fundबँक मुदत ठेवींच्या पलीकडे विचार न केलेल्या या नातेवाईकाला म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा दिलेला सल्ला तसा न पटलेला. परंतु एकदा करून बघायला काय हरकत आहे, असा विचार करून या नातेवाईकाने पाच हजार रुपयांची गुंतवणूक एचडीएफसी इक्विटी फंडात केली. त्याच्या पाच हजारांच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य आज ३२ हजार रुपये झाले आहे. सात वर्षांत सहा पट पसे वाढणे हा त्याच्यासाठी धक्काच होता. म्हणून या वर्षीदेखील बोनस हाती पडताच काय करावे हे विचारण्यासाठी त्याचा फोन होता. दिवाळीतील खास गुंतवणुकीसाठी केलेली ही शिफारस..
दिवाळी म्हटले की मराठी कुटुंबात फराळ, नवीन कपडे, फटाके आणि त्याच्या जोडीला दिवाळी अंक हे समीकरण पक्के असते. बदलत्या जमान्यात याच्या जोडीने गुंतवणूकही महत्त्वाची ठरली आहे. दोन दिवसांपूर्वी एका नातेवाईकाचा फोन होता. २००७ च्या दिवाळीत एका कौटुंबिक समारंभात भेटलेल्या या नातेवाईकाला त्याचा बोनस योग्य ठिकाणी गुंतविण्यासाठी सल्ला हवा होता. बँक मुदत ठेवींच्या पलीकडे विचार न केलेल्या या नातेवाईकाला म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा दिलेला सल्ला तसा न पटलेला. परंतु एकदा करून बघायला काय हरकत आहे, असा विचार करून या नातेवाईकाने पाच हजार रुपयांची गुंतवणूक एचडीएफसी इक्विटी फंडामध्ये केली. गेल्या आठवडय़ात त्याचा फोन होता. त्याच्या पाच हजारांच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य आज ३२ हजार रुपये झाले आहे. सात वर्षांत सहा पट पसे वाढणे हा त्याच्यासाठी धक्काच होता. म्हणून या वर्षीदेखील बोनस हाती पडताच काय करावे हे विचारण्यासाठी त्याचा फोन होता. या नातेवाईकाला बोनस गुंतविण्यासाठी सुचविलेला फंड आज या सदरातून दिवाळीतील खास गुंतवणुकीसाठी सुचवीत आहे.
आयसीआयसीआय फोकस ब्ल्यू चीप (लार्ज कॅप फंड)
निर्देशांक सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ असताना दिवाळीत नक्की कुठे गुंतवणूक करावी हा प्रश्न वाचकांना पडला असेल. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस ब्ल्यू चीप हे या प्रश्नाचे उत्तर आहे. बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण व त्याच वेळी मुख्य निर्देशांकांनी दिलेल्या परताव्यापेक्षा जास्त परतावा देणारा फंड असे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड ब्ल्यू चीपचे वर्णन केले तर चुकीचे ठरणार नाही. महेश गुनवाणी हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक हा या फंडाच्या कामगिरीच्या तुलनेसाठी निवडला आहे. मागील १०० महिन्यांपकी ९६ महिन्यांत या फंडाने निफ्टीच्या मासिक परताव्यापेक्षा अव्वल परतावा दिला आहे. यामुळे या फंडाने एचडीएफसी टॉप २००, डीएसपी ब्लॅकरॉक टॉप १००, यूटीआय टॉप १००, एसबीआय मॅग्नम इक्विटी या स्पर्धक फंडांपेक्षा एक वर्ष, तीन वष्रे, पाच वष्रे या कालावधीत परताव्याच्या तुलनेत मागे सारले आहे. २००८ ते २०१० या कालावधीत निर्देशांक नकारात्मक परतावा देत असताना गरज नसलेले वैविध्य टाळून निवडक समभागात गुंतवणूक केल्यामुळेच न थांबविता येणारे घसरण मर्यादेत राखण्यात फंडांना बऱ्यापकी यश आले आहे. हा फंड मे २००८ मध्ये प्राथमिक विक्रीनंतर गुंतवणुकीसाठी खुला झाला. जून २००८ ते सप्टेंबर २०१४ (स्थापनेपासून) या कालावधीत एसआयपीवर १९.६२%, ऑगस्ट २००९ ते ऑगस्ट २०१४  (५ वष्रे) या कालावधीत एसआयपीवर १७.८७%  ऑगस्ट २०११ ते ऑगस्ट २०१४ (३ वर्षे) या कालावधीत एसआयपीवर २४.६२%, तर मागील सप्टेंबर २०१३ पासून म्हणजे १२ महिन्यांच्या कालावधीत एसआयपीवर ४९.४२% परतावा मिळाला आहे.  सध्या या फंडाची गुंतवणूक ज्या कंपन्यांचा व्यवसाय प्रतिकूल आíथक आवर्तनामुळे बाधित झाला होता व बदलत्या अर्थगतीमुळे ज्या व्यवसायाला अनुकूल दिवस आहेत अशा कंपन्यांच्या समभागात केली आहे. अर्थात या संकल्पनेवर मनात येणारा पहिला उद्योग बँकिंग असल्याने साहजिकच सर्वात जास्त गुंतवणूक असलेले उद्योग क्षेत्र बँकिंग व वित्तीय सेवा हे असून आयसीआयसीआय बँक व एचडीएफसी बँक या कंपन्या प्रथम व द्वितीय क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे उद्योग क्षेत्र ग्राहक उपयोगी वस्तू असून या क्षेत्रातील सर्वाधिक गुंतवणूक आयटीसी या कंपनीत आहे. माहिती तंत्रज्ञान हे तिसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र असून या क्षेत्रातील सर्वाधिक गुंतवणूक इन्फोसिसमध्ये आहे. गुंतवणुकीचा मोठा हिस्सा जरी निफ्टी निर्देशांकाच्या समभागात असला तरी जेवणाच्या ताटात, डाव्या बाजूला लोणचे, चटणी, कोिशबीर हे जेवणाची चव वाढवत असते, तसे टाटा मोटर्स (डीव्हीआर), भारत फोर्ज, युनायटेड स्पिरिट्स, मदरसन सुमी या कंपन्यांनी गुंतवणुकीची लज्जत वाढविली आहे. सप्टेंबर अखेरीस या फंडाने  निधी ४९ कंपन्यांमध्ये गुंतविला होता. अनावश्यक विविधता टाळतानाच या फंडात गुंतवणुकीचा मोठा हिस्सा अव्वल कंपन्यांत गुंतविला आहे.
(या फंडात गुंतवणूक केल्यास वर उल्लेख केल्यानुसार परतावा मिळेल असा दावा नाही. म्युच्युअल फंडातील भूतकाळातील परताव्याचा दर भविष्यकाळातील परताव्याची खात्री देतोच असे नाही.)