मागील वर्षांपासून दिवाळीच्या मागेपुढे ‘अर्थ वृत्तान्त’सुद्धा दिवाळीसाठी विशेष खरेदी सुचवीत असतो. म्हणून गतवर्षांप्रमाणेच या वर्षी आम्ही विश्लेषकांना त्यांनी मागील वर्षभरात अभ्यासलेल्या कंपन्यांपकी एका कंपनीची निवड करण्यास सांगितले. दसरा व दिवाळी एकाच महिन्यात आलेल्या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यांत ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’च्या अतिथी विश्लेषकांच्या पसंतीच्या कंपन्यांच्या फराळाचा हा तिसरा हप्ता..
ल्ल टीआयएल म्हणजे आधीची ट्रॅक्टर इंडिया लिमिटेड. ही कंपनी ‘ऑफ द रोड’ वाहने म्हणजे ट्रॅक्टर, पुलर, क्रेन्स रोड रोलर व अन्य ‘मटेरियल हॅडिलग इक्विपमेंट्स’ची उत्पादक आहे. कंपनीने आपला व्यवसाय तीन प्रकारात विभागला आहे. पहिल्या प्रकारात ‘मटेरियल हॅडिलग इक्विपमेंट्स’चे उत्पादन व विक्री. दुसरा प्रकार म्हणजे ‘पोर्ट इक्विपमेंट सोल्युशन’ म्हणजे बंदरात माल हाताळणी करणारी यंत्रणा. यामध्ये कंटेनर हाताळणारी यंत्रणा क्रेन्स व लुज कार्गो (कंटेनरमधून न येणारे कोळसा, लोह खनिज इत्यादी) हाताळणारे ‘कन्व्हेयर बेल्ट्स’ यांचा समावेश होतो. तिसऱ्या प्रकारात ‘इक्विपमेंट्स प्रोजेक्ट सोल्युशन्स’ म्हणून ओळखला जातो. या विभागात रस्त्यासाठी खाडी दाबणारे रोलर्स व ‘हॉट मिक्स आसफाल्ट’ तयार करणारे मिक्सर, रेल्वे व रस्ता बांधणी, धरणे व जल विद्युत प्रकल्प यासाठी बोगदे खणणारे यंत्र, कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या ‘इओटी’ क्रेन्स, विमान ओढून नेणारे ट्रक, डीजी सेट्स इत्यादी उत्पादनांचा समावेश होतो. फ्लाय ओव्हरचे बांधकाम सुरू असताना नजरेस पडणाऱ्या ‘मोबाईल क्रेन्स’ किंवा ‘ट्रक माऊन्टेड क्रेन्स’ या भांडवली वस्तुंचा समावेश होतो. ‘ट्रक माऊन्टेड क्रेन्स’ या उत्पादन प्रकारात टीआयएल बाजारपेठेचे नेतृत्व करते व या कंपनीचा बाजारहिस्सा ८१ टक्के आहे. कंपनीचे ग्राहक प्रामुख्याने पायाभूत सुविधा विकासक आहेत. मागील आíथक वर्षांत पायाभूत सुविधा क्षेत्राला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले असले तरी आपले बाजारपेठेतील नेतृत्व व नफ्याची टक्केवारी टिकवून ठेवण्यात कंपनीला यश आले आहे. कंपनीच्या ट्रॅक्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, टीआयएल नेपाळ लिमिटेड व टीआयएल ओव्हरसीज पीटीई लिमिटेड या १०० टक्के मालकीच्या तीन उपकंपन्या आहेत. ट्रॅक्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील राख व कोळसा हाताळणी यंत्रणांची उभारणी करते. टीआयएल नेपाळ लिमिटेड ही कंपनी नेपाळमधील व्यवसायासाठी तर टीआयएल ओव्हरसीज पीटीई लिमिटेड ही सिंगापूरमध्ये नोंदणी झालेली कंपनी निर्यात संबिंधत व्यवसाय पाहते.
