संथ आर्थिक विकासाबरोबरच दमदार मान्सून आणि सावरणाऱ्या महागाईच्या छायेत अखेर दिवाळी सुरू झाली. या दिवाळीतील हा तुमच्यासाठीचा गुंतवणूक फराळ..

भारत सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभा असून तरुण वर्गाची मोठी संख्या आणि स्थिर राजकीय नेतृत्वाचा लाभ प्रत्यक्ष दिसू लागला आहे. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर अंमलबजावणीमुळे पुढच्या वर्षीच्या वित्तीय व्याप्तीचा पाया थोडा कमकुवत राहण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे मजबुतीकरण करण्यासाठी हे दोन्ही बदल अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारतीय अर्थव्यवस्था दशकभरात सहा अब्ज डॉलरचा आकडा गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या परिस्थितीत  जागतिक स्तरावर भारत हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आवडीचा पर्याय ठरला आहे.  दीर्घकालीन फायदे मिळवण्याच्या दृष्टीने आपणही गुंतवणुकीच्या संधीबाबत जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

समभाग गुंतवणूक

भारतीय अर्थव्यवस्था वाढत असताना कंपन्यांचा नफाही वाढणार हे स्पष्ट आहे. सर्वसाधारण परिस्थितीत अर्थव्यवस्थेची वाढ सात टक्के तसेच दीर्घकालीन परिस्थितीत चलनवाढीची अपेक्षा सहा टक्क्यांची आहे.  भांडवली बाजाराने १५ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. त्यामुळे समभागांकडून याच प्रमाणात परतावा मिळेल. परिणामी गुंतवणूकदारांनी त्यांच्या खर्च वजा वरकडीच्या ७० टक्के मालमत्ता वर्ग म्हणून गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक ठरतील. सध्याचे सर्वोत्तम धोरण म्हणजे नियमितपणे ‘इंडेक्स ईएफटी’मध्ये गुंतवणूक करणे हे होय. पर्याय म्हणून उत्तम पद्धतीने विभाजित केलेल्या लार्ज कॅपमधील समभागांना दीर्घकालीन परिस्थितीत एक चांगला, ‘रिस्क अ‍ॅडजस्ट’ करणारा परतावा दिला गेला पाहिजे. म्युच्युअल फंडांनाही मागील काही वर्षांमध्ये चांगली लोकप्रियता मिळाली असून किरकोळ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणुकीचा स्थिर प्रवाह ठेवला आहे.

सोने मालमत्तेत गुंतवणूक

जगभरातील भांडवली बाजार उच्चांक गाठत आहेत, तर सोन्याच्या नाण्यांची विक्री नीचांकी स्तराला आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही उत्तम परिस्थिती आहे. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घट झाल्यामुळेही फायदा होऊ शकेल.  भारत सरकारने सोने रोख्याची एक नावीन्यपूर्ण कल्पना आणली असून ते गुंतवणूकदारांसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे सुरक्षित आणि अधिक फायदेशीर साधन आणत आहेत. सोने रोखे वार्षकि २.५ टक्क वार्षकि व्याज आणि मुदतपूर्तीला भांडवली फायद्यांची सवलत हा एक अतिरिक्त फायदा देतात. ते आपत्कालीन परिस्थितीत दुय्यम बाजारपेठेत विकले किंवा खरेदी केले जाऊ शकतात.

– जिमीत मोदी

(लेखक सॅम्को सिक्युरिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)