स्पाइसजेट या हवाई वाहतूक कंपनीतील मारन कुटुंबीयांचे ५८.४६ टक्के समभाग कंपनीचे मूळ मालक अजय सिंग यांच्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी घेतला. या समभागांचे सध्याच्या बाजारभावाप्रमाणे असलेले मूल्य ७०० कोटी रुपये आहे. त्याबरोबरच नव्याने रोख्यांच्या विक्रीतून दीड हजार कोटी रुपयांचे भांडवल उभे करण्याचा निर्णयही घेण्यात आला.गुरुवारी स्पाइसजेटच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तामिळनाडू येथे असलेले कंपनीचे मुख्यालय गुरगाव येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कंपनीच्या मंडळाच्या कलमांमध्येही दुरुस्त्या करण्यात आल्या. कलानिधी मारन, त्यांच्या पत्नी कावेरी कलानिधी, व्यवस्थापकीय संचालक एस. नत्राजेन यांनी आपल्या पदाचे राजीनामे देत नव्या संचालकांसाठी मार्ग मोकळा करून दिला.काही महिन्यांपूर्वी स्पाइसजेट कंपनी आर्थिकदृष्टय़ा संकटात सापडली होती. कंपनीला त्यातून बाहेर काढण्यासाठी मूळ मालक अजय सिंग यांनी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस आर्थिक मदतीद्वारे संजीवनी दिली होती. त्यानंतर संचालक मंडळात बदल होतील, अशी चिन्हे होती. मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे बदल झाले. मारन कुटुंबीयांनी आपले सगळे समभाग सिंग यांच्या नावे केल्यानंतरही ‘अहस्तांतरणीय प्राधान्य समभागां’च्या माध्यमातून ३७५ कोटी रुपयांची गुंतवणूक मारन कुटुंबीयांतर्फे केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.० कंपनीचे एकूण भांडवल २००० कोटी रुपये. त्याची प्रत्येकी १० रुपयांच्या १५० कोटी समभागांमध्ये विभागणी आणि उर्वरित ५० लाख रुपयांची प्रत्येकी १००० रकमेच्या अहस्तांतरणीय संकलित प्राधान्य समभागात विभागणी० भागधारकांची पोस्टाद्वारे मते मागवून प्रस्तावांना मान्यता घेण्यात येणारतपशील अद्यापही गुलदस्त्यातच!० स्पाइसजेटमधील समभाग हस्तांतरण प्रक्रियेतील मूल्यनिर्धारण अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय सिंग हे स्वत: या कंपनीत अधिक भांडवल ओततील किंवा परदेशी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून थेट परकीय गुंतवणूक मिळावी यासाठी प्रयत्न करतील, असे समजते.० प्रत्येकी १००० रुपयांचा एक याप्रमाणे ३७.५ लाख अहस्तांतरणीय संकलित प्रतिदेय समभाग कंपनीतर्फे लवकरच कलानिधी मारन किंवा काल एअरवेज किंवा या दोघांनाही प्राधान्य तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.