कॅटरपिलर ही मूळ अमेरिकेतील बांधकाम यंत्र सामुग्रीची उत्पादक असून जगातील बांधकाम यंत्रसामुग्रीची अव्वल उत्पादक म्हणून ही कंपनी ओळखली जाते. टीआयएल व कॅटरपिलर यांचे जुने व्यावसायिक संबंध आहेत. टीआयएल ही कॅटरपिलरच्या खाणीत वापरण्याच्या यंत्र सामुग्रीची भारतातील पहिली वितरक असून भारतीय उपखंडात कॅटरपिलरच्या या व्यवासायासाठीची विक्री व विक्रीपश्चात सेवा देणारी एकमेव वितरक आहे. हा वार्षकि निगराणी कंत्राट (एएमसी) हा मोठा नफ्याचे प्रमाण असलेला व्यवसाय आहे. शेती खालोखाल बांधकाम व्यवसाय हा सर्वात जास्त रोजगार देणारा उद्योग आहे. मागील दोन वर्षांपासून वेगवेगळ्या परवानगीअभावी रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे बांधकाम यंत्रसामुग्री (अर्थमुिव्हग कन्सट्रस्शन इक्वि पमेंट) उद्योग लाभार्थी ठरेल, असा कयास आहे. टीआयएलचा हा व्यवसाय पुढील पाच वर्षांत २० ते २५ टक्क्याने वाढेल. कंपनीने मागील काही दिवसांपासून तयार मालाची पातळी कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून याचा परिणाम कर्ज व कर्जावरील व्याज कमी होण्यात झाल्याचे मागील दोन तिमाही निकालांपासून ठळकपणे दिसून येत आहे.

मूल्यांकन: कंपनीच्या समभागाच्या किंमतीचे २०१४ च्या उत्सर्जनशी प्रमाण १२.०५, २०१५ च्या उत्सर्जनशी प्रमाण ९.८७ पट आहे. एका वर्षांनंतर, २०१६ च्या दुसऱ्या तिमाही निकालानंतरचे ४५६ चे लक्ष्य निर्धारित करून  खरेदीची शिफारस.
ल्ल कृष्ण कुमार (के. के.) बिर्ला यांनी १९३९ मध्ये स्थापना केलेल्या टेक्समॅको रेल ही कंपनी सध्या सरोष पोतदार यांच्या अॅडव्हांटा समुहाचा एक भाग आहे. झुवारी अॅग्रो केमिकल्स, गोविंद शुगर्स, टेक्समॅको इन्फ्रास्ट्रक्चर या अॅडव्हांटा समुहातील अन्य कंपन्या आहेत. भारतात औद्योगिकीकरणाला सुरवात होत असताना सिमेंट, पोलाद, ऊर्जा निर्मितीसारख्या अवजड उद्योगांसाठी यंत्र सामुग्रीसाठी सुटे भाग तयार करण्याच्या उद्देशाने या कंपनीची स्थापना एक अभियांत्रिकी कंपनी म्हणून केली. के. के. बिर्ला यांच्या पश्चात या औद्योगिक साम्राज्याची वाटणी त्यांच्या चार मुलींमध्ये झाली. त्यांच्या औद्योगिक साम्राज्याचा जो हिस्सा द्वितीय कन्या ज्योती पोतदार यांच्या वाटय़ाला आला त्या कंपन्या अॅडव्हांटा समुहाचा भाग म्हणून ओळखल्या जातात.
