चंड वेगवान जीवनशैलीत ताणतणावाखाली धावपळीत आयुष्य मजेतजगताना बरेच भारतीय कित्येक अनावश्यक खर्च करताना दिसतात. खिशाला परवडणार नाही असे खर्च केवळ सामाजिक प्रतिष्ठाजपण्याकरता होतात. परंतु कमाल २००० ते ३००० दरमहा मासिक हप्ता भरून संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करण्याची जबाबदारीपार पाडताना ते विरळाच दिसतात.

आरोग्य विम्याविषयीच्या पहिल्या लेखाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘विमा’विषयक तांत्रिक माहिती सोप्या भाषेत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे पहिले पाऊल योग्य दिशेस पडले. योग्य आरोग्य विम्याची निवड करताना पूर्वतयारी करावी लागते, विमा करारातील अटी आणि शक्यता काळजीपूर्वक वाचाव्या लागतात हे वाचकांच्या लक्षात आले. आरोग्य विम्यापेक्षा जास्त उपेक्षित गुंतवणूक म्हणजे जीवन विमा होय!

आज देशात चोवीस जीवन विमा कंपन्या कार्यरत आहेत; परंतु एकूण लोकसंख्या लक्षात घेता कमाल ४ टक्के भारतीय आयुर्वमिाधारक आहेत. आंतरराष्ट्रीय जीवन विम्याचे, सर्वसाधारण विम्याचे वितरण जर भारतीय विमा वितरणाशी तुलनात्मक अभ्यासले तर भारतीय आयुर्वम्यिाचे संरक्षण ‘नगण्य’ मानावे लागेल. जीवन विम्याविषयीची अनास्था किंवा प्रचंड प्रमाणात अपसमज भारतीय ग्राहकांत रुजण्याचे प्रमुख कारण म्हणजे जीवन विम्याचा फायदा किंवा उपभोग जीवन विमाधारक अनुभवू शकत नाही हे होय! मनुष्यस्वभावानुसार आपण जी वस्तू किंवा सेवा विकत घेतो ती स्वत: अनुभवली किंवा वापरली तरच मोजलेल्या किमतीचे समाधान ग्राहकास मिळते. आयुर्वम्यिाचे कवच प्रत्येक कुटुंबप्रमुखास कुटुंबाच्या आíथक सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे; परंतु त्याचे प्रत्यक्ष फायदे स्वत: कुटुंब प्रमुख उपभोगू शकत नाही. अकाली मृत्यूनंतर कुटुंबाची आíथक उद्दिष्टे उद्ध्वस्त होतात. मुलांचे शालेय जीवन, जोडीदाराचे निवृत्तजीवन, गृहकर्जे, वाहनकर्ज, व्यवसायातील कर्जे तसेच स्वत:च्या पालकांची आíथक जबाबदारी सगळी गणिते आणि दैनंदिन वाढता खर्च एकटय़ा कुटुंबप्रमुखावर असेल तर योग्य मूल्यमापनाद्वारे प्युअर टर्म पॉलिसी म्हणजेच केवळ जीवन विमा संरक्षण देणाऱ्या टर्म पॉलिसी काढणे अनिवार्य आहे.

