नवउद्यमीना प्रेरक द सुरेश हावरे स्टार्टअप शोलवकरच पाच वृत्तवाहिन्यावर

उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘द सुरेश हावरे स्टार्टअप शो’ प्रसारित होणार असल्याची माहिती या शोचे संशोधक, संकल्पनाकार आणि सूत्रसंचालक डॉ. सुरेश हावरे यांनी नुकतीच येथे पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. सुरेश हावरे म्हणाले, देशात आणि आपल्या राज्यात कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. स्टार्टअपचे अभियान सुरू झाले आहे.

या शोच्या माध्यमातून डॉ. सुरेश हावरे यांनी नवउद्योजकतेला चालना देणारे वातावरण निर्माण करण्यात मोठा हातभार लावला आहे. युवकांमध्ये उद्योजकता वाढावी यासाठी भरपूर प्रय केले आहेत. याचबरोबर ‘उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा’ या पुस्तकाचे लेखन व ‘उद्योग करावा ऐसा’ या पुस्तकांचे लेखन तसेच उद्योगावर आधारित एक मालिका निर्मितीही त्यांनी केली.

सारस्वत सहकारी बँक या शोचे मुख्य प्रायोजक असून पावर्डबाय प्रायोजक विको लॅबोरेटरीज आहे. विकोचे संचालक संजीव पेंढरकर हेही यावेळी उपस्थित होते.

या शो च्या माध्यमातून कृषी, कौशल्य विकास, मनोरंजन, शिक्षण, हाउस किपिंग, फूड इंडस्ट्री, गेम्स, ऑटोमोबाईल सव्‍‌र्हिसेस, ई मार्केटिंग अशा विविध उद्योगात तंत्रज्ञानाचा नेमका आणि प्रभावी वापर करून यशस्वी स्टार्टअप उद्योग ठरलेल्या तरुणांवर आधारित हा शो एकाच वेळी पाच वृत्त आणि मनोरंजन वाहिनीवरून प्रसारित होईल. यामध्ये असीम खरे, शुश्रुत मुंजे, धीरज गवळी, वरुण खन्ना, अभिजित बेर्डे, पवन गुरव, निनाद वेंगुर्लेकर, प्रथमेश, मंदार देसाई, पुरुषोत्तम पाचपांडे, जय आणि रेणू शिरुरकर, वैभव चव्हाण, सुनील जोशी, कैलास काटकर, संकेत देशपांडे, अजय रामसुब्रमणीयम आणि ११ वर्षांचा अग्रवाल सहभागी झाले आहेत.

एकूण विविध अशा २० स्टार्टअप उद्योचे विश्व या शोमध्ये उलगडले जाईल. उद्योगांच्या नव्या वाटा, स्टार्टअपमुळे होत असलेले बदल प्रेक्षकांना समजतील. नवउद्य्मीना प्रेरणा देणारा हा शो २.५० कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन डॉ. सुरेश हावरे यांनी केले. मुंबईत फिल्मसिटीत या शोचे चित्रीकरण झाले असून प्रत्येक स्टार्टअप उद्योगाला अनुरूप गीत, या शोचे वैशिष्टय ठरणार आहे.