नवीन आर्थिक वर्षांच्या सुरू होण्याबरोबरच ‘अप्रेजल’ आणि ‘बोनस’चा हंगाम देखील येतो! प्रत्येक जण त्याचा प्रभावीपणे उपयोग कसा करायचा याचे नियोजनसुध्दा करत असतो. तुमच्यापैकी अनेक लोकांनी सुट्टीतील सहलीचे, वाहन किंवा दागिन्यांच्या खरेदीचे नियोजनदेखील केले असेल. वॉरेन बफेटच्या अनुयायांनी तर नक्कीच समभागांमध्ये गुंतवणूक केली असेल. यापुढे तुम्हाला तुम्ही कष्टाने मिळवलेल्या तुमच्या उत्पन्नाची गुंतवणूक करतेवेळी अतिशय हुशारी दाखवावी लागेल.

‘व्हॅल्यू इनवेस्टिंग’ म्हणजे गुंतवणूक करण्याआधी समभागांची पात्रता किंवा ‘इंट्रिन्सिंक’ मूल्य तपासावे आणि दुसरे म्हणजे लक्षित गुंतवणूक हे होय.

‘हायपोथेटिकल पोर्टफोलिओ’मध्ये समभाग निर्धारण गुंतवणुकीच्या प्रदर्शनावर कसे प्रभाव पाडू शकते हे दाखवते. एकाच संचाच्या समभागांसाठी वेगवेगळे निर्धारण असलेले ३ पोर्टफोलियो किमान —८.५% आणि कमाल +१८.५% पर्यंत परतावा देतात.

गुंतवणूक शैलींचा (एकाग्र गुंतवणूक आणि वैविध्यपूर्ण गुंतवणूक) यांचा लक्षित गुंतवणूक हा सुवर्ण मध्य आहे. वैविध्यपूर्ण गुंतवणुकीतील ५०+ आणि केंद्रित गुंतवणूक अंतर्गत १० किंवा त्याहून कमी समभागांच्या तुलनेत लक्षित गुंतवणुकीची शिफारस केली जाते. यामुळे पुरेसे जोखीम परिवर्तन आणि अर्थपूर्ण परतावा आवर्तन या दोन्ही विभागांमधले सर्वोत्तम घटक देऊ  केले जाऊ शकतात.

जोखमेच्या बाबतीत काही अभ्यासांनी, कंपनीच्या बाबतीतील जोखमी क्षेत्रांमधले १५—२० समभाग घेऊन पुरेशा प्रमाणात परिवर्तीत करता येते, हे सिद्ध केले आहे. अतिरिक्त महत्वपूर्ण निर्धारण नियम (जसे – कोणत्याही एका समभागा अंतर्गत १०% असू नयेत) प्रदर्शनाच्या आवेगाला पुढे कमी करू शकतात.

परताव्याच्या बाबतीत सांगायचे तर केवळ १५—२० व्यवसाय असणे उच्च विश्वास असलेल्या समभाग संकल्पनांमध्ये अर्थपूर्ण निर्धारणाची मुभा देते आणि एकंदरीत पोर्टफोलियो परताव्याचे आवर्तन करते. अमेरिकेतील एका रोचक अभ्यासाने निधी व्यवस्थापकांचा केवळ उच्च विश्वास असलेले पोर्टफोलिओ ते काढत असलेल्या ‘वेरी फंड्स’वर मात करतात आणि तेदेखील कोणतीही भयंकर जोखीम/आवेग नसताना, असे सिद्ध केले आहे.

जेव्हा लक्षित गुंतवणुकीकडे आपण वळता तेव्हा ‘व्हॅल्यू इनवेस्टिंग’ हा मुद्दा अस्तित्वात येतो. १५—२० समभागांचा एक लक्षित पोर्टफोलिओ बनवण्यासाठी, त्यांची निवड करण्यासाठी सर्व ज्ञान आणि परिश्रम पणाला लावावे लागतात. आता असा प्रश्न उपस्थित होतो की, तुमच्या पोर्टफोलिओसाठी हे १५—२० समभाग कसे निवडावेत?

आम्ही समभागांची निवड करण्यासाठी QGLPसंकल्पनेचे अनुसरण करतो :

  • Q – व्यवसाय आणि व्यवस्थापनाचा दर्जा
  • G – उत्पन्नातील वाढ
  • L – दर्जा आणि वाढीची दीर्घकालीनता आणि
  • P – खरेदीची ग्रा किंमत.

या अभ्यासावरुन असा अनुमान निघतो की, व्यक्तीने स्पष्ट धोरणासोबत लक्षित पोर्टफोलिओला विचाराधीन घेतले पाहिजे. सर्वप्रथम जिथे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जोखमीचे विश्लेषण केले गेले पाहिजे तिथे आणि दुसरे म्हणजे जिथे निरोगी अल्फासाठी अपेक्षा असेल अशा ठिकाणी. दोन्हीचे संमिश्रण ग्रा परताव्याऐवजी अपवादात्मक परतावा देते.

(लेखक मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज लिमिटेडच्या गुंतवणूक उत्पादने विभागाचे प्रमुख आहेत.)