आजकालच्या प्रचंड वेगवान जीवनशैलीत ताणतणावाखाली धावपळीत आयुष्य ‘मजेत’ जगताना भारतीय ग्राहक बऱ्याचदा कित्येक अनावश्यक खर्च करताना दिसतो. बाराही महिने बाजारपेठांमधून खिशाला परवडणार नाही असे खर्च केवळ सामाजिक ‘प्रतिष्ठा’ जपण्याकरता करताना आढळतो. दहा वर्षांपूर्वी नसलेला मोबाइल आता ‘मूलभूत’ गरज झाला आहे. प्रत्येक कुटुंबापाठी किमान ३००० ते ५००० फोन बिले दरमहा आज भारतीय ग्राहक ‘खर्च’ करत आहे; परंतु कमाल २००० ते ३००० दरमहा मासिक हप्ता भरून संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करण्याची ‘जबाबदारी’ पार पाडताना विरळाच दिसतो. याचे कारण हलगर्जीपणा किंवा चुकीचे विमा विपणन तसेच विमा सल्लागाराकडून अयोग्य पॉलिसी हेतुपुरस्सर ग्राहकाच्या ‘गळयात मारणे’ इतके वरकरणी नाही. तर याचे मूलभूत कारण आहे जशी मोबाइल सेवा ग्राहक उपभोगू शकतो तशी जीवन विम्याद्वारे मिळणारी सेवा स्वत: उपभोगू शकत नाही. वाचकांनी थोडं थांबून फक्त गेल्या एका वर्षांचे सिंहावलोकन केले तर प्रत्येकाच्या वर्तुळात किमान एक तरी अपमृत्यू, धक्कादायक अपघात किंवा जीवघेणा आजार झालेला मित्र, परिचित, शेजारी किंवा नातलग जिवाला चटका लावून गेलेला आढळेल; परंतु दहा दिवस हळहळ किंवा आपण सुरक्षित आहोत याचे क्षणिक सुख मानून आपण यंत्रवत जगण्यास परत ‘मोकळे’ होतो. जीवन विमा हा विषय काहीसा ‘नकोसा’ किंवा ‘अशुभ’ सदरात मोडतो.

दुसरे ठळक कारण किंवा योग्य शब्दात मांडायचे झाले तर ‘सबब’ म्हणजे जीवन विमा पॉलिसीत परतावा नसणे. टर्म पॉलिसीत ज्यात फक्त मृत्यूनंतर विमित रक्कम दाव्याद्वारे नामांकित व्यक्तीस दिली जाते. त्यामुळे करसवलतीद्वारे मिळणारा अप्रत्यक्ष फायदा उपभोगूनही ग्राहकास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परतावा मिळत नाही.

जरा विचारपूर्वक आपण आपल्या वार्षकि अंदाजपत्रकाचा विचार केला तर लक्षात येते की, कित्येक अप्रत्यक्ष सेवाकर कोणतीही सेवा न उपभोगता आपण केवळ सवय म्हणून विनासायास भरत असतो किंवा बऱ्याचदा केवळ सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी अनाठायी देणग्या देत असतो. या खर्चाची नोंदही आपण ठेवत नाही. मग जीवन विम्यासारख्या अत्यावश्यक आणि संपूर्ण कुटुंबाच्या आíथक भवितव्याशी निगडित ‘खर्चाशी’ तडजोड करणे कितीसे हितकारक आहे?

जीवन विम्याचे संरक्षण हे व्यक्तिसापेक्ष बदलते. तरी ढोबळमानाने व्यक्तीच्या वार्षकि उत्पन्नाच्या दहा पट जीवन विमा संरक्षण घेणे अनिवार्य आहे. जीवन विमा निवडताना काही तांत्रिक बाबींचा ग्राहकाने आवर्जून विचार करायला हवा.

जीवन विम्याची निवड कशी?

जीवन विम्याचे संरक्षण हे व्यक्तिसापेक्ष बदलते. तरी ढोबळमानाने व्यक्तीच्या वार्षकि उत्पन्नाच्या दहा पट जीवन विमा संरक्षण घेणे अनिवार्य आहे.

