niyojan2व्यावसायिकांबाबत पहिली सात – आठ वर्षे कष्टाने व्यवसाय उभा करण्यात जातात. या काळात फारशी रोकड सुलभता नसते. हळूहळू रोकड सुलभता निर्माण होते. या रोकड सुलभतेची पहिली एक – दोन वष्रे स्वप्नपूर्तीत जातात. ज्या वर्षी व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फिटत येते किंवा व्यवसाय स्थिरावला असे वाटते तीच वेळ आíथक नियोजन करण्याची असते.
सध्या आपण आयुष्याच्या ज्या टप्यावर आहोत त्या टप्प्यावर आपल्या नियोजनात इएलएसएसला प्राधान्य असावे की युलिपला असा प्रश्न शांभवी रेडकर – रेगे (४२) यांना पडला आहे. शांभवी यांनी १० वर्षांपूर्वी व्यवसायास प्रारंभ केला. त्या मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवीधर आहेत. शांभवी यांनी सुरवातीच्या १० वर्षांच्या नोकरीतील अनुभवानंतर स्वत:ची उद्योगांना सल्ला देणारी कंपनी सुरु केली. या व्यवसायातून खर्च वजा जाता वर्षांकाठी मोठी गुंतवणूकयोग्य रक्कम शांभवी शिल्लक टाकीत आहेत. त्यांची मोठी गुंतवणूक बँकेच्या मुदत ठेवींत गुंतवलेली आहे. बँकांच्या मुदत ठेवींच्या व्यतिरिक्त जी काही थोडीबहुत गुंतवणूक आहे ती गुंतवणूक दोन सल्लागारांच्या सूचनेवरून केली आहे. या पकी एक सल्लागार खाजगी बँक असून दुसरा सल्लागार एक दलाली पेढी आहे. त्यांच्या दोन सल्लागारांनी त्यांच्याकडे जमा रक्कमेच्या गुंतवणुकीसाठी दोन टोकाचे सल्ले दिले आहेत. या पकी योग्य कुठला सल्ला योग्य हे ठरविण्यासाठी त्यांनी ‘अर्थ वृत्तान्त’कडे संपर्क केला.
शांभवी यांच्या कुटुंबात त्यांचे पती समीर (४३) जे एका अभियांत्रिकी कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत, व मुलगी सुरभी (१६) आहे.
शांभवी यांच्या बाबतीत जी गोष्ट आढळली ती अपवाद वगळता सर्वच नवउद्योजकांच्या बाबतीत दिसून येते. पहिली सात – आठ वर्षे व्यवसाय कष्टाने उभा करण्यात जातात. या काळात फारशी रोकड सुलभता नसते. हळूहळू रोकड सुलभता निर्माण होते. या रोकड सुलभतेची पहिली एक – दोन वष्रे स्वप्नपूर्तीत जातात. स्वप्नपुर्तीत पर्यटन कंपनीसोबत एखादी युरोप सहल किंवा तत्सम पर्यटन किंवा लोणावळ्यासारख्या ठिकाणी सेकंड होमची खरेदी ही त्या सेकण्ड होमचा आकार व जागा त्या व्यक्तीच्या रोकड सुलभतेवर अवलंबून असते. ज्या वर्षी व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फिटत येते किंवा व्यवसाय स्थिरावला असे वाटते तीच वेळ आíथक नियोजन करण्याची असते. पर्यटन किंवा हौस माजेसाठी लाखो रुपये खर्च करणारी ही मंडळी वित्तीय नियोजनासाठी व्यक्तीगत आíथक आराखडा (Personal Financial Planlan) करून संपत्ती निर्मितीसाठी विशेष जागरूक दिसत नाहीत. सुरवातीच्या काळात एखादा मित्र किंवा एखाद्या दलाली पेढीच्या कोणाच्या सल्ल्याने गुंतवणूक करतात. ज्यात वित्तीय शिस्तीचा अभावच दिसतो.
