अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हने संभाव्य व्याजदर वाढ तूर्त लांबणीवर टाकण्याचे बुधवारी जाहीर केले. अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने असा निर्णय घेतला जाणार असल्याचेही बँकेने स्पष्ट केले. फेडरल रिझव्‍‌र्हचे पतधोरण सप्टेंबरच्या मध्यावर आहे. फेडने २००८-०९ पासून व्याजदर शून्यवत स्थिर ठेवले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दरवाढीचे अंदाज बांधले जात होते.
जपानच्या सरकारी बँकेच्या प्रमुखांनी चीनबाबत आशावाद व्यक्त केला. चीनची अर्थव्यवस्था वार्षिक ७ टक्के दराने प्रवास करेल, असे वक्तव्य त्यांनी केले.
सरकारकडून ठोस आर्थिक उपाययोजना होत असल्याचे मानून चीनमधील सर्वच प्रमुख भांडवली बाजारांत पुन्हा एकदा तेजीचे पडघम वाजू लागले. तेथे दोन महिन्यांतील सर्वोत्तम निर्देशांक झेप नोंदली गेली.