रघुरामन राजन यांचा सरकारला सल्ला
नवी दिल्ली : मध्य आर्थिक आढाव्यात अंदाजित करण्यात आलेला ५.७ ते ५.९% हा विकास दर समाधानकारक निश्चितच नाही. तो अधिक वाढण्याच्या दृष्टीने निर्णायक पावले उचलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण आता अशा निर्णयांच्या शेवटाकडे नाही तर शेवटाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत. प्रकल्पांना जलदगतीने मंजुरी, भांडवली बाजार सुधारणांच्या दिशने कार्यक्रम आणि गुंतवणूकदारांचा विश्वास उंचावणाऱ्या अर्थसंकल्पीय निर्देशनाची नितांत आवश्यकता आहे, असा सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुरामन राजन सध्याच्या अडचणींवरील उतारा सुचविला आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या अर्धवार्षिकात विकास दर ५.४% राहिला आहे. तो उर्वरित कालावधीत ६% असावयासच हवा. उद्योगधंद्यांचे मनोबल, कंपन्यांचा नफा, अधिक सरस औद्योगिक उत्पादन दर आणि सुधारणारा महागाई दर याद्वारे ते साध्य केले जाऊ शकते. वित्तीय पायाभूत क्षेत्राच्या बलस्थानाला अनन्य साधारण महत्त्व देणे गरजेचे आहे. कंपनी रोखे बाजारपेठतील सुधारणा, पायाभूत क्षेत्राची वित्तीय गरज भागविण्यासाठी भांडवली बाजारात सक्षमता यायला हवी.