अमेरिकी चलनाचे मूल्य उंचावत असताना भांडवली बाजारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांचे मूल्यही उंचावले. वधारत्या डॉलरच्या रूपात वाढीव महसुलाच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांकडून आलेल्या मागणीने हे समभाग तीन टक्क्यांपर्यंत भाववाढ मिळवून गेले. माहिती निर्देशांकदेखील जवळपास सव्वा टक्क्याने वधारला. मुंबई शेअर बाजारात क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही हाच निर्देशांक तेजीत वरचढ राहिला. वधारत्या डॉलरमुळे एकंदरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची भांडवली बाजारावर मूल्यवधारणेची कामगिरी सुरू असताना अमेरिकेतील कंपनी खरेदीने टेक महिंद्रच्या समभाग मूल्यातही २.९७ टक्क्यांची भर टाकली.
माइंडट्री    रु. १,२३४.१५    (+५.५२%)
हेक्झावेअर टेक    रु. २२३.५०    (+३.६९%)
केपीआयटी टेक    रु. १७२.२०    (+१.५६%)
विप्रो    रु. ५७२.३०    (+१.२५%)
एचसीएल टेक    रु. १,६४८.६५    (+१.०९%)
टीसीएस    रु. २,६०५.४५    (+१.०८%)
ओरॅकल फिनसव्‍‌र्ह    रु. ३,२९०.०५    (+१.०७)
इन्फोसिस    रु. ४,२२१.७०    (+१.००%)