तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

गेल्या लेखात नमूद करण्यात आलेला निर्देशांकांना अर्थात सेन्सेक्स ३१,२०० ते ३१,९३७ आणि निफ्टीला ९,७५० ते ९,९५० हा पट्टा (बॅण्ड) राखण्यात या आठवडय़ात यश आले. महत्त्वाचे म्हणजे उत्तर कोरियाने शक्तिशाली अशा हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेऊनही निर्देशांकांनी आपली ‘डू ऑर डाय’ पातळी ३१,२२०/ ९,७५० कायम सांभाळता आली. या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडय़ात निर्देशांकांची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?
Foreign investors invested more than Rs 2 lakh crore in the domestic capital market
परदेशी गुंतवणूकदारांचे दमदार पुनरागमन; सरलेल्या आर्थिक वर्षात २ लाख कोटींची गुंतवणूक

पुढील आठवडा कसा?

शुक्रवारचा बंद – सेन्सेक्स –  ३१,६८७.५२     निफ्टी – ९,९३४.८०

पुढील आठवडय़ात तेजीची वाटचाल ही मुख्यत्वे ३२,३०० / १०,०५० या स्तरावर अवलंबून आहे. ही महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ असेल. या स्तरावर निर्देशांक सातत्याने टिकल्यास प्रथम वरचे उद्दिष्ट ३२,६८६ / १०,१३७ आणि नंतर ऐतिहासिक उच्चांक ३३,००० / १०,३५० या पातळ्या दृष्टिपथात येईल.

पुढील आठवडय़ात निर्देशांक प्रथम ३१,९३७ / ९,९५० व नंतर ३२,३००/ १०,०५० या स्तरावर जाऊन टिकण्यास अपयशी ठरत असेल तर एक हलकीशी घसरण प्रथम ३१,५५०/ ९,८५० व नंतर ३१,२०० / ९,७५० असेल. ही तेजीच्या वातावरणातील संक्षिप्त घसरण असेल व ही घसरण संपल्यावर निर्देशांकांवर पुन्हा तेजीची घोडदौड सुरू होईल.

सोन्याच्या भावाचा आढावा –  आजही सोन्याच्या भावामध्ये ३०० रुपयांच्या बॅण्डमध्ये शिस्तबद्ध हालचाल होत आहे. गेल्या लेखात नमूद केलेले २९,००० रुपयांच्यावर ३०,२०० हे वरचे इच्छित उद्दिष्ट असेल. जे ६ सप्टेंबरला साध्यही झाले. (आजही (शुक्रवारी) सोन्याचा भाव ३०,२०० रुपयांच्यावर आहे). पुढील आठवडय़ात सोन्याचा भाव ३०,००० रुपयांच्यावर सातत्याने टिकल्यास ३०,५०० ते ३०,६०० रुपये ही वरची उद्दिष्ट असतील.

सोने किमतीचा आढावा :

आजही सोन्याच्या भावामध्ये ३०० रुपयांच्या बॅण्डमध्ये शिस्तबद्ध हालचाल होत आहे. गेल्या लेखात नमूद केलेले २९,००० रुपयांच्यावर ३०,२०० हे वरचे इच्छित उद्दिष्ट असेल. जे ६ सप्टेंबरला साध्यही झाले. (आजही (शुक्रवारी) सोन्याचा भाव ३०,२०० रुपयांच्यावर आहे). पुढील आठवडय़ात सोन्याचा भाव ३०,००० रुपयांच्यावर सातत्याने टिकल्यास ३०,५०० ते ३०,६०० रुपये ही वरची उद्दिष्ट असतील.

लक्षवेधी समभाग..

सी. जी. पॉवर लि.

शुक्रवारचा भाव : रु. ८७.१०  

सी. जी. पॉवरचा आजचा बाजार भाव हा २०० (७५), १०० (८३), ५०(८२), २० (८१) या सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर आजचा बाजारभाव आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा ७८ रु. ते ९० रु. असा आहे. रु. ९० च्यावर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट रु. ९८ व दीर्घकालीन उद्दिष्ट ११० ते १२० रुपये असेल या दीर्घकालीन गुंतवणुकीला रु. ७५ चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

आशीष अरिवद ठाकूर

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.