प्राप्तीकर कायद्याप्रमाणे करदात्याचे उत्पन्न हे पाच भागात विभागले जाते. सर्व प्रकारच्या करदात्यांना म्हणजेच व्यक्ती, िहदू अविभक्त कुटुंब, भागीदारी संस्था, कंपनी, धर्मादाय संस्था वगरे त्यांचे उत्पन्न पाच भागातच  विभागून दाखवावे लागते.
हे पाच भाग आहेत :
१. वेतन : या मध्ये वेतनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा
समावेश होतो.
२. घरापासून मिळणारे उत्पन्न : यामध्ये घरभाडय़ाचा
समावेश होतो.
३. धंदा आणि व्यवसायातून मिळणारे उत्पन्न.
४. भांडवली नफा : यात भांडवली संपत्तीच्या
विक्रीतून होणाऱ्या नफ्याचा समावेश होतो.
५. इतर उत्पन्न : जे उत्पन्न वरील भागात गणले
जात नाही ते इतर उत्पन्नात गणले जाते.
आता आपण भांडवली नफा आणि त्याच्या कराविषयीच्या तरतुदीचा आढावा घेऊ –
भांडवली संपत्ती म्हणजे काय?
भांडवली नफा हा भांडवली संपत्तीच्या विक्रीतून होतो. आधी भांडवली संपत्ती म्हणजे काय हे समजले पाहिजे. प्राप्तीकर कायद्याप्रमाणे भांडवली संपत्ती म्हणजे करदात्याची कोणत्याही प्रकारची संपत्ती, धंदा व्यवसायाच्या संबंधातली असो व नसो. या भांडवली संपत्तीमध्ये समावेश होणाऱ्या संपत्तीची उदाहरणे :
१. स्थावर मालमत्ता जसे घर, इमारत, दुकान, जमीन, वगरे.
२. वैयक्तिक वापरासाठी असलेली जंगम संपत्तीचा समावेश भांडवली संपत्तीमध्ये होत नाही; परंतु सोने, चांदी आणि प्लेटीनमचे किंवा इतर मौल्यवान धातूचे दागिने, किंवा कपडय़ांमध्ये शिवलेले हे धातू, इतर वस्तूंमध्ये, फíनचरमध्ये, भांडय़ांमध्ये वापरलेले हे मौल्यवान धातू यांचा समावेश भांडवली संपत्तीमध्ये होतो.
३. पुराणवस्तूंचा संग्रह, चित्रे, शिल्पे किंवा कालाकुसारीच्या वस्तू,
४. शेत जमीन जर नगरपालिका किंवा महानगर पालिका, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकार क्षेत्रात जेथील लोकसंख्या १० हजारापेक्षा जास्त आहे. किंवा या क्षेत्राची लोकसंख्या १० हजार ते एक लाख दरम्यान आहे या क्षेत्राच्या २ किलोमीटरच्या आत असेल तर किंवा या क्षेत्राची लोकसंख्या एक लाख ते १० लाख मध्ये आहे या क्षेत्राच्या ६ किलोमीटरच्या आत असेल तर किंवा या क्षेत्राची लोकसंख्या १० लाखांच्या वर आहे या क्षेत्राच्या ८ किलोमीटरच्या आत असेल तर अशी भांडवली संपत्ती म्हणून गणली जाते.
५. या संपत्तीबरोबरच त्यावरील हक्काचासुद्धा समावेश होतो.
म्हणजेच वरील पकी संपत्तीची विक्री केली तर त्यावर होणारा भांडवली नफा हा करपात्र असतो.
भांडवली संपत्तीमध्ये खालील संपत्तीचा समावेश होत नाही –
१. धंदा किंवा व्यवसायासाठी वापरण्यात येणारा माल, कच्चा माल, वगरे.
२. करदात्याच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या वैयक्तिक वापरासाठी असलेली जंगम संपत्ती उदा. कपडे, फíनचर, वाहन, वगरे.
३. शेतजमीन जी वर नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर आहे.
४. केंद्र सरकारने जरी केलेले ६.५% सोने रोखे, १९७७ किंवा ७% सोने रोखे, १९८० किंवा राष्ट्रीय संरक्षण सोने रोखे
५. केंद्र सरकारने जारी केलेले स्पेशल बिअरर रोखे
६. केंद्र सरकारने सोने जमा योजना, १९९९ अंतर्गत जारी केलेले सोने जमा रोखे.
म्हणजेच वरील पकी संपत्तीची विक्री केली तर त्यावर होणारा भांडवली नफा हा करपात्र नसतो.
av-08

भांडवली संपत्तीचे दोन प्रकार :
प्राप्तीकर कायद्याप्रमाणे भांडवली संपत्तीचे दोन प्रकार आहेत –
१. लघु मुदतीची संपत्ती : जी संपत्ती विक्रीच्यापूर्वी ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत घेतली असेल तर ती लघु मुदतीची संपत्ती समजली जाते. परंतु खालील संपत्तींसाठी हा कालावधी १२ महिन्यांचा आहे :
१. शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे समभाग आणि प्रिफ्रेन्शिअल शेअर्स
२. इतर नोंदणीकृत रोखे
३. युटीआय चे युनिट्स
४. इक्विटी फंडाचे युनिट्स
५. झिरो कुपन रोखे
२. दीर्घ मुदतीची संपत्ती : जी संपत्ती विक्रीच्यापूर्वी ३६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत घेतली असेल (शेअर्स वगरेंसाठी १२ महिने) तर ती दीर्घ मुदतीची संपत्ती समजली जाते.
