शेअर बाजाराच्या इतिहासातील आणखी एक संवत्सर मावळले. गेल्या दिवाळीपासून यंदाच्या दिवाळीपर्यंत वर्षभरात निर्देशांकाने दोन अंकी परतावाही दिलेला नसला, तरी ठराविक उद्योगक्षेत्र आणि त्यातील ठरविक कंपन्यांची कामगिरी मात्र डोळ्यात भरणारी आहे. अशी चमकदार कामगिरी करणारे काही शिलेदार. गतकाळातील गुंतवणूकदारांच्या गळ्यातील ताईत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, रिलायन्स कम्युनिकेशन्स वगैरेंचा यात अपवादही लक्षणीयच आहे. अर्थात दूरसंचार, तेल आणि वायू आदी उद्योगक्षेत्रांसाठी एकूण मावळते संवत्सर वाईटच ठरले आहे.

बँकिंग
कर्नाटक बँक     (६७%)
जे अॅण्ड के बँक     (७०%)

आयटी
टेक महिंद्र     (६६%)
फायनान्शियल टेक     (६६%)

भांडवली वस्तू
थरमॅक्स     (३१%)
एआयए इंजिनीयरिंग     (२२%)

ग्राहक-उत्पादने
हिंदुस्तान युनिलिव्हर     (५५%)
गोदरेज कन्झ्युमर      (६२%)

स्थावर मालमत्ता
अनंत राज इंडस्ट्रीज     (८८%)
प्रेस्टिज इस्टेट      (७१%)

वाहन उद्योग
टाटा मोटर्स     (४६%)
मारुती सुझूकी     (२६%)

औषधी उद्योग
वॉखार्ट     (२७७%)
सन फार्मा     (३८%)

तेल व वायू
केर्न इंडिया     (११%)
रिलायन्स इंडस्ट्रीज     (-१०%)

दूरसंचार
भारती एअरटेल     (-३०%)
रिलायन्स कम्यु.     (-२५%)

सीमेंट
जेके लक्ष्मी सीमेंट     (२२१%)
जेके सीमेंट     (२०४%)