प्रत्येक माणूस हा भविष्यकाळासाठी काही ना काही तरी गुंतवणूक करत असतो. या गुंतवणुकीचा उद्देश पसे सुरक्षित राहणे आणि त्यावर काही उत्पन्न मिळावे हा असतो. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही गुंतवणुकींमध्ये जोखीम जास्त असते तर काहीं मध्ये जोखीम नसते. जेवढी जोखीम जास्त तेवढी उत्पन्नाची अपेक्षा जास्त. या सर्व घटकांचा अभ्यास करून गुंतवणूक केली जाते. प्रामुख्याने सर्वसामान्य माणूस खालील गुंतवणूक करतो :
१. बँकेतील बचत खाते आणि विविध प्रकारच्या ठेवी
२. पोस्ट खात्यातील योजना
३. कंपन्यांच्या मुदत ठेवी
४. शेअर, रोख्यांमधील गुंतवणूक
५. सोने, चांदी, दागिने,
६. स्थावर मालमत्ता इत्यादी
या गुंतवणुकीतून दोन प्रकारचे उत्पन्न मिळते. एक नियमित उत्पन्न आणि भांडवली नफा. काही गुंतवणुकीवरील नियमित उत्पन्न करपात्र असते तर काही करमुक्त असते. तसेच भांडवली नफासुद्धा करपात्र किंवा करमुक्त असू शकतो. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संदर्भात प्राप्तीकर कायद्यात काय तरतुदी आहेत ते जाणून घेणे गरजेचे आहे.
१. बँकेतील बचत खाते आणि विविध प्रकारच्या ठेवी :
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. बँका या गुंतवणुकीशिवाय अनेक सेवा पुरवत असल्यामुळे बँकेत गुंतवणूक करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. आता बँका या छोटय़ा गावांमध्येही असल्यामुळे लोकांची सोय होते. साधारणपणे खालील प्रकारच्या ठेवी असतात :
१. बचत खाते : साधारणपणे या खात्यात दोन ते तीन महिन्याच्या खर्चाएवढी रक्कम ठेवली जाते. या खात्यावर मिळणारे व्याज हे कमी असते. यावर व्याज हे सरासरी शिलकीवर मिळते. काही बँका ७% पर्यंत व्याज बचत खात्यावर देतात. हे बचत खाते फक्त वैयक्तिक, िहदू अविभाज्य कुटुंब, धर्मादाय संस्था यांनाच उघडता येते. या खात्यावरील १०,००० रुपयांपर्यंत मिळणारे व्याज हे कलम ‘८०टीटीए’ प्रमाणे करमुक्त आहे आणि बाकी रक्कम करपात्र असते. बचत खात्यावरील व्याजावर उद्गम कर (टीडीएस) कापला जात नाही.
२. आवर्ती ठेव खाते : या खात्यात ठराविक काळापर्यंत निश्तित रक्कम जमा केली जाते आणि मुदत काळानंतर ही रक्कम व्याजासहित परत मिळते. यावर मिळणारे व्याज हे करपात्र असते. मागील वर्षांपर्यंत या व्याजावर उद्गम कर (टीडीएस) कापला जात नव्हता. परंतु या वर्षीच्या अर्थसंकल्पात जर आíथक वर्षांत १०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याज देय असेल तर या व्याजावर उद्गम कर  कापण्याची तरतूद करण्यात आली आहे.
