‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ या प्रश्नाचे उत्तर चतुर सल्लागार हे असून विक्रेता नव्हे असे आहे. ‘जिप्सी’ने हे धोरण आयुष्यभारासाठी राबविले तर त्यांची निवृत्ती नक्कीच सुखाची असेल. ‘‘मी आणखी वीस वष्रे जगलो, तर परताव्याचा दर काय असेल?’’ असा प्रश्न निरोप घेताना या जिप्सीकडून आला होता. आजच या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे; परंतु काही गुंतवणूकदारांना याचे नेमके उत्तर हवे असते.

उरी उगवला आत्मसुधाकर
वनी चांदणे दाटे
बाग बहरली जिकडे
तिकडे बोथट झाले काटे
छायेसम मज गमले खोटे
सत्यचि ते उफराटे
रसलंपट मी तरि मज
अवचित गोसावीपण भेटे
वाट उजळली चिरयात्रेची
भिडली रात्र पहाटे
आटे आता तृष्णा, वाटे
त्रिभुवन अति कोंदाटे

Redevelopment of Abhyudaya Nagar Colony through open tender
मुंबई : खुल्या निविदेद्वारे अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी
documentary making and Changers of Attitudes
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..
How to deal with a difficult boss
तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….

‘तव नयनांचे दल हलले गं’ किंवा ‘तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात’सारख्या शृंगारिक कविता स्फुरलेल्या कवी बा. भ. बोरकरांचीच ही वेगळ्या ढंगातील कविता. ‘रसलंपट मी तरि मज अवचित गोसावीपण भेटे,’ असे म्हणणाऱ्या बोरकरांचा आज जन्म दिवस. बोरकरांना जसे गोसावीपण आले तसेच गोसावीपण आलेल्या एका भटक्याचे हे नियोजन आहे.
पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून वास्तुरचनाकार झालेल्या या फिरस्त्याने महाविद्यालयीन जीवनात पुरुषोत्तम करंडक स्पध्रेत लौकिकही मिळविला. आजच्या आघाडीच्या अनेक रंगकर्मीसोबत पुण्यातील रंगमंचावर कामही केले. नाटकाच्या पटकथा, संवाद, प्रकाश योजना, नेपथ्य या नाटकाच्या वेगवेगळ्या अंगांचा मनमुराद आस्वाद घेतलेल्या नाटय़कर्मीची नोकरीत शिरल्यावर नाटकाची हौस मागे पडली. महाराष्ट्र शासनाच्या नगर नियोजन खात्यात नोकरीला सुरुवात करून एक खासगी नोकरी केल्यानंतर १९९८ मध्ये स्वत:च्या व्यवसायास पुणे जिल्हय़ातील एका शहरात व्यवसायास सुरुवात केली. व्यवसायात यशाचे उच्चांकही गाठले. उत्तम व्यवसाय सुरू असताना शनिवार-रविवारी एखाद्या जिप्सीप्रमाणे सहय़ाद्रीच्या डोंगररांगातून मनमुराद भटकंती केली. रंगभूमी व गिर्यारोहण हे दोन छंद कार्यमग्नतेतही जोपासले.
