आज शिस्तप्रिय इसमाची व्याख्या करताना, नक्की पसे कुठे गुंतवावे, त्यात जोखीम किती, ती सहन करण्याची आपली मानसिकता काय, या त्याच्या क्षमतांचाही आवर्जून समावेश करायला हवा..
आज ज्यांचे अर्थनियोजन जाणून घेणार आहोत ते राजन घाडी ‘बिझनेस अ‍ॅनॅलिस्ट’ म्हणून काम करतात. हे काम त्यांच्या कंपनीच्या ग्राहकाला जाणून घेऊन त्याच्या व्यवसायाच्या प्रथा व पद्धती यांची लिखित स्वरूपात नोंद करण्याचे आहे. एका अर्थाने त्यांच्या कंपनीचे ग्राहक व कंपनी यांच्यातील ते दुवा आहेत. त्यांच्या नोकरीच्या स्वरूपामुळे असेल परंतु त्यांनी पाठवलेली मेल सविस्तर होती आणि एकही तुटका दुवा आढळला नाही.
ते स्वत: (३१), पत्नी रजनी (३२) व मुलगा श्रेयस (८) असे राजन घाडी यांचे त्रिकोणी कुटुंब आहे. रजनी या गृहिणी आहेत. वडील जगन्नाथ (६१) व आई जयश्री (५५) हे वेगळे राहतात. वडील निवृत्त गिरणी कामगार आहेत. राजन यांनी एक सदनिका २०१० मध्ये खरेदी केली असून त्यासाठी स्टेट बँकेकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाची मुदतपूर्व परतफेड सुरू असून डिसेंबर २०१४ पर्यंत हे कर्ज फेडण्याचा त्यांचा इरादा आहे. या घराचा ताबा त्यांना सहा महिन्यांपूर्वी मिळाला असून हे घर सध्या रिकामे आहे.

मुलगा श्रेयसला शाळेत जाण्याच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणी ते भाडय़ाच्या घरात राहतात. आई-वडील वेगळे राहात असले तरी दर महिन्याला ठरावीक रक्कम ते वडिलांना देतात. त्यांच्या कंपनीने देऊ केलेल्या समूह विमा योजनेत स्वत:च्या कुटुंबाबरोरच आरोग्य विम्यात आई-वडिलांच्या आजारपणाच्या खर्चापोटी प्रत्येकी दीड लाखांपर्यंत संरक्षण घेतले आहे. यासाठी ते वार्षिक ३५५६८ हप्ता देतात. त्यांनी स्वत:चा एक कोटीचे विमा छत्र असलेला पंचवीस वर्षांचा मुदतीचा विमा ‘क्लिक टू प्रोटेक्ट’ हा एचडीएफसी लाइफकडून काढला आहे. या विम्यापोटी १६०६७ हप्ता देतात. हे विमा संरक्षण त्यांना त्यांच्या वयाच्या पंचावन्नपर्यंत लाभणार आहे.
या व्यतिरिक्त  एचडीएफसी लाइफकडून दोन लाख पन्नास हजाराची युलिप योजना घेतली आहे व एसबीआय जनरल इन्शुरन्सकडून अपघाती विम्याचे ४ लाखांचे संरक्षण लाभले आहे. त्याचा वार्षिक २०० हप्ता ते देत असतात. त्यांचे स्वत:चे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते असून त्याला या मार्च महिन्यात दोन वष्रे होतील. त्यांनी एलआयसीची जीवनसाथी ही योजना खरेदी केली होती, परंतु विमा व गुंतवणूक या गोष्टी वेगवेगळ्या असाव्यात हे त्यांना एक वर्ष भरल्यावर उमजल्यामुळे त्यांनी तोटा सोसूनही हप्ते भरणे बंद केले.
दर वर्षी एप्रिल महिन्यात ते एका वर्षांसाठी बँकेत आवर्ती ठेव योजनेंतर्गत खाते उघडतात व मुदतपूर्तीनंतर एप्रिल महिन्यात त्यांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करतात. श्रेयस हा बुद्धीबळपटू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी सामने खेळतो.
राजन घाडी यांना सल्ला
आíथक नियोजन करताना तुम्ही वाढत्या खर्चाबद्दल चिंता करीत आहात, परंतु वाढत्या खर्चाबरोबरच तुमचे उत्पन्नही वाढणार आहे. वार्षकि वेतनवाढ एखादी चांगल्या नोकरीची संधी किंवा बढती तुमचे उत्पन्न वाढवणार आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढी काळजी वाटते तेवढी काळजी करण्याचे कारण नाही.
१. राजन घाडी यांनी त्यांच्यावरील वित्तीय पाश्र्वभूमीवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत व त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच सल्ला देणे योग्य ठरेल. पहिला प्रश्न दुसरे अपत्य की गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड हा आहे व दुसऱ्या अपत्याच्या खर्चाबाबत आहे. या प्रश्नावर जसे राजन यांनी मेलमध्ये म्हटल्याप्रमाणे बाळासाठी अचूक ‘टायिमग’ साधता येत नाही व बाळ येण्यापूर्वी निदान आठ महिने आधी वर्दी देत असते. हे लक्षात घेता मुदतपूर्व कर्ज मुक्त होण्याचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू ठेवावी. दुसरे अपत्य अठरा महिने उशिराने होऊ देण्याचा विचार केल्यास संपूर्ण गृहकर्ज फेड व अपत्यप्राप्ती ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतील. साधारण वर्षभराने तुमच्या पीपीएफ खात्याला तीन वष्रे पुरी होतील म्हणून जमा रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम तुम्ही कर्जाऊ घेऊ शकाल.
२.  तुमचे गृहकर्ज फेडल्यानंतर तुमच्याकडे १५००० रुपये शिल्लक राहतील. तुम्ही एक अतिशय शिस्तबद्ध इसम आहात. म्हणून तुम्हाला ‘फिनामेट्रिका’ ही चाचणी देण्याचा सल्ला देऊ इच्छितो. या चाचणीमुळे तुमची जोखीम सहन करण्याची मानसिकता कळून येईल. ही चाचणी घेतल्यानंतर तुम्हाला नक्की पसे कुठे गुंतवावे याचा सल्ला देण्यात येईल.
३.  एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या राजीव गांधी इक्विटी सेिव्हग स्कीम योजनेत करबचतीसाठी गुंतवणूक करायला हरकत नाही.   
४.  दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी इंडेक्स फंडाचा विचार करावा व ही गुंतवणूक पाच वष्रे निदान करावी. या कालावधी दरम्यान कदाचित तुम्हाला नकारात्मक परतावा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा ही गुंतवणूक सुरू ठेवा. इंडेक्स फंडांनी मागील पाच वर्षांत १८% परतावा दिला आहे. सार्वजनिक भविष्य निधी खाते व इंडेक्स फंड यांमध्ये ३:१ या प्रमाणात गुंतवणूक केल्यास साधारण १४ ते १६% दरम्यान परतावा राहील.
५.  तुम्ही तुमचे घर भाडय़ाने देण्याचा विचार करत आहात ते योग्य आहे. त्यामुळे अधिकचे पाच हजार रुपये उत्पन्न येईल त्याची एखाद्या इन्कम फंडात एसआयपी सुरू करा.