कालावधी कसा ठरवतात :
जर संपत्ती करदात्याने विकत घेतली असेल तर वर सांगितल्याप्रमाणे लघु आणि दीर्घ मुदतीचा कालावधी हा खरेदी केल्याच्या आणि विक्री केल्याच्या तारखेनुसार ठरविला जातो. काही खास व्यवहारात तो खालील प्रमाणे ठरवला जातो
१. जर करदात्याला संपत्ती वारसाहक्काने, भेट, कुटुंबाची वाटणीद्वारे किंवा इच्छापत्राद्वारे मिळालेली असेल तर त्याचा कालावधी हा पूर्वीच्या मालकाने विकत घेतलेल्या तारखेपासून ठरविला जातो. उदा. मुलाला वारसाहक्काने घर २०१५ साली मिळाले हे घर त्याच्या वडिलांनी १९९० मध्ये विकत घेतले असेल तर मुलासाठी हा कालावधी १९९० पासून गणला जातो. त्याने हे घर २०१५ मध्येच विकले तर त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल.
२. बोनस शेअर्सचा कालावधी हा बोनस शेअर्स मिळाल्याच्या दिवसापासून होतो. उदा. जर कंपनीचे शेअर्स २०१० मध्ये विकत घेतले असतील आणि त्यावर मार्च २०१५ मध्ये बोनस मिळाला असेल आणि सगळे शेअर्स मे २०१५ मध्ये विकले तर २०१० मध्ये घेतलेल्या शेअर्सवरचा नफा हा दीर्घ मुदतीचा असेल आणि बोनस शेअर्सवरचा नफा हा लघु मुदतीचा असेत. राईट शेअर्सचा कालावधीसुद्धा राईट मिळालेल्या दिवसापासून गणला जातो.
विक्री/हस्तांतरणाचे प्रकार :
प्राप्तीकर कायद्याप्रमाणे खालील विक्रीची व्याख्या व्यापक आहे त्यामध्ये इतर व्यवहारांचा समावेश आहे असे काही व्यवहार खालीलप्रमाणे –
१. संपत्तीची विक्री, अदलाबदल
२. संपत्तीचा हक्क सोडणे
३. संपत्तीचा सक्तीचा ताबा
४.    स्थावर मालमत्तेचा ताबा खरीदाराला देणे
५. कोणताही व्यवहार ज्यात स्थावर मालमत्ता हस्तांतरित होते.
तसेच खालील व्यवहार हे विक्री/हस्तांतरण मध्ये गणले जात नाहीत – उदा.
१. िहदू अविभक्त कुटुंबाकडून संपूर्ण किंवा अपूर्ण विभागलेली संपत्ती
२. वारसाहक्काने, भेट, कुटुंबाची वाटणीद्वारे किंवा इच्छापत्राद्वारे हस्तांतरण झालेली संपत्ती
३. डिबेंचर्स किंवा रोख्यांचे शेअर्समध्ये परिवर्तन
भांडवली नफा :
भांडवली नफा हा फक्त भांडवली संपत्ती विक्री/ हस्तांतरण केले तर होतो. यासाठी खालील मुद्दे महत्वाचे आहेत –
१. विक्री केलेली संपत्ती भांडवली संपत्ती आहे हे तपासले पाहिजे. उदा. जर पगारदार व्यक्तीने घरातील फíनचर विकले तर त्यावर होणारा भांडवली नफा का करपात्र नाही कारण घरातील वैयक्तिक वापरासाठी असलेले फíनचर हे भांडवली संपत्तीच नाही.
२. त्या संपत्तीची विक्री/हस्तांतरण या वर्षांत झाली पाहिजे. आपण केलेला व्यवहार हा वर सांगितल्या प्रमाणे विक्री/हस्तांतरणच्या व्याखेत बसतो का ते तपासून पहिले पाहिजे.
३. भांडवली नफा हा लघु मुदतीचा आहे किंवा दीर्घ मुदतीचा आहे हे बघितले पाहिजे.
४. भांडवली नफा हा विक्री किंमत (विक्रीचा खर्च वजा जाता) आणि खरेदी किंमत यामधील फरकाने गणला जातो.
५. खरेदी किमतीमध्ये खरेदी किंमत आणि सुधारणा खर्च समावेश होतो.
६. जर संपत्ती करदात्याने स्वत खरेदी केली नसेल आणि ती वारसाहक्काने, भेट, कुटुंबाची वाटणीद्वारे किंवा इच्छापत्राद्वारे हस्तांतरण झालेली असेल तर त्याची खरेदी किंमत ही ज्याने ती ज्या किमतीला खरेदी केली असेल ती किंमत भांडवली नफ्यासाठी विचारात घेतली जाते. उदा. मुलाला वारसाहक्काने घर २०१५ साली मिळाले हे घर त्याच्या वडिलांनी १९९० मध्ये १० लाख रुपयांना विकत घेतले असेल तर मुलासाठी भांडवली नफ्यासाठी खरेदी किंमत ही १० लाख रुपये समजली जाते.
७. जर संपत्ती दीर्घमुदतीची असेल तर खरेदी किंमत ही महागाई निर्देशांक मूल्याप्रमाणे गणली जाते.
८. जर संपत्ती १ एप्रिल १९८१ पूर्वी खरेदी केली असेल तर १ एप्रिल १९८१ रोजीचे वाजवी बाजार मूल्य हे महागाई निर्देशांक मूल्याप्रमाणे गणून भांडवली नफा काढावा.
pravin3966@rediffmail.com

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
Decline in bad loans of public sector banks
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात घसरण