vittbhanआपल्यासाठी आरोग्य विमा सर्वात महत्त्वाचा आहे. बहुतेक सर्व आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असते. सर्व कुटुंबासाठी असते. म्हणून निवृत्त होईपर्यंत या योजनेचा विचार केला जात नाही आणि निवृत्तीवेळी रक्तदाब, मधुमेह या सारखे ‘श्रीमंत’ रोग जडण्याचे प्रमाण जास्त असते. मग स्वतंत्र आरोग्य विमा पॉलिसी मिळणे कठीण होत जाते.
मागील भागात आयुर्वमिा व अपघात विमा याबद्दल आपण माहिती घेतली. या लेखात आरोग्य विमा प्रकार विचारात घेऊ. आपल्यासाठी आरोग्य विमा सर्वात महत्त्वाचा आहे. बहुतेक सर्व आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असते. सर्व कुटुंबासाठी असते. म्हणून निवृत्त होईपर्यंत या योजनेचा विचार केला जात नाही आणिनिवृत्तीवेळी रक्तदाब, मधुमेह या सारखे ‘श्रीमंत’ रोग जडण्याचे प्रमाण जास्त असते. मग स्वतंत्र आरोग्य विमा पॉलिसी मिळणे कठीण होत जाते.
काही आस्थापनांमध्ये संपूर्ण कुटुंबाच्या व्याख्येत पालकत्व मोजले जातात. स्वाभाविकपणे ज्येष्ठांची चालू पॉलिसी बंद केली जाते. मुलांनी नोकरी बदलली किंवा आस्थापनांचे नियम बदलल्यास, घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नव्याने पॉलिसी मिळणे कठीण होऊन बसते. पूर्वीच्या पॉलिसीवरचा मेडिक्लेम बोनस फुकट जातो, तो वेगळाच. म्हणून जास्त विमा छत्र झाले तरी ज्येष्ठांनी या पॉलिसी बंद करू नयेत.
तरुणपणी कंपनीमधून या योजनेचा लाभ मिळत असेल तर कर वाचवण्यासाठी ही पॉलिसी घेऊ नये. ही गुंतवणूक योजना नाही. ८० डी कलमानुसार वजावट हा आपल्या गरजेबरोबर मिळणारा जास्तीचा लाभ आहे. कंपनीमधून हा लाभ मिळत असेल तर वयाच्या ४५ व्या वर्षी ही पॉलिसी (जास्त) स्वतंत्रपणे घेण्यास
हरकत नाही. कारण नंतर पॉलिसी सर्वप्रकारच्या वैद्यकीय चाचण्या घेऊनच दिली जाते व आपल्याला त्या वेळेस असणाऱ्या आजारांची जोखीम घेतली जात नाही.
पॉलिसी किती रकमेची घ्यावी?
आपण आजारी पडल्यास ज्या परिसरात राहतो तेथील जवळपासच्या रुग्णालयामध्ये दाखल होतो. त्या रुग्णालयांच्या खर्चाचा अंदाज घ्यावा व आपल्या वयोमानानुसार योग्य रक्कम ठरवावी. तरुणपणी आरोग्य विमा हा कमी रकमेचा असला तरी चालेल. मात्र वयोमानानुसार त्यात वाढ करत जावे.
कोणत्या संस्थेची आरोग्यविमा पॉलिसी घ्यावी?
चार सर्वसाधारण सरकारी विमा कंपन्या, फक्त आरोग्य विमा देणाऱ्या – स्टार हेल्थ, अपोलो म्युनिच, मॅक्स बुपा, रेलिगेअर व इतर कंपन्या जसे टाटा, बजाज, एचडीएफसी, आयसीआयसीआयसारख्या अनेक खासगी कंपन्याही आरोग्य विमा देतात. यातील फक्त आरोग्य विमा देणाऱ्या व इतर कंपन्यापकी काही गंभीर
आजारासाठी जास्त प्रिमियम घेऊन  (रायडर) जोड विमा देतात. आरोग्य विमा देणारी कंपनी निवडताना विचारांत घ्यायचे मुद्दे : – प्रिमीयमची रक्कम
– नो क्लेम बोनस
– तुमच्या सध्याच्या आजारांसाठी विमा संरक्षण चालू होण्याचा अवधी
– ठरावीक (मोठे) आजारांसाठी विमा संरक्षण चालू होण्याचा अवधी
– प्रत्येक आजारांसाठी विमा संरक्षणाची रक्कम मर्यादा. उदा. मोतीिबदूसाठी रु. २०,०००.
