शेअर्समध्ये गुंतवणूक असता त्याच शेअरचा कॉल विकल्प विकण्याची गुंतवणूक निती..
नग्न विकल्प म्हणजेच निव्वळ कॉल किवा निव्वळ पुट विक्री करणाऱ्यांचा तोटा अमर्याद असतो व नफा मर्यादित असतो, या एकमेव कारणांमुळे सर्वसामान्य लोक विकल्प विकण्यापासून दूर असतात. परंतु प्रत्येक दिवसागणिक विकल्पांची किंमत कमी होत असते व त्यामुळे निव्वळ कॉल किवा निव्वळ पुट विक्री करणाऱ्यांच्या दृष्टीने हा फायदा असतो.
av-02
कव्हर्ड कॉल
(Covered Call):
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विकत घेतलेल्या म्हणजे आपल्या डिमॅट खात्यात बाळगलेल्या शेअर्सचाच कॉल विकणे यासाठी कव्हर्ड कॉल डावपेचाचा वापर खूपच फायदेशीर ठरतो. खरे तर हा एक ‘हेजिंग’चा प्रकार आहे. आपल्याजवळ मुलभूतदृष्ट्या सशक्त शेअर्स आहेत. ज्याबद्दल आपली खात्री आहे की या शेअर्सची किंमत दीर्घ मुदतीचा विचार करता वाढणारच आहे. प्रत्येक वर्षी शेअर्सपासून होणारा दीर्घ मुदतीचा करमुक्त नफाही आपल्याला घ्यायचा आहे. तसेच त्यापासून मिळणारा करमुक्त लाभांश आणि इत्तर फायदेही दरवर्षी मिळणार असल्याने मला हे शेअर्स काहीही झाले तरी विकायचे नाहीत. परंतु सध्या बाजाराची मध्यावधीतील दिशा मंदीची आहे किंवा एका विशिष्ट पातळीनंतर बाजार खाली येईल असे वाटत असल्याने मी त्या शेअर्सचा कॉल विकतो आहे. या प्रकाराला कव्हर्ड कॉल असे म्हटले जाते. आपल्या गुंतलेल्या भांडवलावर  परताव्याव्यतिरिक्त प्रत्येक महिन्याला भाडे मिळवण्याचा हा मार्ग आहे.
कॉल विकताना जर काळजी घेतली जसे – १) अस्थिरता कमी होण्याची शक्यता आहे २) त्या शेअरचा भाव (कॅश मार्केटमध्ये) कमी होण्याची शक्यता असता ३) बाजार / शेअर वर जाणार नाही, विशिष्ट पातळीत रेंगाळणार असेल, खाली जाणार असेल किंवा सुदृढीकरकरण (Consolidation) अवस्थेत असल्यास कॉल विकल्यास जास्त फायदा होईल. त्याचवेळी जर जो कॉल विकायचा आहे त्याची निवड योग्य पद्धतीने केल्यास नफा मिळण्याची शक्यता जास्त राहील. या ठिकाणी वाचकांना सुचित करावेसे वाटते की, विकलेल्या कॉल्सची किंमत विकल्प समाप्तीला (Options Expiry) ८० -८५ टक्के प्रसंगात शून्य होते म्हणजेच विकणाऱ्यास फायदा होतो.
कोणता कॉल विकावा हा अभ्यास ्रकरण्याजोगा प्रश्न निश्चितच आहे. ओटीएम स्ट्राईकचा कॉल विकला तर अधिमूल्य कमी मिळेल. कारण हे कॉल स्वस्त असतील. पण आपल्या जवळ असलेल्या शेअर्सच्या किमतीमध्ये होणाऱ्या वाढीची शक्यता जास्त असेल व जरासा ओटीएम किंवा आयटीएम स्ट्राईकचा कॉल विकला असता अधिमूल्य जास्त मिळेल. कारण हे कॉल महाग असणार. शक्यतो त्या स्ट्राईकचा कॉल विकावा ज्या किमतीच्या पुढे शेअर्सची किंमत जाणार नाही. त्याचप्रमाणे एक्सपायरीच्या जवळ, महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात विकल्यास जास्त चांगले. कारण शेवटच्या आठवड्यात तिथीऱ्हास जास्त असतो.
