जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी फूड रिटेल चेन स्पार (रढअफ) ने भारतात व्यापार वृद्धीची घोषणा केली आहे. याअंतर्गत कंपनीने २०१७ च्या शेवटी देशभरात २५ स्पार हायपर स्टोअर खोलण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या भारतातील विस्ताराची घोषणा डच प्रधानमंत्री मार्क रूटे यांनी भारत दौ-यावर असताना केली. सध्या भारतात कंपनीचे ३,३०० कर्मचारी कार्यरत असून २०१७ च्या शेवटी हा आकडा दुप्पट होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. नेदरलँडच्या स्पार इंटरनॅशनलने २०१४ पर्यंत ४० देशांतील १२,३०० स्टोअर्सच्या माध्यमातून ३१.९ अब्ज युरोची वैश्विक किरकोळ विक्रीची नोंद केली.