या बाबतीत आज ज्यांचे नियोजन जाणून घेत आहोत त्यांचे उदाहरण द्यायचे तर वर्षांकाठी करपाश्चात नफा कमवीत असूनही शांभवी यांच्याकडे मुदतीचा विमा नाही. शांभवी यांचे प्राप्तीकर विवरण पाहता त्यांना पाच कोटीचे सुरक्षा कवच सहज मिळू शकेल. मुदतीचा विमा ही वित्तीय नियोजनाची पहिली पायरी आहे. तरीही ही गोष्ट अनेक रोकड सुलभता असणाऱ्या कमवित्या व्यक्तीकडे नसतो. याचे कारण अर्थ साक्षरतेचा अभाव व मुदतीच्या विम्यावर विक्रेत्याला मिळणारे अल्प कमिशन हे कारण आहे. जीवन विम्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापकी मुदतीचा विमा हा सर्वात स्वस्त विमा आहे. युलिप प्रकारात गुंतवणूक व विमा हे एकत्र विकले जातात. भरलेल्या रक्कमे पकी ठराविक रक्कम विम्याच्या हप्त्यापोटी व उर्वरीत रक्कम विमा कंपनीच्या विमा खरेदीदाराने ंनिवडलेल्या फंडात गुंतविली जाते. विमा कंपन्या युलिपसाठी व्यवस्थापन शुल्क आकारतात. युलिप हा प्रकार दीर्घकाळात सरासरीहून अधिक परतावा देतो. युलिप पराकारच्या विमा योजनेत दहा ते पंधरा वष्रे विम्याचा हप्ता भरावा लागतो. हे लक्षात घेता विमा मुदतीच्या विम्यापेक्षा अधिक खर्चाचा परंतु मुदती नंतर गुंतवणूक व त्यावरील परतावा परत मिळणारा असल्याने महाग असतो. म्हणून गुंतवणूक व विमा एकत्र नसणे हिताचे असते.

av-02
नियोजनाची दुसरी पायरी ही आरोग्य विम्याची असल्याने शांभवी यांनी २० लाखाचा आरोग्य विमा खरेदी करावा. समीर रेगे यांच्या कंपनीने या कुटुंबाला ३ लाखपर्यंत खर्च वगळून आरोग्य विमा खरेदी केल्यास अंदाजे २० हजारात २० लाखाचे आरोग्य कवच मिळू शकेल. या आरोग्य विमा पॉलिसीत बहुतेक सर्व गंभीर आजारांवरील खर्चाचा समावेश असल्याने वेगळी क्रिटीकल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याची आवश्यकता नाही. शांभवी या एलआयसी जीवन आरोग्य पॉलिसीचा विचार करू शकतात. ही एक अव्वल योजना असूनही एलआयसीचे विमा विक्रेते कधीही ही योजना आपणहून विकतांना आढळत नाहीत.
