ पर्यंत आला. तर ९३.०५ अंश घसरणीसह निफ्टी ८,४०० च्या खाली येत ८,३०५.२५ वर सप्ताहअखेर स्थिरावला.e03विदेशी चलन व्यासपीठावर डॉलरच्या तुलनेत रुपया २४ पैशांनी घसरत ६३.५६ पर्यंत खाली आला. तर सराफा बाजारात दरांमध्ये किरकोळ वाढ नोंदली गेली.
या आठवडय़ात सेन्सेक्स १,००४.१६ अंशांनी घसरला आहे. गेल्या आठपैकी सात व्यवहारांत मुंबई निर्देशांक नकारात्मक प्रवास करता झाला आहे. प्रमुख निर्देशांकाने १४ जानेवारी रोजी यापूर्वीचा किमान स्तर राखला आहे.