करदात्यांनी ऑनलाइन कर विवरणपत्र दाखल करताना वापरात आणलेले पिन क्रमांक अथवा पासवर्डचा कोणाकडेही उलगडा करताना सावधगिरी बाळगावी असा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे. विशेषत: प्राप्तिकर विभागाने अलीकडे तंत्रज्ञानाचा वाढता अवलंब म्हणून करदात्यांशी नियमित सामान्य स्वरूपाच्या संपर्काचे माध्यम म्हणून ई-मेल्सना प्राधान्य दिले आहे. तरी कोणाही करदात्याकडे ई-मेलद्वारे पिन वा पासवर्ड अथवा कोणतीही गोपनीय माहिती मागविली जात नाही. त्यामुळे अशी विचारणा करणाऱ्या फसव्या ई-मेल्सना करदात्यांनी प्रतिसाद देऊ नये, असे प्राप्तिकर विभागाने आवाहन केले आहे.