भारतातील आघाडीची व एनबीएफसी असलेल्या बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेडने ग्राहक टिकाऊ व्यापारी मालामधील आपला आíथक वाटा १६ टक्क्यांवरुन २४ टक्क्यांवर नेला आहे. सध्या, ग्राहक टिकाऊ व्यापारी मालाच्या वित्तीय बाजारपेठेत आघाडीवर असलेली बजाज फायनान्स देशात विकल्या जाणाऱ्या दर सहा टिकाऊ मालापकी एका टिकाऊ मालाला वित्त पुरवते. या सणाच्या दिवसांमध्ये या कंपनीला दर चार टिकाऊ मालापकी एका मालाला वित्त पुरवण्याचे उद्दीष्टय पार करायचे आहे.  हे उद्दीष्टय साध्य करण्याकरिता बजाज फायनान्स पूर्णतया सज्ज आहे. त्यांचा कर्ज प्रक्रियेकरिता लागणारा वेळ ३ सेकंद इतका अल्प आहे आणि ग्राहकांना वित्त मिळणे सुलभ जावे म्हणून आधार कार्डाच्या माध्यमातून ईकेवायसी दाखल करणारी ती पहिली एनबीएफसी आहे. गेल्या एक दोन तिमाहींमध्ये या कंपनीने आपल्या रिटेलर्सच्या संख्येमध्ये ८,५०० हून १४,००० इतकी वाढ केली आहे आणि टिएर ३ आणि ४ शहरांसह १२४ शहरांमध्ये विस्तार केला आहे.
रॅकोल्ड थर्मोतर्फे पातळ वॉटर हीटरची निर्मिती
मुंबई : पाणी तापवण्याच्या उपकरणांच्या क्षेत्रातील भारतातील आघाडीचा ब्रँड असलेल्या रॅकोल्ड थर्मोने आज वेलिस या सर्वात सडपातळ अशा स्टोअरेज इलेक्ट्रिकल वॉटरच्या आगमनाची घोषणा केली. केवळ २७ सेंटीमीटर खोली असलेल्या वेलिसचे केवळ सडपातळपणा हेच वैशिष्ट नसून या उद्योगात कधीही पाहायला मिळाले नसेल असे धातूचे सुंदर बाह्यरूपही त्याला लाभले आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या इटर्नो स्विफ्ट आणि अल्ट्रो प्लस मालिकेबरोबर वेलिस हाही सॅनिटरी माध्यमांसाठी खास कस्टमाइझ करण्यात आलेला आहे. भारतातली इलेक्ट्रिकल वॉटर हीटरची बाजारपेठ ८५० कोटी रुपयांच्या आसपास आहे. नव्या मालिकेच्या माध्यमातून सॅनिटरी माध्यमातील अस्तित्व आणखी प्रबळ करण्याचा रॅकॉल्डचा इरादा आहे.
‘डीएचएफएल’चे आकर्षक प्रक्रिया शुल्क
मुंबई : गृहखरेदीसाठी अर्थपुरवठा करणारी भारतातील खासगी क्षेत्रातील दुसरया क्रमांकाची खासगी कंपनी डीएचएफएलने दिवाळीनिमित्त दिवाळी योजना जाहीर केली आहे. गृहकर्ज घेणाऱ्या नोकरदारांसाठी ठराविक आणि आकर्षक प्रक्रिया शुल्क आकारण्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबपर्यंत ही योजना लागू असेल. डीएचएफएलची सर्व उत्पादने ग्राहकांच्या गरजांनुरुप तयार करण्यात आली आहेत. कंपनीतर्फे गृहकर्ज, गृहविस्तारासाठी कर्ज, गृहशोभा कर्ज, प्लॉटसाठी कर्ज, गहाणवट कर्ज, गृहभाड्यासाठी वित्तपुरवठा आणि अनिवासी मालमत्तेसाठी कर्ज अशा विविध सेवा दिल्या जातात. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील गृहयोजना विकसनासाठी प्रकल्प कर्ज दिले जाते.
बायर क्रॉपसायन्सची शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन
मुंबई : बायर क्रॉपसायन्सने शेतकरयांसाठी एक देशव्यापी हेल्पलाइन लाँच केली. ही हेल्पलाइन देशभरातल्या शेतकरयांना मोफत तांत्रिक तसंच पीकासंदर्भातला सल्ला देईल. तसंच बायरच्या पीकाचं रक्षण करणारया उत्पादनांचीही माहिती देईल. शेतकरी बायर क्रॉपसायन्सच्या १८००-२००-६३२१ या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर लॅण्डलाइन आणि मोबाइल फोन अशा दोन्ही माध्यमांतून संपर्क करू शकतात. बायर क्रॉपसायन्सच्या उत्पादनांच्या पॅकवर तसंच पॅकेजिंगवर हा हेल्पलाइन क्रमांक छापलेला आहे. सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात आणि मध्यप्रदेश इथल्या चार कॉल सेण्टरमधले आमचे स्थानिक कृषीतज्ज्ञ शेतकरयांच्या शंकांचं निरसन करतील.      
फेडरल बँक व आयआयएफएल दरम्यान भागीदारी
मुंबई : फेडरल बँक या आघाडीच्या बँकेने आयआयएफएल समूहाचा भाग असलेल्या इंडिया इन्फोलाइन लि.सोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. या भागीदारीमार्फत, फेडरल बँकेच्या भारतातील व परदेशातील ग्राहकांना आयआयएफएलच्या उत्तम सेवा दिल्या जातील. देशातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपन्यांपकी एक असलेल्या आयआयएफएलकडून सर्व प्रकारच्या वित्तीय सेवांसाठी अत्याधुनिक टेक्नालॉजीसह अमलबजावणी सुविधा दिली जाते.