‘कव्हर्ड कॉल’चे उदाहरण
चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास होणाऱ्या फायद्याबाबत आपण वर उल्लेख केला आहे. जे लोक कमी पण निश्चित फायद्यामध्ये समाधानी आहेत त्यांच्यासाठी कव्हर्ड कॉलपेक्षा चांगला व सतत प्रत्येक महिन्याला नफा देणारा प्रकार दुसरा नाही. मुळात या लेखमालेचा हेतू बँकेच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना त्या पेक्षा जास्त लाभ देणाऱ्या पर्यायाबाबत सांगणे असाच आहे. त्याचवेळी शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे तात्काळ श्रीमंतीचा मार्ग नाही, याची जाणीव करून देण्याचा आहे. परंतु स्वत:ची गुंतवणूक सुरक्षित ठेवून बँक  ठेवीपेक्षा जास्त कमाई करण्याचा हा अतिशय सूज्ञ  व उपयुक्त मार्ग आहे.
‘कव्हर्ड कॉल’ हे डावपेच सावध गुंतवणूकदारांसाठी अतिशय सोपा सहज करता येण्याजोगा व सातत्याने सतत महिना दर महिना पसा कमावण्याचा मार्ग आहे. हे करताना लाभांश , बोनस, इत्यादी गुंतवणुकीचे सर्व फायदेही मिळतच राहतात. या करिता तुम्हाला शेअर ब्रोकरकडे ट्रेिडग खाते उघडावे लागेल, व चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यावे लागतील. एकदा हे झाले की ब्रोकरशी संपर्क साधून मग त्या शेअर्सचे कॉल विकणे अतिशय सोपे आहे.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्या त्या महिन्याचा करार (एक्सपायरी) संपतो, कॉल विकताना तुम्ही खरेदीदाराला ज्या किमतीला कॉल विकला ते अधिमूल्य तुमच्या खात्यात जमा होते. ८५% प्रसंगात त्या विकल्पाची किंमत शून्य होते. त्यामुळे ते पसे म्हणजे तुमची कमाई आहे. परत दुसऱ्या महिन्याच्या कराराच्या पहिल्या दिवशी पुन्हा त्या महिन्याचा कॉल विकावा. म्हणजे परत पसे तुमच्या खात्यात जमा होतात. अशा तऱ्हेने तुम्ही महिना दर महिना पसे कमावू शकता.
उदाहरणादाखल सोबतची ‘इन्फोसिस’मधील व्यवहाराची चौकट पाहता येईल.
एकदा अनुभव आला की आपण वरील पद्धती काही वेळा महिन्याला दोनदाही वापरू शकतो. शेअर्सची किंमत आपल्या स्ट्राईकच्या खाली किवा तिथेच घुटमळली तरी तिथीऱ्हासामुळे तुम्हाला नफा मिळेल. हे डावपेच ९०% वेळा यशस्वी होतील. १०% वेळा काय होईल? जर शेअर्सचे भाव तुम्ही विकलेल्या कॉलच्या स्ट्राईकच्या वर करार समाप्तीला बंद झाले तर कॉल विक्रीमध्ये नुकसान होईल. पण तरीही तुमचे काहीही नुकसान नाही. कारण तुम्हाला तुमच्या शेअरच्या भावात फायदा झालेला असेल.
या डावपेचामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपणास गुंतवणुकीसाठी योग्य शेअर्स निवडणे होय. या लेखाचा मुख्य हेतू सर्वसामान्य लोकांना बँकेच्या मुदत ठेव योजनेपेक्षा जास्त फायदा कोणतीही जोखीम न उचलता शेअर मार्केटमधून मिळू शकतो, असा नवीन दृष्टीकोन देणे आहे.
info@primetechnicals.com
(विशेष सूचना : लेखातील चालू बाजारातील शेअरचे उदाहरण केवळ संकल्पना समजून सांगण्यासाठी घेतलेले आहे. कृपया वाचकांनी हा लेखकाने दिलेला सल्ला अथवा खरेदीची शिफारस आहे असे समजू नये. तथापि योग्य सल्लागाराकडून मार्गदर्शन घेऊनच व्यवहार करावा.)

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
GE Aerospace going to Invest Rs 240 Crore in Pune Plant Expansion
विमान इंजिनची निर्मिती करणाऱ्या जीई एरोस्पेसची पुण्यात मोठी गुंतवणूक
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर