स्वत:ऐवजी कुटुंबाला प्राधान्य; अन्य विम्याबाबतही सजग

विमाधारक महिला या स्वत:च्या आरोग्यापेक्षा कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य देत असल्याचे निरिक्षण समोर आले आहे. याबाबत एका खासगी विमा कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात आरोग्य विम्याविषयीची जागरुकता महिलांमध्ये अधिक असल्याचे दिसून आले आहे.
आरोग्य, प्रवास, मोटर, घर आदी बाबतीतील जोखमीविषयी त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स’कडून ऑनलाइन पाहणी करण्यात आली. या पाहणीत ८७६ महिलांकडून प्रतिसाद नोंदविण्यात आला.
विम्याविषयी जोखीम व जागरुकता याविषयी दृष्टिकोन पाहणीत – महिला स्वत:च्या आरोग्याच्या (४७%) आणि सुरक्षेच्या (२१%) तुलनेत महिला त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याला (८६%) व सुरक्षेला (८२%) अधिक महत्त्व देतात, असे आढळून आले आहे.
वाहतुकीचे सर्व नियम पाळले जातील आणि अपघात रोखण्यासाठी वाहने काळजीपूर्वक चालवले जाईल याची काळजी ६०% महिला घेतात.
५१% महिला प्रतिबंधात्मक उपाय करण्याला महत्त्व देतात. ३०% महिलांना गृह विमा खरेदी करायचा आहे.
आरोग्य विम्याविषयी जागरुकता सर्वाधिक ९५% आहे; ८४% महिला आरोग्य विमा योजनेंतर्गत कवच घेतल्याचा दावा करतात; ७०% महिलांकडे मोटर विमा योजना असते.
भारतीय महिला स्वतची ओळख घडवत असताना आपल्या कुटुंबाचे आरोग्य आणि सुरक्षा यांना प्राधान्य देत असल्याचे ८६% महिलांच्या प्रतिसादातून समोर आले आहे. अलीकडेच ओढवलेल्या मोठय़ा संकटांना विचारात घेता, महिला दिवसेंदिवस सावध होत आहेत आणि त्यांच्या घराचे व कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी पावले उचलत आहेत. त्यांनी दिलेल्या प्रतिसादावरून हे स्पष्ट होत असून, त्यांनी पुढीलप्रमाणे महत्त्व दिले आहे – निरोगी राहणे (७१%), पुरेशी बचत करणे (६३%), प्रवास करताना किंवा गाडी चालवताना सावध राहणे (५३%).
अनेक महिलांनी आरोग्याबाबत सावध पवित्रा घेतला असला तरी बहुसंख्य महिलांनी योग्य विमा कवचाने सुरक्षित केले आहे. हे प्रामुख्याने आरोग्य विम्याच्या बाबतीत आढळत असून, तब्बल ८४% महिलांनी आरोग्य विमा घेतल्याचे नमूद केले. तसेच, ७०% जणींनी मोटर विमा कवच घेतल्याचे आणि ३६% जणींनी गृह विमा योजना घेतल्याचे सांगितले. ‘जोखीम’ या शब्दाबद्दल त्यांच्या मनात काय येते असे विचारले असता, ‘मुलांना ट्रिपला एकट्याने जाऊ देणे’ यास सर्वाधिक ४२% जणांनी रेटिंग दिले. यातून त्यांनी कुटुंबाला प्राधान्यक्रम दिला. त्यानंतर ‘रस्ते अपघाताचा सामना करणे’ यास २७% जणींनी, तर ‘गुंतवणुकीमध्ये पसे गमावणे’ यास २१% जणींनी महत्त्व दिले.
आयसीआयसीआय लोम्बार्ड जीआयसीचे दावा विभागाचे प्रमुख संजय दत्ता या सर्वेक्षणाबाबत म्हणाले, आज महिला विविध प्रकारच्या भूमिका निभावत असताना त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यावर व कल्याणावर अधिक भर देतात. त्या संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगतात. आमच्या पाहणीतील सहभागी बहुसंख्य महिलांनी योग्य विमा कवचामार्फत स्वतला किंवा कुटुंबाला सुरक्षित केले आहे, हे उल्लेखनीय आहे.