भांडवली बाजारात सूचिबद्धतेचे दशक साजरे करणाऱ्या टाटा समूहातील टीसीएसने यानिमित्ताने कंपनीच्या भागधारकांऐवजी कर्मचाऱ्यांना खुश करणारा निर्णय गुरुवारी घेतला. कंपनीने कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या लाभांशापोटी २,६२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कंपनीत ३.१८ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. सेन्सेक्समध्ये गुरुवारअखेर ५.०६ कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणाऱ्या टीसीएसची ऑगस्ट २००४ मध्ये बाजारात नोंदणी झाली होती. सेवेत एक वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचारी बोनसला पात्र ठरणार आहेत. कर्मचाऱ्याच्या वर्षांतील सप्ताहाच्या वेतन समकक्ष ही भेट असेल.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नोकरकपातीच्या चर्चेत राहिलेल्या टीसीएसने गुरुवारी सायंकाळी बाजार व्यवहारानंतर नफ्यातील २७ टक्केघसरणीचे व वाढीव, २४,२१९.८० कोटी रुपयांच्या महसुलाचे वित्तीय निष्कर्ष जारी केले.