आगामी आíथक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ठोक किंमतीवर आधारीत महागाईचा दर शून्याच्या वर आलेला असेल व दुसऱ्या तिमाही पासून समभागांच्या उत्सर्जनात (ईपीएस) १४-१७ टक्के दरम्यान वाढ दिसू लागेल, असा आशावाद युटीआय म्युच्युअल फंडाचे कार्यकारी उपाध्यक्ष व वरिष्ठ निधी व्यवस्थापक संजय डोंगरे यांनी व्यक्त केला आहे झ्र्

  • कंपन्यांच्या सद्य आíथक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर आपली काय प्रतिक्रिया आहे?

या तिमाही निकालांच्या बाबतीत एक महत्वाचा निष्कर्ष असा की, या तिमाहीचे निकाल हे अपेक्षांच्या जवळ जाणारे आहेत. आधीच्या दोन तिमाहीच्या निकालांनी अपेक्षाभंग केला आहे. या पाश्र्वभूमीवर यंदाच्या तिमाहीचे निकाल समाधानकारक वाटतात. निर्देशांकात महत्त्वाचे स्थान असलेल्या इन्फोसिस, टीसीएस, रिलायंस इंडस्ट्रीज, अ‍ॅक्सिस बँक यांच्या निकालांबाबत हेच म्हणावे लागेल.

  • कंपन्यांच्या विक्रीत वाढ झालेली असली तरी नफा क्षमता वाढलेली दिसत नाही..

रिझव्‍‌र्ह बँकेने जानेवारी २०१५ पासून व्याज दर कपातीस सुरवात केली. याच दरम्यान जिन्नसांच्या किमतीत घसरण होऊ लागली. या दोहोंचा परिणाम कंपन्यांच्या परिचलन नफ्यावर होण्यास काही कालावधी जावा लागेल. आमचा (फंड घराण्याचा) असा विश्वास आहे की, आगामी आíथक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ठोक किंमतीवर आधारीत महागाईचा दर शून्याच्या वर आलेला असेल व  दुसऱ्या तिमाही पासून समभागांच्या उत्सर्जनात (ईपीएस) १४-१७ टक्के दरम्यान वाढ दिसू लागेल.

  • या आशावादाच्या पाश्र्वभूमीवर बाजाराचे मुल्यांकानावर काय सांगता येईल?

दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने बाजाराचे मुल्यांकन आकर्षक म्हणायला हवे. निर्देशांकाचे सद्य आíथक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीच्या उत्सर्जनाशी गुणोत्तर १३.५-१४ दरम्यान आहे. जे एक वर्षांपूर्वी याहून खूपच वरच्या पातळीवर होते. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीमुळे सध्या बाजाराचे मुल्यांकन गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक पातळीवर असून गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भूराजकीय बदलांचे परिणाम बाजारावर होतील. त्यामुळे बाजारची चढ-उताराची वाटचाल सुरू राहील. परंतु तीन ते पाच वर्षांचा विचार केल्यास बाजार मध्यम कालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक वाटतो.

  •  हे झाले बाजाराच्या ढोबळपणे. जर विविध उद्योग क्षेत्रांच्या बाबतीत बोलायचे तर कुठल्या क्षेत्राबाबत तुम्ही विशेष आशावादी आहात?

सरकार सत्ताबदलानंतर जी काही धोरणे बदलली त्यामुळे आíथक आवर्तनाची दिशासुद्धा बदलली आहे. या दिशा बदलाचे लाभार्ती असलेले  बँका, सिमेंट, पायाभूत सुविधा, वाहन उद्योग, गर बँकिंग वित्तीय कंपन्या या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत. गर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या परिचालन खर्चात ठेवींवर द्याव्या लागणाऱ्या व्याजाच्या खर्चाचा मोठा वाटा असतो. व्याज कपातीमुळे या खर्चात बचत होऊन गर बँकिंग वित्तीय कंपन्यांची नफा क्षमता वाढेल. व्याजाचेदर कमी झाल्यामुळे व्याजाशी निगडीत विक्री असणारे वाहन उद्योग, भांडवली वस्तू या उद्योगांबद्दल आम्ही आशावादी आहोत. तर दुसरया बाजूला ग्राहक उपयोगी वस्तू व औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे मुल्यांकन खूपच अधिक असल्याने या कंपन्यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता कमी वाटते.

  • पुढील एका वर्षांत बाजार किती पारतावा देईल , असे वाटते?

नजीकच्या काळातील बाजाराचा अंदाज वर्तवणे कठीण असते. परंतु बाजाराचा परतावा अर्थव्यवस्थेची वाढ अधिक महागाईचा दर इतका परतावा नेहमीच देतो. ६-६.६० टक्के अर्थव्यवस्था वाढण्याची अपेक्षा व ५ टक्क्याच्या आसपास अपेक्षित असणारा महागाईचा दर लक्षात घेता पुढील एक दोन वर्षांच्या काळात बाजाराच्या परताव्याचा दर १२ ते १३ टक्के असेल.

  • आजच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पत धोरणाकडून काय अपेक्षित आहे?

रिझव्‍‌र्ह बँकेला जानेवारी २०१६ दरम्यान अपेक्षित असलेला किरकोळ किंमतींवर आधारीत महागाचा दर आवाक्यात आहे. याच महिन्यात केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होईल. रिझव्‍‌र्ह बँक या अर्थ संकल्पात मंद अर्थगतीशी सामना करण्याबाबत सरकारकडून काय उपाय योजना केली जाते यावर रिझव्‍‌र्ह बँक आपल्या पत धोरणाची पुढील दिशा ठरवेल. म्हणून पुढील यंदाच्या पतधोरणात फारसे बदल अपेक्षित नसून बहुधा धोरण ‘जैसे थे’च राहील.