केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटील यांनी शनिवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे चित्र आहे. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अर्थसंकल्पातील घोषणेनंतर २०० अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ५० अंकानी घसरला. अर्थसंकल्पाचे वाचन सुरू होण्यापूर्वी सेन्सेक्सचा आलेख चढता होता. मात्र, त्यातील तरतुदींचे आणि करप्रस्तावांचे वाचन झाल्यावर त्यामध्ये घट होण्यास सुरुवात झाली.  जेटली यांनी सेवाकरात वाढ केल्यामुळेही शेअर बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त झाल्याचे आर्थिक विश्लेषकांचे मत आहे.