केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शनिवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करण्यासारखे फार काही नसले, तरी त्याचे उत्साहाने स्वागत करावे, असेही काही नसल्याचे विश्लेषण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. जलदगतीने धावणाऱया सशापेक्षा मंदगतीने धावणारे कासव होण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.