अर्थसाक्षरतेचे मानसशास्त्र  भाग-२

Financial Personality

प्रत्येकाला जर आपले आíथक व्यक्तिमत्त्व व्यवस्थित समजले तर आपली आíथक प्रगती साधणेही शक्य आहे. एखाद्या व्यक्तीला स्वत:चा आíथक स्वभाव माहीत नसेल तर तिला आíथक ध्येय गाठणे अवघड होते.

आपण सातत्याने पशांचा विचार करत असतो. दररोज व्यावहारिक स्तरावर म्हणायचं झालं तर बससाठी सुट्टे खिशात आहेत का? या महिन्यात कपडे खरेदी करणे योग्य ठरेल का? गॅसचा नवीन सििलडर कधी आणायचा? घरभाडे वेळेवर द्यायला पाहिजे; इथपासून गृहकर्जाचे हप्ते, वाहन कर्जाचे हप्ते, गुंतवणूक, बचत तसेच म्युच्युअल फंडात एसआयपी वेळेवर जात आहे ना, असे अनेक विचार मानत घोळत असतात. वेगवेगळ्या व्यक्तींचे या प्रश्नांसाठीचे प्रतिसाद व्यक्तिपरत्वे भिन्न असतात.

प्रत्येकाची पशासंबंधी विचार करण्याची पद्धत, त्याच्या भावना, सवयी, दृष्टिकोन आणि कृती यातून त्याचे व्यक्तिमत्त्व बनते यालाच आíथक व्यक्तिमत्त्व ( financial personality) असे म्हणतात. प्रत्येकाला जर आपले आíथक व्यक्तिमत्त्व व्यवस्थित समजले तर आपली आíथक प्रगती साधणेही शक्य आहे.

समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने फोन करून एखादा पत्ता विचारला आणि दिलेल्या पत्यावर कसे जाता येईल म्हणून तुम्हाला विचारले, तर तुमचा पहिला प्रश्न असेल तुम्ही कोठे आहात? त्या व्यक्तीचे ठिकाण, त्याचे तुमच्या पासूनचे अंतर, वाहतुकीसाठी वापरात येणारं साधन, लागणारा वेळ, त्यानुसार त्या व्यक्तीला मार्गदर्शन करणे सोपे जाईल. पण जर त्या व्यक्तीला सांगता आले नाही किंवा माहीत नसेल की तो कोठे आहे तर तिला अपेक्षित पत्त्यावर कसे जायचे ते तुम्हाला सांगता येणे कठीण आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला स्वत:चा आíथक स्वभाव माहीत नसेल तर तिला आíथक ध्येय गाठणे अवघड होते. हे कौशल्य मिळवण्यासाठी आपल्याला हे समजणे फार गरजेचे आहे की, पसे खर्च करणे किंवा गुंतवणूक करणे या बाबतीत आपले वर्तन, आपल्या सवयी कशा आहेत.

प्रत्येकाचा स्वभाव हा त्याचे अंगभूत गुण, घर आणि सामाजिक वातावरण, शिक्षण आणि अनुभव यांच्या आधारे बनणारी समज व जाण यानुसार आकाराला येतो आणि त्यामधून त्याची वर्तणूक आणि व्यक्तिमत्त्व  बनते. त्या त्या व्यक्तीच्या वर्तणुकीचा एक साचा  (pattern) तयार होतो आणि त्याच एका समान पद्धतीने वर्तणूक आणि त्यांचे समान परिणाम मिळतात.

तुम्ही आपल्या आसपास, घरात असे लोक  पाहिले असतील. जे चांगले कमावत असतात, पण तरी पशांच्या बाबतीत अभावग्रस्त असतात आणि अशाही व्यक्ती पाहिल्या असतील की ज्या जास्त कमावत नसतात तरी पुरेसे पसे बाळगून असतात; काही लोक पशाचा विषय काढला की बेचन होतात, तर काही पशांचा विषय काढला कीत्यांच्यात उत्साह संचारतो; काही पशांना दु:खाचं मूळ मानणारी, तर काही पशांना दु:खावरचा उपाय मानणारी; काही पशांबाबत कंजूष तर काही उधळे; काही खूप चौकशी करून पशाबाबत निर्णय घेणारे तर काही चौकशी न करता गुंतवणूक करणारे, तर काही बेफिकिरीने निर्णय घेणारे; तर असे अनेक जण पशाचा निर्णय दुसऱ्यावर सोपवणारे तर दुसऱ्यावर अजिबात काही न सोपवणारे असेही काही. काही जण गुंतवणुकीतून पसा घालवणारे तर काही गुंतविलेले पसे वाढले की लगेच काढून घेऊन मोठय़ा नफ्याला मुकणारे. काही माणसांसाठी पसा आहे असा विश्वास असलेले, तर काही पशांसाठी माणूस आहे अशी ठाम धारणा बाळगून जगणारे. काही पसा साठवावा, काही पसा गुंतवावा मानणारे तर काहींसाठी पसा फक्त खर्च करण्यासाठी, काहींना पशांवर प्रेम, काहींना पशांविषयी राग तर काहींना पशांची भीती, काही आपल्याकडे पसे असतील तर आपली मुलेबाळे सांभाळतील असे मानणारे, आपल्यापकी प्रत्येक जण यांपकी कोणत्याना कोणत्या प्रकारात मोडणारा असतो. प्रत्येक स्वाभावाचे ठरावीक साचेबद्ध वर्तन असते. कोणतेही वर्तन आणि त्या अनुषंगाने आíथक स्वभाव बदलण्यासाठी अगोदर स्वतच्या आíथक स्वभावाची ओळख होणे आणि त्या स्वभावाबद्दल जागरूक असणे गरजेचे असते. मग त्याचे परिणाम आणि कारणे कळली की आपल्याला आपल्या स्वभावात कोणते बदल करावेत हे कळू शकते. त्यातून मग आपल्याला आवश्यक कोणते उपाय करावेत हेसुद्धा शिकता येते. स्वभाव कळला की मग वर्तनातील अभाव भरून काढता येतो.

सुदैवाने मानवाला स्वतच्या विकासासाठी स्वतमध्ये अभ्यासाने बदल घडवून आणता येणे शक्य आहे. या आíथक स्वभावांविषयीचे विविध पलू आपण येणाऱ्या लेखांमधून पाहणार आहोत. मुख्य आíथक व्यक्तिमत्त्वांचे प्रकार कोणते? त्यांचे वर्तन कोणते? त्याचे परिणाम काय? आणि त्याविषयीचे काही उपाय याविषयी माहिती आपण पाहणार आहोत.

मागील महिन्यात प्रसिद्ध झालेल्या लेखावर ज्या प्रतिक्रिया मिळाल्या त्याबद्दल आभार. या, तसेच भविष्यातील लेखांवर वाचकांनी अशाच प्रतिक्रिया व आपले अभिप्राय कळवावेत.

kiranslalsangi@gmail.com लेखक पुणेस्थित समुपदेशक आहेत.