३. मुदत ठेव: या खात्यात ठेवलेली रक्कम मुदत काळानंतर परत मिळते. या योजनेवरील व्याज हे मासिक, त्रमासिक, सहामाही, वार्षकि, वगरे काळानंतर मिळू शकते (NON CUMULATIVE ) किंवा त्यावर जमा होणारे व्याज हे मुदत काळानंतर मुद्दल रकमेबरोबर (CUMULATIVE ) मिळू शकते. यावर मिळणारे व्याज हे सुद्धा करपात्र असते. जर व्याज आíथक वर्षांत १०,००० रुपयांपेक्षा जास्त देय असेल तर या व्याजावर उद्गम कर कापला जातो. हा उद्गम कर वाचविण्यासाठी मुदत ठेवी एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये विभागून अशा ठेवल्या जातात की एका शाखेमधून मिळणारे वार्षकि व्याज हे १०,००० रुपयांच्या पेक्षा कमी असेल. या वर्षीच्या अर्थसंकल्पात प्राप्तीकर कायद्यातील ही चूक दूर करण्यात आली आहे. आता १०,००० रुपयांची मर्यादा ही बँकेच्या सर्व शाखांमधून मिळणाऱ्या व्याजासाठी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की व्याजावर उद्म कर कापला नाही म्हणजे ती रक्कम करमुक्त नाही. जर उत्पन्न करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त असेल तर कर स्वतंत्र भरावा लागतो. तसेच सहकारी बँकेत सभासदांनी ठेवलेल्या मुदत ठेवींवर उद्गम कर लागू होत नव्हता तो आता लागू झाला आहे. जर उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असेल तर फॉर्म 15G किंवा 15H हा बँकेत दिला तर बँक उद्गम कर कापत नाही. बँकेला आपला ‘पॅन’ कळवणे गरजेचे असते.
एक प्रश्न सर्वाना पडतो की, जेव्हा मुदत ठेवीची मुदत एकापेक्षा जास्त आíथक वर्षांंमधील काळासाठी असेल आणि मुदत ठेव CUMULATIVE  असेल म्हणजे ठेव आणि त्यावरील व्याज हे मुदतीनंतर मिळणार असेल तर अशा ठेवींवरील व्याज हे प्रत्येक वर्षी उत्पन्नात दाखवावे किंवा मुदतीनंतर एकदम दाखवावे? समजा, १ लाख रुपयांची मुदत ठेव ही १ एप्रिल २०१४ रोजी ३ वर्षांसाठी घेतली आणि तीवर ३१ मार्च २०१७ मध्ये व्याजासह १,२८,००० रुपये मिळणार असतील. तर त्याचे व्याज हे आíथक वर्ष २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ यात विभागून दाखवावे किंवा ठेवींवरील २८,००० रुपयांचे व्याज (१,२८,००० वजा १,००,०००) ३१ मार्च २०१७ रोजी म्हणजेच आíथक वर्ष २०१६-१७ मध्ये दाखवावे का?
हे उत्पन्न कोणत्या वर्षी दाखवावे हे करदात्याने ठरविले पाहिजे आणि हे सातत्याने पाळले पाहिजे. या व्याजावर उद्गम कर कापला जात असेल तर ते प्रत्येक वर्षीचे जमा व्याज उत्पन्नात दाखविले तर उद्गम कराचा दावा करणे सोपे जाईल. जर एकाच वर्षी उत्पन्न दाखवले तर त्यावर जास्त कर भरावा लागू शकतो.
४. कलम ‘८०सी’ अंतर्गत मुदत ठेव: या ठेवीवर कलम ‘८०सी’प्रमाणे १,५०,००० रुपयांपर्यंत उत्पन्नातून वजावट मिळू शकते. याची किमान मुदत ५ वष्रे इतकी आहे. या ठेवींवरील मिळणारे व्याज हे करपात्र आहे. यावरसुद्धा उद्गम कराच्या तरतुदी लागू आहेत.
२. पोस्टाच्या योजना :
१. बँकेसारखेच पोस्ट खात्यामध्येही विविध योजना आहेत. बचत खाते आणि मुदत ठेवींवर प्राप्तीकर कायद्यातील तरतुदी सारख्या आहेत. पोस्ट खात्यातील बचत खात्यावरील व्याज हे ३,५०० रुपयांपर्यंत करमुक्त आहे.
२. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी): या प्रमाणपत्रात (अंक श्ककक) मधील गुंतवणुकीवर कलम ‘८०सी’प्रमाणे उत्पन्नातून १,५०,००० रुपयांपर्यंत सूट मिळते. यावर मिळणारे व्याज हे व्याजाच्या तक्त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी करपात्र उत्पन्नात दाखवावे लागते. हे व्याज मुदतीनंतरच मिळत असल्यामुळे त्याची दर वर्षी स्वाभाविकपणे पुनर्गुतवणूक होत असल्यामुळे व्याजाच्या रक्कमेचीसुद्धा कलम ‘८०सी’अंतर्गत वजावट मिळते.
