१४० वर्षांच्या स्थापनेत निर्देशांकांचे सर्व वरचे टप्पे मागे टाकणाऱ्या चालू वर्षांत मुंबई शेअर बाजाराने गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी बजाविली आहे. एकाच वर्षांत तब्बल ६,००० अंशांची उसळी घेणाऱ्या या बाजारात याच वर्षांने १०० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकदारांचा मैलाचा प्रवासही नोंदविला.
भांडवली बाजाराच्या दृष्टिने खरे तर संवत्स (वर्ष) हे आकडय़ाची मोजपापसाठी मानले जाते. हिंदू e07वर्षांप्रमाणेच इंग्रजी वर्षांतील बाजाराचा प्रवासही पाहणे रंजनकारक आहे. २०१४ च्या समाप्तीला बाजाराच्या व्यवहारातील चारच सत्र शिल्लक असताना मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या प्रमुख निर्देशांकाने वार्षिक तुलनेत आतापर्यंत तब्बल २९ टक्के वाढ गाठली आहे. १ जानेवारी ते २४ डिसेंबर २०१४ दरम्यान मुंबई निर्देशांकाने ६,०३८ अंश भर घातली आहे.
देशातील आघाडीच्या भांडवली बाजाराचाही ही प्रगती गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम ठरली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेत उदयास आलेल्या जागतिक आर्थिक मंदीनंतरची ही उंचावणी कामगिरी ठरली आहे.
यापूर्वी २००९ मध्ये ७,८१७ अंश सेन्सेक्स झेप होती. (आधीच्या वर्षांच्या तुलनेत टक्केवारीत ही वाढ ८१ होती.) तर मंदीपूर्वी, २००७ मध्ये मुंबई निर्देशांक उडी ६,५०० अंशांची होती. त्याचबरोबर सलग दुसऱ्या वर्षांत उत्तम निर्देशांक झेप सेन्सेक्सला यंदा घेता आली. २०११ मध्ये बाजाराने नकारात्मक प्रवास केला होता.
२०१४ च्या जवळपास मध्याला केंद्रात नवे पूर्ण बहुमताचे सरकार येण्यापूर्वी त्याच्या आगमनाची तयारी म्हणून सप्टेंबर २०१३ मध्येदेखील मुंबई शेअर बाजार उंचीवर होता. हा कल यंदाच्या मे, जून दरम्यानही दिसला. दिवाळी दरम्यान तसेच त्यानंतरही बाजाराची कमान उंच राहिली. डिसेंबर २०१४ अखेर सेन्सेक्स ३० हजाराला गाठेल, असे बाजार अपेक्षांचे मजले बाजार विश्लेषकांनीही याच मध्यंतरीच्या तेजीवर बांधले होते.

सेन्सेक्सने चालू वर्षांत २८,८२२ हे शिखर गाठले आहे. गुरुवारी बाजार २७,२०८.६१ अंशांवर बंद झाला होता. तर मुंबई निर्देशांकाचा २०१४ मधील आतापर्यंतचा किमान स्तर हा १९,९६३ राहिला आहे. निफ्टीनेही वर्षांतील आतापर्यंतचा ५,९३३.३० हा किमान (फेब्रुवारीमध्ये) व ८,१७४ हा वरचा टप्पा अनुभवला आहे.
देशातील सर्वात मोठय़ा राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही यंदाच्या वर्षांत आतापर्यंत ३० टक्क्य़ांची कमाई केली आहे. विदेशी गुंतवणुकीला चालना मिळालेल्या या वर्षांत बाजारातही विदेशी संस्था गुंतवणूक एक लाख कोटी रुपये झाली आहे.