– आपला दावा मान्य होऊन रक्कम हातात मिळण्याचा अवधी
– दावा मान्य होण्याचे प्रमाण (क्लेम सेटलमेंट रेशो)
– को-पे चे नियम आदी. काही संस्था प्रीमियम कमी ठेवून खर्चाच्या फक्त ८० टक्के रक्कम भरून देतात व २० टक्के खर्च आपणास करावा लागतो. (ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेकदा हा नियम लागू होतो.)
सर्व कंपन्यांचे प्रीमियम,
मिळणाऱ्या सुविधांनुसार कमी जास्त आहेत व जवळपास सारखेच आहेत.  दावा मान्य होण्याचे प्रमाण जवळपास चांगले आहे. सरकारी कंपन्यांचे ते सर्वात जास्त आहे. काही कंपन्या एखाद्या वर्षी खर्च भरून द्यावा लागला नाही (नो क्लेम) तर पुढील वर्षांसाठी विमा संरक्षण थोडे वाढवून (बोनस) देतात. तर काही कंपन्या नेहमीच्या
चाचण्यांसाठी (रुटीन चेकअप) कुपन्स देतात.
या सर्व कंपन्यांवर विमा नियामक प्राधिकरणाचे नियंत्रण आहे. परंतु कोणताही विमा खरेदी करताना विमा प्रतिनिधींकडून त्या योजनेचे संपूर्ण माहितीपत्रक छापील स्वरूपात मागून घ्यावे. हल्ली नेटवर सर्व माहिती आहे असे सांगितले जाते व माहिती तोंडी अर्धवट सांगितली जाते.
पॉलिसी हातात आल्यावर त्यावरील फक्त नोंदी तपासू नयेत तर सर्व नियम वाचावेत. एका आरोग्य विमा देणाऱ्या कंपनीच्या नियमात मोतीिबदूच्या ऑपरेशनचा खर्च एका वर्षांत एकाच डोळ्यासाठी मिळेल असेल लिहिले होते. बहुतेक वेळा मोतीिबदूचे ऑपरेशन दोन्ही डोळ्यांसाठी ३-४ महिन्यांच्या फरकात केले जाते. मोतीिबदू ऑपरेशनसाठी खर्च २० हजार मिळेल असा नियम एका कंपनीत आहे तर दुसऱ्या एका कंपनीच्या नियमात कोणत्याही ऑपरेशनसाठी कमीत कमी २४ तास रुग्णालयात दाखल असल्याखेरीज रक्कम दिली जाणार नाही असे लिहिले होते. या सर्वावर एक उपाय इत्यादी आरोग्य विमा दोन कंपन्यांमार्फतविभागून घ्यावा. एकाच कंपनीची पाच लाखाची पॉलिसी घेण्याऐवजी अडीच लाखाच्या दोन कंपन्यांच्या पॉलिसी घ्याव्यात. मोठय़ा शस्त्रक्रियेसाठी ४ लाख खर्च झाल्यास दोन्ही
कंपन्यांकडून प्रत्येकी दोन लाख भरपाई देण्यात येते.
फॅमिली फ्लोटर पॉलिसी :
या पॉलिसीमार्फत संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित आरोग्य विमा मिळतो. उदा. ही पॉलिसी पाच लाखाची असेल तर कुटुंबातील एक व्यक्ती किंवा कुटुंबातील सर्व जण
मिळून पाच लाखापर्यंत खर्चाची भरपाई मागू शकतात. या उलट कुटुंबातील प्रत्येकाचा पाच लाखांचा वैद्यकीय विमा उतरवल्यास हप्ता थोडा जास्त येतो व प्रत्येकास पाच लाखांचे विमा संरक्षण मिळते. आíथक नियोजनकार या नात्याने फॅमिली फ्लोटर पॉलिसी सुचवत नाही. सर्वसाधारणत: घरातील सर्व जण एकाच वेळेस आजारी पडून
रुग्णालयात जाण्याची शक्यता कमी असते. परंतु साथीचे रोग किंवा एकत्र प्रवास करताना अपघात झाल्यास घरातील अधिकाधिक सदस्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते. यासाठी दुसरा पर्याय दोन संस्थांकडून दोन प्रकारच्या पॉलिसी घेणे होय म्युच्युअल फंड, रोखे, ठेवी यांना नामांकन (रेटिंग) असते. त्यानुसार चांगल्याची निवड करणे सोपे जाते. ही पद्धत अजून आयुर्वमिा व सर्वसाधारण विमा योजनांसाठी अस्तित्वात नाही. म्हणून आपणच काळजीपूर्वक कंपनी
व योजना निवडणे गरजेचे आहे. या क्षणी विमा प्रतिनिधींपेक्षा ‘आíथक नियोजनकार’ कामास येतो. (लेखक सेबीकडे नोंदणीकृत
गुंतवणूक सल्लागार आहेत.)
sebiregisteredadvisor@gmail.com