वैभवी कुलकर्णी सप्टेंबर महिन्याच्या अतिथी विश्लेषकाच्या भूमिकेत आहेत. त्या ‘ब्लॅक ओशन कॅपिटल पार्टनर्स’ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार कंपनीच्या भागीदार आहेत. त्यांची कंपनी परदेशी परदेशी गुंतवणूकदारांना सेवा पुरविते.

लॉईड इलेक्ट्रिक अॅण्ड इंजिनीयरिंग (लॉईड) या कंपनीची स्थापना १९८८ मध्ये झाली. फेडर्स लॉईड कॉर्पोरेशन या वातानुकुलित यंत्रे तयार करणाऱ्या कंपनीने प्रवर्तित केलेली ही स्वतंत्र कंपनी आहे. इमारतीचे तापमान नियंत्रित (उबदार व वातानुकुलीत) करण्यासाठी इव्हॅप्युरेटर्स व कंडेन्सर वापरले जातात. या दोन्ही उपकरणात तांब्याच्या नळ्या वापरून कॉइल्स वापरल्या जातात. लॉईड्स ही या कंडेन्सरची भारतातील सर्वात मोठी निर्माती आहे. हिट एक्चेंजर्स, रेल्वेचे प्रवासी डबे, मेट्रोचे डबे, खिडकीवर लावायचे एअर कंडिशनर्स, स्प्लिट एसी या सर्वाच्यात तापमान नियंत्रित करण्यासाठी या कंपनीची उत्पादने वापरली जातात. अनेक वातानुकूलन यंत्रांच्या निर्मात्यांना (ओईएम) ही कंपनी आपली उत्पादने पुरविते. कंपनी एचव्हीएसी (हिटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग) उद्योगातील एक प्रमुख पुरवठादार आहे. कंपनीच्या परदेशात तीन उपकंपन्या आहेत.  

कंपनीचा गर औद्योगिक (म्हणजे घर-कार्यालय, हॉटेल्स वगैरे) वापराच्या एचव्हीएसी उपकरणाच्या बाजारपेठेतील हिस्सा ५२ टक्के आहे. कंपनीच्या एकूण विक्रीच्या ६५ टक्के विक्री या उत्पादन गटात होते. कंपनी रेल्वेच्या प्रवासी डबे, मेट्रो व ईएमयूसाठी वातानुकुलीत यंत्रे तयार करते. ही यंत्रे ‘टर्न की’ पध्दतीने म्हणजे उत्पादन पुरवठा यंत्रांची उभारणी व निगा राखण्याचा कंत्राटाचा समावेश होतो. हा व्यवसाय विक्रीच्या तुलनेत २० ते २२ टक्के नफा असलेला व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी कंपनीची दुरूस्ती केंद्रे भारतात दिल्ली, मुंबई, बंगळुरू, गुवाहत्ती, कोलकाता, चेन्नई, जयपूर, लखनौ, हैदराबाद या ठिकाणी आहेत. ही कंपनी भारतीय रेल्वेची पहिल्या श्रेणीची कंत्राटदार आहे. रेल्वेची ८० टक्के कंत्राटे प्रथम श्रेणीच्या कंत्राटदारांना बहाल होतात. कंपनीला दिल्ली, हैदराबाद, मुंबई, बंगळुरू येथील मेट्रो सेवांसाठी वातानुकूल यंत्रांची निगा राखणारा कंत्राटदार म्हणून मोठय़ा संधी उपलब्ध आहेत. नवीन सरकारचे धोरण सार्वजनिक खाजगी भागीदारीस अर्थात ‘पीपीपी’स प्रोत्साहन देणारे आहे. या बदलत्या धोरणामुळे कंपनीपुढे व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील असे मानले जाते. 

गर औद्योगिक एअर कंडिशनिंग व रेफ्रिजरेशन व्यवसायात कंपनीने ४० टक्के हिस्सा काबीज केला आहे. या व्यवसायाचे निर्वविाद नेतृत्व लॉईड्सकडे आहे. एचव्हीएसी व्यवसायाचे प्रमुख अंग म्हणजे वाहनांत वापरली जाणारी वातानुकुलीत यंत्रे, हिट एक्स्चेंजर रेल्वे व मेट्रो डब्यात वापरली जाणारी वातानुकुलीत यंत्रे यांचे उत्पादन व इतर उत्पादकांसाठी यंत्रांची जुळणी कंपनी आपल्या कारखान्यात करते. भारतीय वातानुकुलीत यंत्रांच्या उत्पादकांची तीन गटात विभागणी सोबतच्या कोष्टकात दिली आहे. 

स्वत:च्या कारखान्यात उत्पादन करणारे  लॉईडस्, सॅमसंग, हिताची एलजी

आयात करून विक्री करणारे गोदरेज, ओनिडा, पॅनासोनिक, डैकिन

भारतात कंत्राटी पध्दतीने उत्पादन करणारे एलजी, व्होल्टास, गोदरेज, ओनिडा, व्हर्लपूल

१ जुलै २०११ पासून फेडर्स लॉईडसचा ग्राहक उत्पादने विभाग लॉईड इलेक्ट्रिकल अॅन्ड इंजिनियर्सचा एक भाग झाला. हा विभाग स्प्लिट एसी, विंडो एसी, गारमेंट ड्रायर, एलईडी/ एलसीडी दूरचित्रवाणी संच. टॉवर/ कॅसेट एसी ही उत्पादने तयार करतो. वाढते दरडोई उत्पन्न व यामुळे घरातील काम करण्याचे कष्ट कमी करणाऱ्या उत्पादनांची (Lifestyle Product) मागणी सतत वाढत आहे.  लॉईड वेगवेगळ्या उत्पादनांसाठी सर्वच किंमत गटात आपले अस्तित्व राखून आहे. गेल्या ५० वर्षांपासून ‘लॉईडस्’ ही नाममुद्रा ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. कंपनीने भारतभर विक्रेत्यांचे जाळे विणले असून २३० हून अधिक वितरक व १,५०० हून अधिक विक्रेत्यांच्या मार्फत कंपनी आपली उत्पादने विकत आहे. म्हणूनच एका वर्षांसाठी ३१० रुपयाचे लक्ष्य निर्धारित करून गुंतवणूक करण्याचा शिफारस करीत आहे.
 

महत्वाचा खुलासा :
विश्लेषकांनी त्यांच्या कंपनीकडून सल्ला घेणाऱ्या ग्राहकांना या कंपनीच्या समभागांत गुंतवणुकीची शिफारस केली आहे. त्यानुसार ‘हेज फंडां’कडून ही गुंतवणूक झालीही असेल किंवा भविष्यात ते गुंतवणूक करतील. यामुळे या कंपनीच्या समभागांच्या किंमतीत वाढ होणे हे विश्लेषकाच्या स्वारस्याचे ठरू शकते, याची वाचकांनी दखल घ्यावी.