या कंपनीने आपला व्यवसाय दोन गटात विभागाला आहे. कंपनीचे अवजड उद्योग औद्योगिक संकूल कोलकता शहराच्या जवळपास अगरपारा, तर फाउंड्री संकूल कोलकत्याजवळ सोदेपूर येथे आहे. कंपनीने अमेरिका इंग्लंड, जर्मनी, जपान, ऑस्ट्रीया, ऑस्ट्रेलिया येथील कंपन्यांबरोबर तांत्रिक सहकार्याचे करार केले आहेत. कंपनी भारतीय रेल्वेसाठी माल वाहतूक करणाऱ्या डब्यांचे उत्पादन करते. वेगवेगळ्या माल वाहतुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मालवाहक डबे वापरले जातात. कोळश्यासारख्या खनिज वाहतुकीसाठी छत विहरित डबे तर धान्य वाहतुकीसाठी छत असलेले, कंटेनर वाहतुकीसाठी कंटेनर चारही बाजू व छत नसलेले तर आयात केलेले कच्चे तेल शुद्धीकरणासाठी व तयार झालेले इंधन वहनासाठी तेलाच्या वाघिणी वापरल्या जातात. या सर्व प्रकारच्या मालवाहक डब्याचे उत्पादन टेक्समॅको रेल करते. या व्यतिरिक्त कंपनी विशेष प्रकारची वाहतूक करणारे मालवाहक डबे तयार करते. उदाहरण देऊनच सांगायचे तर – मारुतीच्या गुरगाव येथील कारखान्यातून डबल डेकर पध्दतीने मोटारी गुजरात राज्यातील आणंद येथे आणून रस्त्याच्या मार्गाने मुंबई अथवा विक्रीच्या ठिकाणी पोहचविल्या जातात. या वाहतुकीसाठी लागणारे मालवाहक डबे ही कंपनी तयार करते. कंपनीच्या फाउंड्रीची वार्षकि क्षमता ३ लाख टन आहे.
टेक्समॅको रेलने कािलदी रेल या कंपनीच्या समभागांचे अधिग्रहण केले आहे. यामुळे रेल्वे मालवाहतूक संबंधित सर्व कामे करणारी कंपनी असा लौकिक प्राप्त झाला आहे. कािलदी रेल ही कंपनी रेल्वे रूळ टाकणे, (रेल्वे सायिडग) विद्युतीकरण, अन्य रेल्वे संबंधित स्थापत्य अभियांत्रिकी कामे करणारी, सिग्नल यंत्रणा उभारण्याची कामे करणारी कंपनी आहे.
रेल्वेने वाहतूक करणे हे स्वस्तातले असूनही माल वाहतुकीतील रेल्वेचा २००५ मधील प्रति टन/प्रति किमी हिस्सा ३९ टक्के होता. वेळेवर मालडबे उपलब्ध न होणे, वाहतुकीतील अडथळ्यांमुळे मालगाडय़ा सायिडगला पडणे या कारणांनी मालवाहतूकदारांची पसंती माल रस्ते मार्गाने पाठवण्याला राहिल्यामुळे २०१३ मध्ये रेल्वेचा मालवाहतुकीतील हिस्सा घसरून ३१ टक्क्यांवर आला आहे. यावर उपाय म्हणून केवळ माल वाहतूकीसाठी असलेले रेल्वेमार्ग टाकणे (मुंबई – दिल्ली मालवाहतूक करणारे रूळ) मुख्य रेल्वे मार्गाला जोडणारे फिडर रूट टाकणे (जयगड बंदर-कोकण रेल्वे-मध्य रेल्वेसारख्या मुख्य रेल्वे मार्गाना जोडणे) मालवाहतुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत रेल्वे नेणे (टाटा मोटर्सचा पुणे येथील कारखाना ते जवाहरलाल नेहरू बंदर) इत्यादी प्रकल्प रेल्वेने खाजगी भागीदारीत प्रास्तावित केले आहेत.  रेल्वेच्या ‘पीपीपी’चा लाभार्थी असलेल्या या कंपनीची शिफारस एका वर्षांनंतर १११ चे लक्ष्य निर्धारित करून आम्ही शिफारस करीत आहोत.
 विवेक शर्मा, v.sharma@icicisecurities.com
(हे आयसीआयसीआय सिक्युरिटीज या दलाल पेढीत
भांडवली वस्तू या कंपन्यांचे विश्लेषक आहेत.)