फंडाविषयक विवरण

13

 

14

उद्यापासून डिसेंबर महिन्याला म्हणजेच करदात्यांच्या प्राप्तिकर वाचवण्यासाठी ‘धडपडीं’नाही सुरुवात होईल. कर वजावटपात्र गुंतवणुकांच्या यादीत २०हून अधिक पर्यायांचा समावेश आहे. यापकी ‘इक्विटी िलक्ड सेिव्हग्ज स्कीम’ अर्थात ‘ईएलएसएस’ हा एक अव्वल परंतु दुर्लक्षित पर्याय आहे. ज्यांची जोखीम स्वीकारून अधिक परतावा मिळविण्याची तयारी आहे अशा करदात्यांसाठी हा एक पर्याय आहे. अशा ‘ईएलएसएस’ योजनांपकी आयडीएफसी टॅक्स अ‍ॅडव्हाण्टेज (ईएलएसएस) फंड ही एक आदर्श योजना आहे.
या फंडाचा बीएसई २०० हा संदर्भ निर्देशांक असून १ वर्ष, ३ वर्षे, ५ वर्षे या कालावधीतील फंडाचा परतावा संदर्भ निर्देशांकाहून अधिक राहिला आहे. फंडाची कामगिरी मागील चार वर्षांत कमालीची सुधारली आहे. एसबीआय टॅक्स गेन, बिर्ला सनलाइफ टॅक्स प्लान, एचएसबीसी टॅक्स सेव्हर या सारख्या स्पर्धक फंडांपेक्षा या फंडाची कामगिरी या कालावधीत अव्वल झाली आहे. हा मल्टिकॅप प्रकारचा ईएलएसएस फंड आहे. फंड व्यवस्थापनानुसार फंडाने रुपयाच्या अवमूल्यनामुळे फायदा होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादने निर्माते औषध निर्माणसारख्या उद्योगातील कंपन्यांतून गुंतवणूक वाढविली तर तेल व वायू, धातू यांच्यातील गुंतवणूक कमी केली. तेजीची चाहूल लागल्यामुळे मागील दोन वर्षांपासून फंडाने गुंतवणुकीतील सुरक्षित क्षेत्रे समजल्या जाणाऱ्या उद्योगातून संक्रमित होत आíथक आवर्तनाच्या दिशाबादालाचा फायदा होणाऱ्या निवडक उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढविल्याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. फंडाने प्रामुख्याने आíथक सेवा, भांडवली वस्तू बांधकाम दूरसंचारसारख्या उद्योगातून गुंतवणूक वाढविली. फंडाने केलेल्या नवीन गुंतवणुका प्रामुख्याने मिडकॅप प्रकारात केल्या आहेत. उदाहरणादाखल बँकेने स्टेट बँकेतील गुंतवणूक कमी करून अधिक आकर्षक डीसीबी बँकेत गुंतवणूक केली. मागील पाच वष्रे एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना फंडाने ११ टक्के परतावा दिला आहे. मागील ३६ महिने दरमहा ५०० रुपयेप्रमाणे १८००० गुंतविणाऱ्या गुंतवणूकदाराचे आजचे बाजारमूल्य २११६७.९८ असून परताव्याचा दर ११.६७ टक्के आहे. मागील पाच वष्रे ५०० रुपये दरमहा गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकीचे आजचे बाजार मूल्य ३६५०७.५६ असून परताव्याचा दर ८.९७ टक्के आहे. तेजीच्या काळात अव्वल परतावा देणाऱ्या या फंडाने मंदीची कमीत कमी झळ गुंतवणूकदारांना बसेल याची काळजी घेतली आहे.

18

mutualfund.arthvruttant@gmail.com