 ३. कंपन्यांच्या मुदत ठेवी :
या गुंतवणुकीवर बँकेतील ठेवीपेक्षा जास्त व्याज मिळते. याची जोखीम जास्त आहे. या ठेवींवरील व्याज करपात्र आहे. उद्गम कराच्या तरतुदी या उत्पन्नालासुद्धा लागू आहेत.
४. शेअर, रोखे यामधील गुंतवणूक:
१. नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत कंपन्यांचे शेअर्स असू शकतात. त्यावर लाभांश मिळतो. फक्त कंपन्यांच्या (नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत) शेअरवरील लाभांश (ज्यावर लाभांश वितरण कर) भरला आहे असा लाभांश करमुक्त आहे. लाभांश वितरण कर हा फक्त कंपन्यांना लागू असल्यामुळे अशा कंपन्यांचा लाभांश करमुक्त आहे. या शिवाय सहकारी संस्था किंवा सहकारी बँकाकडून मिळणारा लाभांश हा करपात्र आहे.
२. सहकारी संस्था किंवा बँकांचे, किंवा इतर संस्थांचे शेअर: सहकारी संस्था किंवा सहकारी बँकांच्या भाग भांडवलातील गुंतवणुकीवर मिळणारा लाभांश हा करपात्र आहे.
३. सरकारी रोखे : यावर मिळणारे व्याज हे करपात्र असते. फक्त करमुक्त रोख्यांवरील व्याज हे करपात्र नसते. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या योजनांसाठी भांडवल जमा करण्यासाठी दीर्घ मुदतीचे करमुक्त रोखे सरकार विक्रीस काढणार आहे. या रोख्यांवरील व्याज करमुक्त असणार आहे.  याचा फायदा कमी उत्पन्न असणाऱ्यासाठी जास्त होणार नाही; परंतु पूर्वीसारखी पायाभूत सुविधांच्या रोख्यासाठी असणारी २०,००० रुपयांसारखी उत्पन्नातून वजावट दिली असती तर त्याचा फायदा सर्वसामान्यांना झाला असता.
४. म्युच्युअल फंड :
म्युच्युअल फंडावरील लाभांश हा गुंतवणूकदारासाठी करमुक्त आहे.
५. सोने, चांदी, दागिने इ.
सोने, चांदी आणि दागिन्यांवरील गुंतवणुकीवर कोणतेही उत्पन्न मिळत नाही. त्याच्या वाढणाऱ्या किंमती याच सोन्या-चांदीतील गुंतवणूक आकर्षक करतात. भारतीयांसाठी सोन्या-चांदीला गुंतवणुकीपेक्षा सामाजिक महत्त्व जास्त आहे हे समृद्धीचे लक्षण आहे. कोणतेही लग्न समारंभ सोने खरेदीशिवाय होत नाहीत. असे बरेच सोने निष्क्रिय अवस्थेत भारतात आहे. सोन्याची आयात मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याासाठी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात काही योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये सोने ठेव खाते उघडता येईल आणि त्यावर व्याज मिळेल. हे सोने चलनात येईल आणि आयात कमी होईल.
६. स्थावर मालमत्ता, इत्यादी :
स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूकसुद्धा घरांच्या वाढणाऱ्या किमतींमुळे आकर्षक आहे. यावर भाडय़ाच्या रुपाने नियमित उत्पन्न मिळू शकते. इमारतीचे भाडे उत्पन्न करपात्र आहे या उत्पन्नातून मालमत्ता कर आणि ३०% प्रमाणित वजावट मिळते. एकापेक्षा जास्त घरे असतील आणि घर भाडय़ाने दिले नसले तरी घर भाडे उत्पन्न दाखवून त्यावर कर भरावा लागतो.  
लेखक सनदी लेखाकार व कर सल्लागार
pravin3966@rediffmail.com

Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Loksatta kutuhal The technology behind perfect intelligence
कुतूहल: परिपूर्ण बुद्धिमत्तेमागील तंत्रज्ञान
are you trying for weight loss try right way to eat food mini meals can help in portion control
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात? तज्ज्ञांनी सांगितली खाण्याची योग्य पद्धत….
How to deal with a difficult boss
तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….