सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक समूहातील स्टेट बँक ऑफ हैदराबादने भांडवली पर्याप्ततेत वाढीची निकड ओळखून रोखे विक्रीतून ४०० कोटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षांत म्हणजे येत्या मार्चपूर्वीच ही रोखे विक्री केली जाईल, असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शांतनू मुखर्जी यांनी सांगितले.