portfolio4साधारण नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २००६ मध्ये कॅम्लिनपासून वेगळे अस्तित्व (डीमर्ज) निर्माण करून कॅम्लिन फाइन सायन्सेस उदयाला आली. या कालावधीत कंपनीने उत्तम कामगिरीबरोबरच विस्तारही वाढवला. २००९ मध्ये फूड अ‍ॅण्टिऑक्सिडंट्समधील जगातील सर्वात मोठी निर्यातदार कंपनी म्हणून मान मिळवतानाच कंपनीने भारताबाहेरही उत्पादनाला सुरवात केली. यासाठी सीएफएस यूरोप एसपीए ही इटालियन कंपनी ताब्यात घेतली तर ब्राझीलमध्ये लॅटिन अमेरिकन बाजारपेठ ताब्यात घेतली. तर आता  ही कंपनी चीन आणि मेक्सिको येथे आपल्या उपकंपन्या स्थापन करीत आहे. तारापूर येथील आपले अत्याधुनिक कारखान्यातून उत्पादन घेणाऱ्या कॅम्लिन फाइन सायन्सेस आता गुजरातमध्ये दहेज एसईझेड मध्ये २०१७ पासून हायड्रोकिनोन आणि वॅनिलीनचे उत्पादन सुरू करेल. मार्च २०१५ अखेर समाप्त आíथक वर्षांसाठी कंपनीने ४२७.९० कोटी रुपयांच्या उलाढालीवर गेल्या वर्षीचा तुलनेत ३२ टक्क्य़ांनी जास्त म्हणजे २५.८ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. हा लेख लिहितानाच हा शेअर १०० रुपयांच्या वर गेल्याने आणि त्याच्या प्राइस अìनग (पी/ई) गुणोत्तरामुळे थोडा महाग वाटेल. मात्र प्रत्येक घसरणीला खरेदी करण्याजोगा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा स्मॉल कॅप तुमच्या पोर्टफोलिओत राखून ठेवा.
stocksandwealth@gmail.com
av-02
सूचना :
लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये कुठलीही गुंतवणूक नाही तसेच या कंपनीशी कुठलाही संबंध नाही. सुचवलेल्या कंपनीकडून लेखकाने कुठलेही मानधन घेतलेले नाही.