मालमत्ता विकास हे क्षेत्र आíथक आवर्तनाशी निगडित असल्याने व्यवसायातील चढउताराचा अनुभव घेतला. २०१२ मध्ये काही कोटींची कामे केलेल्या फिरस्त्याकडे सध्या कामाची वानवा आहे. केलेल्या कामाचे पसे मिळालेले नाहीत, काही कर्जही झाले होते. ते सर्व कर्ज फेडून टाकले आहे. आíथक वर्ष २०१५ मध्ये व्यावसायिक नुकसान सहन करावे लागल्याने व्यवसायातील विरक्तीचा अनुभव येत असलेल्या या फिरस्त्याने मागील रविवारी पुण्यात आवर्जून भेट घेतली. साठीच्या उंबरठय़ावर उभे असल्याने व व्यवसायातील कठीण काळामुळे या फिरस्त्यास चिंतेने ग्रासले असावे. कधीकाळी काही कोटींची शेष शिल्लक असलेल्या असणाऱ्या या फिरस्त्याकडे आज केवळ पंचवीस लाखांची श्रीशिल्लक व काही व्यावसायिक येणे बाकी आहे. हे पंधरा-वीस लाखांचे येणे कधी येईल (किंवा येणार नाही) हे आज सांगणे कठीण आहे. या २५ लाखांचे कसे नियोजन असावे, जेणेकरून मुलीच्या विवाहानंतर आमचा उदरनिर्वाह होऊ शकेल, या प्रश्नाचे समाधान अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रिकेटच्या खेळात परिस्थितीप्रमाणे वेगवेगळ्या रणनीती वापरल्या जातात त्याप्रमाणे गुंतवणुकीच्या क्षेत्रातही वेगवेगळ्या रणनीती (Strategy) वापरल्या जातात. सेवानिवृत्तीच्या उंबरठय़ावर उभे असताना वापरावयाच्या रणनीतींपकी पुन:संतुलन नावाने ओळखली जाणारी एक रणनीती आहे. अमेरिकेत व्यवसायाने पोर्टफोलिओ मॅनेजर असलेल्या जॉन बॉगलने ही रणनीती पहिल्यांदा वापरली. त्यांनी याला kRebalancing Strategyl असे नाव दिले. जॉन बॉगलने प्रींस्टन विद्यापीठातून पीएचडीसाठी लिहिलेल्या प्रबंधाचे शीर्षक होते – Mutual Funds can make no claims to superiority over the Market Averages.  आजच्या या ‘जिप्सी’च्या नियोजनात याच रणनीतीचा वापर करण्यास ‘जिप्सी’ला सुचविले आहे. पुन:संतुलन रणनीतीत दोन समभाग गुंतवणूक करणारे फंड व दोन रोखे गुंतवणूक करणारे फंड निवडणे आवश्यक असते. ‘जिप्सी’ने यूटीआय डायनॅमिकचा बाँड फंड व डीएसपी ब्लॅक रॉक इन्कम ऑपॉच्र्युनिटी या दोन रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडाची व फ्रँकलिन टेम्पल्टन ब्लू चिप व एचडीएफसी ग्रोथ या दोन फंडांची निवड केली. ‘जिप्सी’ फारशी जोखीम न स्वीकारणारा गुंतवणूकदार (Moderately Conservative) असल्याने ५० टक्के समभाग व ५० टक्के रोखे गुंतवणूक असावी असे ठरले. १ नोव्हेंबर २०१० रोजी प्रत्येकी १,२५,००० रु. निवडलेल्या फंडांत गुंतविले. दरवर्षी १ नोव्हेंबरच्या पाच वर्षांच्या एनएव्ही व त्या वर्षांतील परताव्याचा दर सोबतच्या कोष्टकात दिला आहे. दर वर्षी झालेला नफा किंवा तोटय़ानुसार ५० टक्केसमभाग व ५० टक्के रोखे हे प्रमाण स्थिर राखले. २०११ मध्ये रोखे गुंतवणुकीत नफा, तर समभाग गुंतवणुकीत तोटा झाल्याने रोखे गुंतवणुकीतील नफ्यातून अधिकाची समभाग गुंतवणूक केली. २०१२ मध्ये समभाग व रोखे दोन्ही गुंतवणुकांतून नफाच झाला. समभाग गुंतवणुकीच्या नफ्यातून रोखे गुंतवणूक केली. २०१३ मध्ये रोखे व समभाग गुंतवणुकीतून नफा झाला २०१४ मध्ये समभाग गुंतवणुकीतून मोठा नफा झाला. हा नफा समभागातून काढून घेऊन वेळीच रोखे गुंतवणुकीत वळविल्याने २०१५ मध्ये गडगडलेल्या शेअर बाजारामुळे होणारे संभाव्य नुकसान टळले.
