पस्तीस वर्षांपूर्वी स्थापन झालेली स्किपर आज ट्रान्समिशन टॉवर्सचे उत्पादन करणारी भारतातील अव्वल तीन कंपन्यांतील एक कंपनी आहे. ईपीसी तसेच इंजिनीयिरग क्षेत्रातील ही कंपनी विविध उत्पादनांत असून ती एलपीजी सििलडर तसेच प्लास्टिक्सचे पाइपही तयार करते. कंपनीचे भारतात पाच कारखाने असून तिचे १६०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. ट्रान्समिशन टॉवर्सच्या बाजारपेठेत सुमारे १५% हिस्सा असलेल्या स्कीपरने तोटय़ात चालणाऱ्या स्टील पाइपमधून बाहेर पडून आता पीव्हीसी पाइप्स उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला आहे. स्किपरचा पूर्व भारतामधील पीव्हीसी पाइप्स बाजारपेठेतील हिस्सा १०% आहे. पीव्हीसी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असल्याने कंपनीने अल्पावधीतच ५०० डीलर्सचे जाळे भारतभर पसरविले आहे. उत्तम गुणवत्तेसाठी कंपनीने जपानच्या सेकुसुई तर नेदरलॅण्ड्सच्या वेविन या बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर तांत्रिक करार केले आहेत. येत्या दोन वर्षांत कंपनी आपल्या पीव्हीसी पाइपची उत्पादन क्षमता २२,५०० टनांवरून एक लाख टनांपर्यंत वाढवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनी आपल्या उत्पादन क्षमतेत वाढीचा खर्च कुठलेही वाढीव कर्ज न घेता करणार आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीने कर्जाचा भर हलका करून आपले डेट इक्विटी गुणोत्तर २.१ वरून १.३ पर्यंत खाली आणले आहे.

आपल्या देशांत येती पाच र्वष तरी ऊर्जा क्षेत्रासाठी आश्वासक वाटतात. जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत (दरडोई ३१३ किलोव्ॉट) भारतातील दरडोई विजेचा वापर केवळ  ९० किलोव्ॉट आहे. तसेच वीज उत्पादनाबरोबर ती दूरवर वाहून नेण्यासाठी ट्रान्समिशन टॉवर्सची कमतरताही आहे. सरकारने ऊर्जा उत्पादनावर दिलेला भर तसेच जाहीर केलेली ‘उदय योजना’ स्कीपरसारख्या कंपनीला फायद्याची ठरेल. म्हणूनच येती काही र्वष खूप आश्वासक ठरतील. कंपनीने डिसेंबर २०१५ साठी जाहीर केलेले निकालाप्रमाणे ३६१.५७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १८.७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गत वर्षीच्या तुलनेत तो १०% जास्त आहे. कंपनीला नुकतीच उत्तर प्रदेश पॉवर अ‍ॅण्ड अ‍ॅण्ड ट्रान्समिशन कॉर्पोरेशन तसेच तिस्ता व्हॅली पॉवर ट्रान्समिशनकडून ५०० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. तसेच कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने २,५०० कोटी रुपयांच्या निविदा भरल्या आहेत आणि यातील बहुतांशी निविदा कंपनीला मिळू शकतात.

सध्या शेअर बाजारातील मंदीमुळे हा शेअर तुम्हाला १२५-१४० रुपयांना मिळू शकेल. मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी हा हाय बिटा शेअर फायद्याची खरेदी ठरू शकेल.

डेट इक्विटी गुणोत्तर 

( Debt Equity Ratio )

सध्याच्या स्थितीत हे सर्वात महत्वाचे गुणोत्तर आहे. कंपनी दोन मार्गाने पसे उभारू शकते त्यातील पहिला मार्ग म्हणजे भागभांडवलद्वारे आणि दुसरा कर्ज काढणे. कर्ज आणि भांडवलाचे हे प्रमाण मात्र योग्य असावे. कमी भागभांडवल आणि अत्यल्प कर्ज असेल तर अर्थात प्रति समभाग उत्पन्न उत्तम राहील. कुठलेही कर्ज नसेल तर व्याजाचा खर्च कमी आणि त्यामुळे फायदा जास्त. आपण गुंतवणूक करीत असलेली कंपनी किती कर्जात आहे आणि तिची त्यामुळे आíथक पत काय असू शकते, याचा अंदाज या गुणोत्तरामुळे येतो.

  • दीर्घ मुदतीचे कर्ज / भरणा झालेले भागभांडवल ( Long Term Debt/ Paid up Equity Capital) :

शक्यतो हे गुणोत्तर दोनपेक्षा जास्त नसावे. जितके गुणोत्तर कमी तितकी कंपनीची आíथक स्थिती चांगली असे हे सोपे गुणोत्तर आहे. मात्र कंपनी कुठल्या क्षेत्रात आहे हेही पाहणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही ज्या कंपनीच्या शेअरचे गुणोत्तर तपासत आहात त्या क्षेत्रातील इतर कंपन्यांचे गुणोत्तरदेखील तुलनेने अभ्यासणे जरुरी आहे. उदा. जहाज, सीमेंट, बँक या उद्योगातील कंपन्यांचे डेट इक्विटी गुणोत्तर खूप जास्त असू शकते. अशा वेळी त्या कंपनीची व्याज देण्याची आणि कर्ज परतफेडीची क्षमता तपासणे आवश्यक असते. ते कसे तपासायचे हे आपण पुढील लेखांत पाहू या.

stocksandwealth@gmail.com