दरवर्षी व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या रक्कमेपकी पाच लाख (किमान) एनपीएसमध्ये कर बचतीसाठी गुंतवीण्यास हवेच. यापकी ५० हजारावर कर वजावट मिळेल व १५ हजार प्राप्तीकर वाचेल. पुढील पाच वर्षांत एक कोटी एनपीएसमध्ये जमा केल्यास विद्यमान अ‍ॅन्यूइटी दराचा (६.५०%) व एनपीएसच्या परताव्याच्या दराचा (११.५%) विचार केल्यास वयाच्या ६०व्या वर्षांपासून दरमहा दोन लाखाचे निवृत्ती वेतन सुरू होईल. जे शांभवी यांचे वित्तीय ध्येय नियोजना दरम्यान निश्चित केले. अ‍ॅन्यूइटी दर व एनपीएसचे परताव्याचे दर यांची भविष्यात खात्री देता येत नाही हे लक्षात घेणे जरुरी आहे. पेन्शनचे गृहितक या दोन दरांवर आधारित आहे हे लक्षात घेऊन गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. या व्यतिरिक्त मोठी गुंतवणूक योग्य रोकड निर्माण होत असल्याने त्यांना  चार पीएमएस सेवा देणाऱ्या कंपन्यांची नावे सुचविलेली असून या कंपन्यांनी पीएमएस वर १७ ते २८ टक्के दरम्यान परतावा दिला आहे. शांभवी यांनी योग्य तो निर्णय करावयाचा आहे. टाटा समूहाच्या एका कंपनीच्या मागील महिन्यात झालेल्या भागधारकांच्या वार्षकि सर्वसाधारण सभेत सायरस मिस्त्री यांच्या अध्यक्षीय भाषणातील एक वाक्य उधृत करण्याचा मोह होत आहे. ते म्हणाले, ‘दीर्घकालीन भविष्याचा विचार करून उद्योगांची उभारणी केल्याशिवाय संपत्तीची निर्मिती होणार नाही.’ रोकड नियोजनातून संपत्तीची निर्मिती करायची असेल तर दीर्घकालीन समभाग गुंतवणुकीशिवाय पर्याय नाही हे शांभवी यांनी ध्यानी घ्यायला हवे.
एखाद्या व्यक्तीचे ज्ञान व कौशल्य त्याच्या व्यवसायापुरते सीमित असते. गुंतवणूक किंवा संपत्तीचे व्यवस्थापन ही एक कला असून हे कौशल्य सर्वाकडे नसते. व्यवस्थापनात ही संकल्पना आहे. शांभवी  यांच्या गुंतवणुकांचा तपशील पाहता हे कौशल्य त्यांच्याकडे नाही. गुंतवणूक व संपत्तीचे व्यवस्थापन हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. शांभवी रेगे यांनी या कामासाठी सुयोग्य संस्थेची किंवा व्यक्तीची (दलाली पेढी नव्हे) निवड करावी. यासाठी ही सेवा देणाऱ्या त्यांना दोन बहुराष्ट्रीय बँकांची नांवे सुचविली आहेत.

शांभवी यांच्यासाठी वित्तीय नियोजन उपाययोजना
मुदतीचा विमा : २ कोटीचा २० वष्रे मुदतीचा एलआयसी ई टर्म, एसबीआय लाईफ ई शिल्ड, आयसीआयसीआय प्रूडेनशियल आय शिल्ड किंवा बिर्ला सनलाईफ प्रोटेकक्टर प्लस या पकी एकाची निवड करणे.
आरोग्य विमा : कामाचा व्याप व त्यामुळे येणारा मानसिक दबाव पाहता १५ ते २० लाखाचा आरोग्य विमा हखरेदी करणे आवश्यक. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.: शांभवी व समीर यांची पीपीएफ खाती आहेत. याचा ते पूर्ण वापर करीत नाहीत. वार्षकि १.५० लाख या दोन्ही खात्यात भरणे.
राष्ट्रीय पेंशन योजना : ५० टक्के समभाग गुंतवणूक असलेला विकल्प स्वीकारणे.
इक्विटी लार्ज कॅप : आयसीआयसीआय प्रूडेनशियल फोकस ब्ल्यूचीप, अ‍ॅक्सिस इक्विटी, फ्रॅक्लिन टेम्पलटन ब्ल्यूचीप  या फंडात मिळून मोठय़ा रकमेची एसआयपी सुरु करावी.
इक्विटी मिड कॅप : १,००० ची एसआयपी एचडीएफसी मिडकॅप, आयडीएफसी प्रिमियर इक्विटी रिलायंस स्मॉल कॅप, डीएसपी ब्लॅकरॉक मायक्रो कॅप या फंडात मिळून मोठय़ा रकमेची एसआयपी सुरु करावी.
shreeyachebaba@gmail.com