सध्याच्या बाजारात काय घ्यायचं असा प्रश्न मलाही अनेक वेळा पडत असतो. अनिश्चित बाजारात सुरक्षित खरेदी म्हणजे औषधी कंपन्यांचे शेअर्स. त्यातून ज्या कंपन्या सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवीत आहेत असे शेअर्स तर तुम्हाला आगामी काळात भरपूर फायदा करून देणारे ठरू शकतात. अलेम्बिक फार्मा ही अशीच एक कंपनी. सध्या भारतातील पहिल्या २५ कंपन्यांमध्ये अलेम्बिकचे स्थान असून जगभरात सुमारे ७५ देशांतून कंपनीची उत्पादने विकली जातात. २००७ मध्ये प्रवर्तकांच्या चौथ्या पिढीने सूत्रे हातात घेतल्यापासून कंपनीने अनेक नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे. अलेम्बिकचे ग्लायकोडीन, एझिथ्रोल, अल्थ्रोसिन, विकोरील इ. महत्त्वाचे ब्रँड घरा-घरात माहिती आहेतच परंतु आता कंपनीने जागतिक बाजारपेठेत पदार्पण करून आंतरराष्ट्रीय जेनेरिक उत्पादनातही मोठा वाटा उचलला आहे. दुसऱ्या तिमाहीसाठी कंपनीने जाहीर केलेले आíथक निकाल अपेक्षेपेक्षा उत्तम आहेत. कंपनीने ९२१.६२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २५२.६७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो २०१% ने वाढला आहे. सध्या कंपनी स्पेशलिटी थेरपीजवर लक्ष केंद्रित करीत असून त्यात प्रामुख्याने काíडओलोजी, गायनेकोलोजी आणि मधुमेह यांचा समावेश आहे. या खेरीज कंपनी सिक्कीममध्ये नवीन अत्याधुनिक फॉरम्युलेशन प्लांट उभारत असून यंदाच्या वर्षांअखेरीस तेथे उत्पादन सुरू होईल. येत्या दोन वर्षांत कंपनी नवीन विपणन प्रणाली अवलंबीत असून आगामी काळात त्याचा फायदा कंपनीला निश्चित होईल. अलेम्बिकचा टेल्झी हा नामांकित ब्रँड सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून यंदा कंपनीने जवळपास २० उत्पादने बाजारात आणली आहेत. गेली तीन वष्रे नफ्यात वार्षकि २९.५४% वाढ दाखवणाऱ्या अलेम्बिक फार्माचे भविष्यातील चित्रदेखील आश्वासक वाटते. गेल्या ऑगस्टमध्ये ३३५ रुपयांना सुचवलेला हा शेअर गुंतवणूकदारांना १००% नफा देतोय. मात्र तरीही राखून ठेवावा असाच हा शेअर आहे. ज्या गुंतवणूकदार वाचकांनी गेल्या वेळी संधी गमावली होती त्यांना अजूनही हा शेअर खरेदी करायला हरकत नाही. कंपनीच्या एकूण शेअर्सपकी सामान्य जनतेकडे केवळ १३.२७% शेअर्स असलेल्या या कंपनीचे शेअर्स तुमच्या पोर्टफोलियोमध्ये जरूर ठेवा.

अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड (बीएसई कोड : ५३३५७३)

 

5

 

nstocksandwealth@gmail.com