portfolio4एआयए इंजिनीयिरग ही सध्या तरी भारतातील एक आधुनिक फोर्जिग आणि इंजिनीयिरग कंपनी असून सीमेंट आणि खाणकाम या दोन महत्त्वाच्या उद्योगांना पूरक व्यवसाय ती करते. दुर्दैवाने हे दोन्ही उद्योग गेल्या दोन वर्षांपासून मंदीत असल्याने साहजिकच त्याचा फटका एआयएला बसला. मात्र तरीही गेल्या आíथक वर्षांसाठी कंपनीने २,०१८.२८ कोटीच्या उलाढालीवर ४,१४१.५७ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ३८% ने जास्त आहे. सीमेंट, स्टील आणि मायिनग कंपन्यांसाठी एआयए इंजिनीयिरगने पारंपरिक फोर्जेड स्टीलच्या उत्पादनाऐवजी ‘हाय क्रोम मिल इंटर्नल्स (एचसीएमआय)’चे उत्पादन सुरू केले. त्याचा गुणवत्ता आणि उत्पादन खर्च या दोहोंचा फायदा या कंपन्यांना मिळाला. मात्र सध्या स्टील, सीमेंट आणि मायिनग हे तिन्ही व्यवसाय मंदीत असल्याने, एआयएची झगडत सुरू असलेली वाटचाल आणखी दोन वर्षे सुरू राहील. अर्थात याही परिस्थितीत कंपनी आपली उत्पादन क्षमता येत्या दोन वर्षांत दुप्पट करत आहे यावरूनच कंपनीच्या आत्मविश्वासाची खात्री पटते. जवळपास कुठलेही कर्ज नसलेली आणि उत्तम व्यवस्थापन असलेली ही कंपनी दोन वर्षांत जगातील सर्वात मोठी एचसीएमआयचे उत्पादन करणारी पहिली भारतीय कंपनी ठरणार आहे. सध्याच्या परिस्थितीत धोकाविरहित कंपन्या कशा शोधाव्यात असा प्रश्न कोणी विचारला तर ज्या कंपन्यांना कर्ज नाही किंवा अतिशय कमी आहे अशा नफ्यातील कंपन्या निवडण्यावर भर द्यावा, असे ढोबळमानाने उत्तर देता येईल. ज्या गुंतवणूकदारांना उत्तम कंपन्यात दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी एआयएसारखी कंपनी एक चांगली संधी ठरू शकते. भरणा झालेल्या एकूण भागभांडवलापकी केवळ ७.६८% भांडवल सामान्य जनतेकडे आहे हेही इथे लक्षात घ्यायला हवे.
stocksandwealth@gmail.com

av-05
सूचना :
लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये कुठलीही गुंतवणूक नाही तसेच या कंपनीशी कुठलाही संबंध नाही. सुचवलेल्या कंपनीकडून लेखकाने कुठलेही मानधन घेतलेले नाही.