गोदरेजने व्यापक सामाजिक हेतूसाठी विज्ञान व अभियांत्रिकी यांचा मेळ घालणाऱ्या शोधांच्या मालिकेमार्फत जीवन अधिक उत्तम बनवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
अविरत नावीन्यामार्फत भविष्याला आकार देणे, या गोदरेजच्या विचारसरणीनुसार, गोदरेज लॉकिंग सिस्टिम व सोल्यूशन्स (गोदरेज लॉक्स) डिझाइन-आधारित नावीन्यामुळे लॉकिंग सोल्युशन क्षेत्राचे भविष्य कसे आकार घेत आहे ते दर्शवण्यासाठी आधुनिक मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर (एमईसी-3) दाखल करत असल्याचे कंपनीने यानिमित्ताने म्हटले आहे.
पहिल्यांदाच गोदरेज लॉक्सने दाखल केलेल्या मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरच्या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमईसी-३ने लॉकिंग सोल्यूशनच्या स्टाइलची काळजी घेण्यासाठी देशातील डिझाइनमधील दिग्गज दिलीप छाब्रिया यांच्यासोबत भागीदारी केली आहे. या एमईसी-३ मार्फत डीसी डिझाइन या आकर्षक सोल्यूशनना स्पर्श व पोत यांचा अनुभव देणार आहेत. ही सोल्यूशन आíकटेक्ट, इंटेरिअर डिझाइनर व कंत्राटदार अशा बाजारातील प्रमुख प्रभावशाली घटकांसाठी तयार करण्यात आली आहेत.
या उपक्रमाविषयी गोदरेज अँड बॉइसचे कार्यकारी उपाध्यक्ष श्याम मोटवानी म्हणाले, गोदरेजच्या ११८ वर्षांच्या इतिहासात, लॉकिंग सोल्यूशन्स श्रेणीमध्ये, नावीन्य आणण्यासाठी प्रमुख घटक म्हणून विचारात घेतले गेले आहोत. एमईसी-३ मार्फत दर्शवलेली गोदरेजची आकर्षक उत्पादने आमचे डिझाइन-आधारित नावीन्य आणि वाढीच्या पुढील टप्प्याला चालना देत असलेले बाजारातील लक्षणीय अस्तित्व अधोरेखित करतात, असेही त्यांनी सांगितले.
‘डीसी डिझाइन’चे दिलीप छाब्रिया म्हणाले, गोदरेज लॉक्स आणि डीसी डिझाइन या दोन्हींतून नावीन्यासाठीची प्रेरणा आणि उत्कृष्टतेविषयी प्रयत्न प्रतित होतात. आम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक प्रकल्पामध्ये डिझाइन आणि कार्यात्मक उपयुक्तता समाविष्ट करण्यासाठी प्रेरणा घेतली जात असल्याची डीसी डिझाइनची प्रतिष्ठा आहे. युजरचा अनुभव वाढवण्यासाठी तयार केलेल्या डिझाइनपासून मला मोठी प्रेरणा मिळते आणि ग्राहक सहभागाचा एक नवा टप्पा यामुळे समाविष्ट केला जातो, असेही त्यांनी सांगितले.