मागील एका लेखात फ्रँकलिन टेम्पल्टन ब्लू चिप फंडाचे निधी व्यवस्थापक आनंद राधाकृष्णन यांच्या एका वाक्याचा संदर्भ दिला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘काअ’ अर्थात वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचे काम हे आपल्या ग्राहकाची जोखीम स्वीकारण्याची क्षमता ओळखून त्यानुसार वेगवेगळे म्युच्युअल फंड सुचवून संपत्तीची निर्मिती करणे होय; परंतु अनेक सल्लागार रोखे गुंतवणूक करणारे फंडांची शिफारस करीत नाहीत.
ग्रीक अक्षर अल्फा म्हणजे गुंतवणूकदाराने उचललेल्या जोखमीच्या प्रमाणात किती परतावा मिळवला, हे मोजण्याचे परिमाण आहे. आज अनेक ‘पीएमएस’ व्यवस्थापक दोन-अडीच या दरम्यान अल्फा आपल्या गुंतवणूकदारांना परताव्याच्या रूपाने देत आहेत. म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांसाठी चतुर सल्लागार चांगला परतावा देऊ शकतो. पाच वष्रे झालेल्या या गुंतवणुकीत वापरलेल्या पुन:संतुलनाने १.८५ इतका अल्फा गुंतवणूकदारांना दिला. साध्या भाषेत सांगायचे तर या रणनीतीने २५ नोव्हेंबर रोजी २२.३७ टक्के परतावा मिळवून दिला. याच दिवशी बॅलन्स्ड फंड गटातील आयसीआयसीआय बॅलन्स्ड फंडाने सर्वाधिक १७.८६ टक्के, तर पाचव्या क्रमांकावरील बिर्ला सन लाइफ ९५ या बॅलन्स्ड फंडाने १५.३७ टक्के परतावा मिळवून दिला. पाच वर्षांच्या कालावधीत दर वर्षी अव्वल बॅलन्स्ड फंडाने दिलेल्या परताव्यापेक्षाही प्रस्तुत रणनीती वापरून मिळालेला परताव्याचा दर अधिक आहे. या प्रकारे हुशार सल्लागार आपल्या अशिलांसाठी संपत्तीची निर्मिती करू शकतो; परंतु मोजके सल्लागार आपल्या अशिलाच्या गुंतवणुकीचा नियमित आढावा घेतात. बहुसंख्य सल्लागार पाच ते दहा वर्षांसाठी (किंवा कायमची) ‘एसआयपी’ सुरू करण्यात धन्यता मानतात. आजच्या ‘जिप्सी’सारख्या व्यवसायाच्या अवघड टप्प्यावर असल्याने गुंतवणूकदाराच्या हातात हात धरून पावले टाकणे आवश्यक आहे.
असा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा बॅलन्स्ड फंडात बचत गुंतविणे हे योग्य आहे का, असा वाचकांना प्रश्न पडणे साहजिक आहे. समभागकेंद्रित बॅलन्स्ड फंडाच्या गुंतवणुकीत ६५ टक्क्यांपेक्षा कमी, तर एमआयपी प्रकारच्या फंडात २० टक्क्यांहून अधिक समभाग गुंतवणूक असत नाहीत. ज्यांची जोखीम स्वीकारण्याची क्षमता २० टक्क्यांहून अधिक, पण ६५ टक्क्यांहून कमी आहे अशा गुंतवणूकदारांसाठी हे धोरण आदर्शच आहे. ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ या प्रश्नाचे उत्तर चतुर सल्लागार हे असून विक्रेता नव्हे असे आहे. ‘जिप्सी’ने हे धोरण आयुष्यभरासाठी राबविले, तर त्यांची निवृत्ती नक्कीच सुखाची असेल. ‘‘मी आणखी वीस वष्रे जगलो, तर परताव्याचा दर काय असेल?’’ असा प्रश्न निरोप घेताना या जिप्सीकडून आला होता. आजच या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे; परंतु काही गुंतवणूकदारांना याचे नेमके उत्तर हवे असते. पुढील वीस वर्षांत ही रणनीती ११.५० ते १२.५० टक्के परतावा निश्चितच देऊ शकेल. हा परतावा कुठल्याही बॅलन्स्ड फंडाने दिलेल्या परताव्यापेक्षा अधिक असेल हे नक्की.

वसंत माधव कुळकर्णी
shreeyachebaba@gmail.com