काही कंपन्यांत गुंतवणूक करताना शेअर बाजार कसं आहे ते जास्त अभ्यासावे लागत नाही अशा मांदियाळीतील एक शेअर म्हणजे एचडीएफसी बँक. खरे तर सध्या बँकेतील शेअरमध्ये गुंतवणूक करा, असा सल्ला देणे जिकिरीचेच वाटते. मात्र एचडीएफसी बँक त्याला अपवाद आहे. एचडीएफसी बँक ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक असून बाजारातील एकूण कर्ज वितरणापकी ५.४% तर एकूण ठेवीपकी ५.१% वाटा एचडीएफसी बँकेचा आहे. देशभरात ४१००च्यावर शाखांचे जाळे पसरलेल्या या बँकेची ११,७०० पेक्षा जास्त एटीएम आहेत. गेली दोन वष्रे बँक उद्योगासाठी निराशाजनक असली तरीही एचडीएफसी बँकेची याबाबतही अपवादात्मक कामगिरी राहिली आहे. या दोन वर्षांत बँकेचे कर्ज वितरण वार्षकि सरासरी २३ टक्के दराने वाढले आहे. गेली पाच वष्रे व्यवसायात वार्षकि सरासरी २८.२२% वाढ दाखवणाऱ्या या बँकेचे अनुत्पादित कर्जाचे (एनपीए) प्रमाण मात्र कायम अत्यल्प राहिले आहे. डिसेंबर २०१५ अखेर समाप्त तिमाहीचे निकाल बँकेने नुकतेच जाहीर केले असून, अपेक्षेप्रमाणे बँकेने समाधानकारक कामगिरी करून दाखवली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुत्पादित कर्जात थोडी वाढ झाली असली तरीही त्यांची मात्रा केवळ ०.९७% म्हणजेच १% पेक्षा कमी आहेत. रिटेल कर्जामध्ये ३०% वाढ झाली असून कॉर्पोरेट कर्जात २०% वाढ झाली आहे. चालू आणि बचत खात्यातील जमा रकमेतदेखील २३.७% वाढ झाल्याने कामगिरी खरंच उत्कृष्ट झाली आहे असे म्हणता येईल. नक्त नफ्यातही गत वर्षीच्या तुलनेत २०% वाढ होऊन तो ३३५६.८४. कोटींवर गेला आहे. क्रेडिट कार्ड व्यवसायात एचडीएफसी बँकेचा सर्वात जास्त म्हणजे ५२% हिस्सा आहे. यंदाचे आíथक वर्ष तसेच आगामी काळात बँकेकडून अशाच भरीव कामगिरीची अपेक्षा आहे.

सध्याच्या वातावरणात निर्धोक खरेदीसाठी आणि कायम बाळगावा असा हा शेअर तुमच्या पोर्टफोलियोसाठी निवडा.

Untitled-8

प्रति समभाग मिळकत वा ईपीएस (अìनग पर शेअर)

भरणा झालेल्या भागभांडवलामधील प्रत्येक समभागाचे उत्पन्न किती आहे हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे. प्रति समभाग मिळकत अर्थात ईपीएस गुणोत्तरामुळे त्या कंपनीचा नफा दर समभागामागे किती आहे ते कळतो. हे गुणोत्तर तपासायचा फॉम्र्युला पुढीलप्रमाणे:

नक्त नफा (करपश्चात) / समभागांची संख्या

Net profit after tax / Number of equity shares

ईपीएस जितके जास्त तितका नफा जास्त असे हे साधे-सोपे गुणोत्तर आहे. मात्र या ठिकाणी शेअरचे दर्शनी मूल्यही लक्षात घेणे अत्यावशक आहे.

stocksandwealth@gmail.com