स्विस बँकेत अनेक भारतीयांचा काळा पैसा असल्याची चर्चा ऐन निवडणुकीत पुन्हा सुरू झाली असतानाच त्याबाबतची कोणतीही माहिती स्वित्र्झलड सरकार देत नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
जी२० राष्ट्र गटांमध्ये सामील या उभय देशांदरम्यान अशा माहितीचे आदानप्रदान  एप्रिल २००९मध्ये झालेल्या परिषदेत मान्य करण्यात आले होते, याचे स्मरण स्वित्र्झलडच्या इव्हेलाईन विडमर शलम्फ यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी त्यांना करून दिले आहे.
भारत आणि  स्वित्र्झलडमधील दुहेरी कर प्रतिबंध करारातील अटी-शर्थीनाही हा देश दाद देत नसल्याची अर्थमंत्र्यांची तक्रार आहे. या करारांतर्गत स्विस बँकेतील भारतीयांच्या बँक खात्याबाबतची माहिती कर विभागाला मिळविण्याची तरतूद आहे.
स्वित्र्झलड हा बँकिंग गोपनीयता पाळण्यात विश्वास ठेवणारा देश असून त्यामुळेच अशी माहिती देणे म्हणजे गोपनीयतेचा भंग होतो, असे कारण त्यांनी पुढे केले आहे.

जानेवारी २०१४ मधील देशाच्या खनिज उत्पादनाच्या रु. १९,३६९ कोटींच्या मूल्यात वरील प्रमुख सहा घटकांचे ९५% योगदान आहे.
‘कोल-इंडिया लि.’ चालू आर्थिक वर्षांत ४८२ मे. टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य गाठणे कठीण असल्याचे स्पष्ट केले आहे. तर देशांतर्गत कोळसा-पुरवठय़ाच्या अभावी ‘एनटीपीसी’चे २०१४-१५ सालात १५० लाख टन कोळसा आयात करण्याचे नियोजन आहे.