गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होण्यापूर्वीच भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक बुधवारी सर्वोच्च स्तरावर विराजमान झाले. सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्ससह निफ्टीने तेजी नोंदविली. १९०.११ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक इतिहासात प्रथमच ३० हजारावर, ३०,१३३.३५ पर्यंत गेला. तर ४५.२५ अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९,३५१.८५ या नव्या उच्चांकावर पोहोचला.

मुंबई निर्देशांकाचा यापूर्वीचा सर्वोच्च बंद स्तर ५ एप्रिल २०१७ रोजी २९,९७४.२४ होता. तर सत्रातील ३०,०२४.७४ हा वरचा टप्पा सेन्सेक्सने यापूर्वी ४ मार्च २०१५ रोजी गाठला होता. बुधवारच्या सत्रात ९,३५१.८५ पर्यंत मजल मारणाऱ्या निफ्टीने एकाच दिवसात नवा सर्वोच्च स्तर गाठला आहे. सेन्सेक्स सत्रात ३०,१६७.०९ पर्यंत झेपावला होता.

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
UPSC third topper Donuru Ananya Reddy told Virat Kohli is her inspiration
VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”
Romario Shephard Hits 32 Runs in 20th Over MI vs DC IPL 2024
IPL 2024: ४,६,६,६,४,६ रोमारियो शेफर्डची वानखेडेवर वादळी खेळी, २० व्या षटकात कुटल्या विक्रमी ३२ धावा
IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs GT: ‘पहिल्या चेंडूवर सिक्स मारतो’ समीर रिझवीने भावाला दिलं होतं वचन, व्हीडिओ व्हायरल

गेल्या सलग तीन व्यवहारांतील मिळून मुंबई निर्देशांकाची  ७६८.०५ अंश वाढ राहिली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींसह भारतातील घटनाक्रमाचीही दखल भांडवली बाजाराद्वारे घेतली जात आहे. बुधवारी उशिरा अमेरिकेमार्फत कर सुधारणा लागू होण्याची शक्यता, फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराची मतदानवाढीने मार्गक्रमण तसेच भारतात विदेशी गुंतवणूकदारांचा वाढता निधी ओघ, डॉलरच्या तुलनेत रुपयाची २१ महिन्यांची भक्कमता हे सारे बाजाराच्या वरच्या टप्प्यासाठी पथ्यावर पडत आहे.

गेल्या दोन वर्षांनंतर प्रथमच सेन्सेक्सने ३० हजाराला गवसणी घातली आहे. या दरम्यान मुंबईच्या शेअर बाजारात बुधवारी तब्बल ८०० कंपन्यांच्या समभागांनी दुप्पट मूल्य मिळविले आहे. तर २० समभागांनी मूल्यवाढीत हजाराहून अधिक टक्क्यांची वाढ राखली आहे. २०१७ मध्ये जानेवारीपासून सेन्सेक्समध्ये १३ तर निफ्टीत १४ टक्के वाढ नोंदली गेली आहे. ३० हजार ते ३०,१०० पुढील प्रवासासाठी सेन्सेक्सला ७८४ दिवसांचा कालावधी लागला आहे.

बुधवारी मुंबई शेअर बाजारात बँक तसेच वित्त क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. वाहन क्षेत्रातील समभागांचे मूल्यही वाढले. घसरत्या डॉलरमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची विक्री झाली. तसेच स्थावर मालमत्ता, ऊर्जा निर्देशांकही घसरले. तर सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांचे मूल्य एक टक्क्यापर्यंत वाढले. आयटीसी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, हिंदुस्थान युनिलिव्हर हे ३.२९ टक्क्यांपर्यंत वाढले. रिलायन्ससह भेल, अदानी पोर्ट्स, डॉ. रेड्डीज या समभागांना मात्र घसरणीला सामोरे जावे लागले. सेन्सेक्समधील १८ समभाग तेजीच्या तर १२ समभाग घसरणीच्या यादीत राहिले.

प्रमुख निर्देशांकांची वाढ नोंदली जात असतानाच मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र घसरले.

दलाल स्ट्रीटवर हर्षोत्सव..

मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच सत्रअखेर ३०,००० ला स्पर्श केल्यानंतर दक्षिण मुंबईतील दलाल स्ट्रीट परिसरात बुधवारी दुपारी उत्सवाचे वातावरण होते.  बीएसई इमारतीत गुंतवणूकदारांनी या वेळी प्रातिनिधिक ३० किलो वजनाचा केक कापून सगळ्यांचे तोंड गोड केले. तर दलालांच्या दालनांमध्ये मिठाई वाटून निर्देशांकाच्या उल्लेखनीय प्रवासाचे स्वागत केले गेले.

सावधगिरी हवी – चौहान

३० हजारांवर पोहोचलेल्या सेन्सेक्सच्या हर्षांनंदात मश्गूल न राहता गुंतवणूकदारांनी अधिक सावधगिरीने बाजारात व्यवहार करावेत, असे मुंबई शेअर बाजाराचे मुख्याधिकारी आशीष कुमार चौहान यांनी आवाहन केले. निर्देशांकांच्या मुसंडीमुळे अधिकाधिक गुंतवणूकदार भांडवली बाजाराकडे आकर्षित होणार आहेत, असे नमूद करत चौहान यांनी गुंतवणूकदारांनी बाजारात सूचिबद्ध चांगल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी; अन्यथा म्युच्युअल फंडांमार्फत गुंतवणुकीचा पर्याय निवडावा, असे सुचविले. जीएसटीसारख्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्था आगामी कालावधीत अधिक गती घेईल. ‘अच्छे दिना’ची ही केवळ सुरुवात असून येणारी काही वर्षे अधिक निर्णायक असतील, असे चौहान यांनी या वेळी सांगितले.

तेजीचे चक्र कायम राहण्याचा आशावाद..

  • भारतीय अर्थव्यवस्था आता प्रगतिपथावर असल्याचे भांडवली बाजाराच्या प्रवासावरून दिसते. जीएसटीची अपेक्षित अंमलबजावणी तसेच किमान व्याजदर, कमी महागाई यामुळेही बाजारात उत्साहाचे वातावरण यापुढेही राहील. पंकज पांडे, प्रमुख संशोधक, आयसीआयसीआय डायरेक्ट
  • भारताच्या मूलभूत आर्थिक घटकांमधील सुधार भांडवली बाजाराला वरच्या टप्प्यावर घेऊन जाण्यास साहाय्यभूत ठरला आहे. अनेक कंपन्यांचे मार्चअखेरच्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष वाढीव नफ्याचे आहेत. या भक्कम स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा फारसा विपरीत परिणाम स्थानिक बाजारावर येत्या कालावधीत होणार नाही. प्रसंथ प्रभाकरन, वरिष्ठ अध्यक्ष आणि मुख्याधिकारी, येस सिक्युरिटीज
  • स्थिर राजकीय वातावरणामुळे देशात आर्थिक सुधारणा व गुंतवणुकीबाबत सकारात्मकता आहे. फ्रान्स अध्यक्षपदाच्या पहिल्या टप्प्यातील तसेच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीतील अनुकूल निकाल याने बुधवारी बाजाराला विक्रमी टप्प्यावर नेले. लवकरच लागू होणारी जीएसटी करप्रणाली व मान्सूनचे भाकीत पाहता बाजारात तेजीचे चक्र कायम असेल.  वैभव अगरवाल, प्रमुख संधोशक, एंजल ब्रोकिंग