* एसबीआय इक्विटी अपॉच्र्युनिटी फंड- सीरिज २
एसबीआय म्युच्युअल फंडाने तीन वर्षे कालावधी असलेली मुदतबंद (क्लोज एंडेड) स्वरूपाची समभागसंलग्न योजना ‘एसबीआय इक्विटी अपॉच्र्युनिटी फंड- सीरिज २’ नावाने प्रस्तुत केली आहे. २० नोव्हेंबरपासून सुरू झालेली योजनेची विक्री १ डिसेंबर २०१४ पर्यंत सुरू राहील. समभाग आणि समभागसंलग्न रोख्यांमध्ये गुंतवणुकीच्या विविधांगी लवचिक भागभांडार बनवून त्याद्वारे गुंतवणूकदारांसाठी दीर्घावधीत उत्तम भांडवलवृद्धी साधणे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. धर्मेद्र ग्रोव्हर हे योजनेचे निधी व्यवस्थापक असून, बीएसई ५०० निर्देशांकाची कामगिरी ही या योजनेने परताव्याच्या दृष्टीने मानदंड म्हणून निश्चित केली आहे. डिरेक्ट आणि रेग्युलर असे योजनेत गुंतवणुकीचे दोन प्रकार असून, दोहोंमध्ये गुंतवणूकदारांना लाभांश आणि वृद्धी असे पर्याय देण्यात आले आहेत.

* आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एफएमपी- सीरिज ७५
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवीन फंड योजना- ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन- सीरिज ७५- १११० ेडेज् प्लॅन ५’ ही मुदत बंद (क्लोज एंडेड) उत्पन्न योजना प्रस्तुत केली आहे. २० नोव्हेंबरपासून सुरू झालेली योजनेची विक्री २ डिसेंबर २०१४ पर्यंत सुरू राहील. स्थिर उत्पन्न देणारे रोखे व ऋणपत्रांमध्ये गुंतवणूक करून उत्पन्नप्राप्ति हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

*  रिलायन्स एमएफ- डय़ुएल अ‍ॅडव्हान्टेज फंड
रिलायन्स म्युच्युअल फंडाची नवीन योजना ‘रिलायन्स एमएफ- डय़ुएल अ‍ॅडव्हान्टेज फिक्स्ड टेन्योर फंड ७ – प्लॅन ए’ नावाने प्रस्तुत केली आहे. ही मुदतबंद प्रकारातील उत्पन्न योजना आहे. १८ नोव्हेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुली झालेली योजना २६ नोव्हेंबर २०१४ पर्यंत खुली राहील. योजनेचे वैशिष्टय़ म्हणजे गुंतवणूकदारांवर कोणताही प्रवेश अथवा निर्गमन (एंट्री- एग्झिट लोड) भार आकारला जाणार नाही. योजनेच्या कालावधीदरम्यान मुदतपूर्ती असलेल्या स्थिर उत्पन्न देणाऱ्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करून व्याजदरातील चढ-उताराच्या जोखीमेपासून बचाव आणि काहीशी गुंतवणूक समभागांमध्ये करून भांडवलवृद्धी असे या योजनेचे  गुंतवणूक उद्दिष्ट आहे.

* बिर्ला सन लाइफ फोकस्ड इक्विटी फंड
बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने ‘फोकस्ड इक्विटी फंड- सीरिज ४’ नावाने मुदत बंद समभाग योजना प्रस्तुत केली आहे. योजनेत प्रारंभिक गुंतवणुकीचा कालावधी हा १८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१४ असा निश्चित करण्यात आला आहे. योजनेतील गुंतवणूकदारांवर कोणताही प्रवेश अथवा निर्गमन (एंट्री- एग्झिट लोड) भार आकारला जाणार नाही. ही योजना कोणत्याही परताव्याची निश्चित हमी आणि संकेतही देत नाही. राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम-२०१३ अंतर्गत निर्देशित करण्यात आलेल्या समभागांमधून निवडक समभागांचा भागभांडार बनवून त्यायोगे गुंतवणूकदारांसाठी भांडवलवृद्धी साधणे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

* कॅनरा रोबेको इंडिया अपॉच्र्युनिटीज् फंड
कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाने नवीन मुदत बंद इक्विटी योजना – ‘कॅनरा रोबेको इंडिया अपॉच्र्युनिटीज् फंड’ नावाने सादर केली आहे. योजनेचा कालावधी हा युनिट्स वितरीत झाल्यापासून तीन वर्षे (१,०९५ दिवस)  असा आहे. प्रामुख्याने मिड कॅप श्रेणीतील कंपन्यांचे समभाग आणि समभागसंलग्न रोख्यांमध्ये गुंतवणूक करून भांडवलवृद्धी साधणे असे योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट आहे. योजनेतून ५५% ते ९०% गुंतवणूक ही मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये, १०% ते ४५% गुंतवणूक ही लार्ज कॅप समभाग व समभागसंलग्न पर्यायांमध्ये तर पाच टक्क्य़ांपर्यंत गुंतवणूक ही उच्च जोखीम परंतु उमदा परतावा क्षमता असलेल्या मायक्रो कॅप समभागांमध्ये केली जाईल. जोखीम संतुलनासाठी ३५ टक्के गुंतवणूक ही स्थिर उत्पन्न देणाऱ्या डेट तसेच मनी मार्केट पर्यायांमध्ये गुंतवण्याची लवचिकता गुंतवणूक धोरणांत ठेवण्यात येईल.