ट्रॅक्टर उद्योगाची देशस्तरावरील विक्रीतील वाढ केवळ ५.५ टक्क्य़ांची असताना, सोनालिका ट्रॅक्टरने २०१३-१४ सालात विक्रीत २२ टक्क्य़ांनी वाढ नोंदविली आहे.
ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सोनालिका ट्रॅक्टरच्या विक्रीत वर्षांगणिक भरीव ४० टक्क्य़ांची वाढ झाली आहे. सोनालिकाने राज्यात २० ते ११० अश्वशक्ती क्षमतेचे ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.
२० अश्वशक्तीच्या गार्डनट्रॅक ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची मशागत, नांगरणी अशी कामे करता येतात. देशभरात कंपनीने ८७० हून अधिक डीलर्सचे जाळे विणले असून, १५०० अधिकृत विक्रीपश्चात सेवा केंद्रे कार्यान्वित केली आहेत.