  • जीवन विम्याची गरज ओळखून निश्चित मूल्यमापनाद्वारे अपेक्षित विमाराशी ठरवणे. जीवन विमा व्यक्तीच्या वयानुसार, जीवनक्रमानुसार तसेच व्यवसायाच्या स्वरूपानुसार कमी-अधिक जोखमीचे संरक्षण देतो.
  • जीवन विमा म्हणजेच केवळ टर्म (Term Plan) पॉलिसी जी फक्त मृत्यूनंतर विमा राशी (Sum Assured) ि नामनिर्देशित व्यक्तीस मोबदला देते ती वैद्यकीय चाचणी यशस्वीपणे पार पाडल्यानंतरच सुरू होते. म्हणजेच व्यक्तिगत आरोग्य, सवयी, उंची-वजन, वय, पालकांची वैद्यकीय माहिती, जन्मजात व्यंग, आधी झालेले अपघात, व्यवसायाशी निगडित जोखीम उदा. कामाचे स्वरूप कार्यालयीन बठे आहे की बाहेर फिरतीचे आहे. अशा बाबींचा अर्जाद्वारे खुलासा देऊन वैद्यकीय चाचणीनंतरच जीवन विमा ग्राहय़ होतो.
  • स्थिर प्रीमिअम म्हणजेच (Level Premium) – महत्त्वाची तांत्रिक बाब म्हणजे आरोग्य विमा, वाहन विमा किंवा तत्सम इतर सर्वसाधारण विमा एक किंवा दोन वर्षांच्या कराराद्वारे ग्राहय़ होतो; परंतु जीवन विमा हा दीर्घमुदतीचा करार आहे. बाजारात कमाल ४० ते ५०ं वष्रे इतका दीर्घमुदतीचा विमाकरार काढणाऱ्या पॉलिसी उपलब्ध आहेत.  उदा. जर ग्राहकाचे वय ३० वष्रे आहे, वैद्यकीयदृष्टय़ा तो सदृढ आहे तर अंदाजे १ कोटी जीवन विमा पॉलिसी करता २०१६ साली ८५०० रुपये वार्षकि हप्ता त्याला आज भरावा लागतो तर तो हप्ता कायमस्वरूपी पुढील ४० वष्रे म्हणजेच संपूर्ण पॉलिसी काळात (टर्म) ‘स्थिर’ (एकसारखा) राहतो. थोडक्यात ग्राहकाचे वय जितके लहान तितका हप्ता कमी आणि दीर्घकालीन संरक्षणासाठी सोयीचे ठरते.
  • सध्या बांधकाम क्षेत्रात अभूतपूर्व उलाढाल चालू आहे. बव्हंशी मध्यमवर्ग, नोकरदार मोठमोठय़ वास्तूंची स्वप्ने बघत आहेत. कर्जाचे डोंगर ईएमआयद्वारे पार पाडत आहेत. कर्जे ग्राहय़ करतानाही कर्जदाराची जीवन विमा रक्कम लक्षात घेतली जाते. अकाली मृत्यू किंवा कर्जकाळातील कर्जदाराचा मृत्यू जर विम्याद्वारे संरक्षणाखाली असेल उर्वरित कर्जे कुटुंबाच्या इतर आíथक उद्दिष्टय़ांसाठी गुंतविलेल्या योजनाद्वारे फेडण्याची आवश्यकता राहत नाही.
  • कर सवलतीद्वारे शासनाने जीवन विमा प्रीमियम अर्थात हप्त्यांपोटी भरल्या जाणाऱ्या रकमेवर कमाल वजावट १५०००० पर्यंत वाढविली आहे; परंतु हप्ता आणि विमा राशी (सम अश्युअर्ड) यांचे गुणोत्तर लक्षात घेणे गरजेचे आहे. एप्रिल २०१२ नंतर जीवन विमा हप्ता ८०सी अंतर्गत कर सवलतीस पात्र होण्यासाठी जीवन विमा संरक्षणाच्या १० टक्के कमाल हप्ता असणे आवश्यक आहे. ही करसवलत जीवन विम्यास प्रोत्साहन देण्याकरता आहे.
  • जीवन विम्याद्वारे मृत्यूनंतर वारसदारांना मिळणारी रक्कम ही करपात्र नाही. कलम १०(१०डी) अन्वये जीवन विम्याद्वारे मिळणारी रक्कम आयकरास पात्र नाही.

fbplanner2016@gmail.com

लेखिका सीएफपीपात्रताधारक असून, ‘इन्श्युरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या सहयोगी सदस्या आहेत.